हे थांबणार कधी? येन केन प्रकारेण : महिन्याला मनुष्य खातो २५० ग्रॅम प्लास्टिक; वेळीच घाला आवर अन्यथा…

याचबरोबर मासे, मीठ यांच्या माध्यमातूनदेखील प्लास्टिक आपल्या शरीरात प्रवेश करत आहे. तसेच प्लास्टिकचे सूक्ष्म कण आपल्या शरीरात धुळीच्या माध्यमातून जात असल्याचे ऑस्ट्रेलियातील न्यू कॅसल विद्यापीठातील संशोधकांनी आपल्या अभ्यासात म्हटले आहे. स्टिकच्या उत्पादनात मागील दोन दशकात असामान्य वाढ झाली आहे.

    मोठ्या प्रमाणात होणारा प्लास्टिकचा वापर हा आपल्या शरीराला अपायकारक ठरत आहे. अभ्यासानुसार मनुष्य दर महिन्याला सुमारे २५० ग्रॅम प्लास्टिक खात आहे. मानवी आरोग्यासाठीही वाढता प्लास्टिकचा वापर हा धोकादायक आहे. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये असलेल्या पाण्यात बॉटलचे सूक्ष्म प्लास्टिक आपोआप आपल्या शरीरात सोडले जात आहे. पाण्यातून हे सूक्ष्म प्लास्टिक आपल्या शरीरात जात आहे.

    याचबरोबर मासे, मीठ यांच्या माध्यमातूनदेखील प्लास्टिक आपल्या शरीरात प्रवेश करत आहे. तसेच प्लास्टिकचे सूक्ष्म कण आपल्या शरीरात धुळीच्या माध्यमातून जात असल्याचे ऑस्ट्रेलियातील न्यू कॅसल विद्यापीठातील संशोधकांनी आपल्या अभ्यासात म्हटले आहे. स्टिकच्या उत्पादनात मागील दोन दशकात असामान्य वाढ झाली आहे.

    ग्रँड व्ह्यू रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार, येत्या २०२५ पर्यंत प्लास्टिक उद्योग हा ४ टक्के वाढेल. मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षेत्र, उद्योग आणि ३ डी प्रिंटिंगमध्ये मायक्रो प्लास्टिकचा वापर केला जातो. उत्पादित केलेले ७५ % पेक्षा अधिक प्लास्टिक हे नॉन-बायोडिग्रेडेबळ कचर्‍यात बदलत आहे. सुमारे दहा कोटी टन प्लास्टिक दरवर्षी तयार केले जात असून दरवर्षी २४ लाख टन प्लास्टिक समुद्र, नद्यामध्ये आढळते.

    a person consumes 250 grams of plastic per month