A child to be born a robot; Danger warning to humans

    दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांच्या रोबो चित्रपटातील चिट्टी हे भयावह व्हर्जन तुमच्या लक्षात असेलच. एका रोबोमुळे होणारे फायदे आणि तोटे याचे नेमके चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. आता वैज्ञानिकांनी दावा केला आहे की जर रोबो मूल जन्माला घालण्यासाठी सक्षम झाले तर या जगाला चिट्टीच्या एक-दोन नव्हे तर हजारो वाईट व्हर्जन्सचा सामना करावा लागू शकतो. येत्या काळात रोबो आपापसात संबंध प्रस्थापित करून अनेक पॉवरफूल नॅनो रोबोंचे सैन्य तयार करू शकतील.

    संशोधकांना वाटतेय भीती

    ब्रिटन आणि नेदरलँडमधील वैज्ञानिक अशा प्रकारची प्रणाली विकसित करत आहेत. या प्रणालीच्या माध्यमातून रोबो आपापसात संबंध प्रस्थापित करू शकतील तसेच ते मानवी हस्तक्षेपाशिवाय मूलदेखील जन्माला घालू शकतात. ही मुले या मूळ रोबोच्या तुलनेत अनेक पटींनी शक्तिशाली असतील. मात्र रोबोजची संख्या अशा पद्धतीने वाढली तर मानवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती आता संशोधकांना वाटत आहे.

    माणसे अडचणीत

    या प्रकल्पात सहभागी ब्रिटन आणि नेदरलँडमधील वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक मशिन्सची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाईल. या प्रणालीच्या माध्यमातून जी रोबो मुले जन्माला येतील, ती अधिक विध्वंसक असतील. कॉम्प्युटर विषयाचे प्राध्यापक एम्मा हार्ट यांच्या माहितीनुसार, डिजीटल डिएनएच्या माध्यमातून जन्माला आलेल्या रोबो मुलांची क्षमता कित्येक पटींनी जास्त असेल. ब्रीडींग फार्ममध्ये गरजेनुसार रोबो जन्माला घातले जातील. जन्मानंतर हे रोबो नुकसानकारक कृती करू शकतात.

    रोबोला सांभाळणे कठीणच

    यॉर्क युनिव्हर्सिटीच्या या प्रकल्पानुसार, 4 वर्षांच्या संशोधनानंतर रोबो आई-वडिलांचा डिएनए एकत्रित होऊ शकतो. सर्वप्रथम त्यांचा ब्रेन मॅपिंग करण्यात आला आहे. हा मॅपिंग अत्याधुनिक करण्याचे काम सुरू आहे. यामाध्यमातून जे रोबो जन्माला येतील त्यांना एकूण 6 पाय असतील. या पायांमुळे ते समुद्र खाणी, अंतराळ आणि न्यूक्लिअर रिअॅक्टर मध्ये काम करू शकतील. नॅनो रोबोजच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्रात मायक्रो सर्जरी करणे देखील शक्य होईल.