Airtel नंतर आता Jio नेही मुंबईत सुरू केलं 5G ट्रायल, जाणून घ्या

Reliance Jio मिड आणि mmwave बँड्स दोघांचा वापर करुन मुंबईत 5G ट्रायल करत आहे. याचा स्पीड 4G हून अतिशय अधिक असल्याचंही ते म्हणाले. आहे. साईट डिप्लोएड प्रकरणात Jio चं 5G ट्रायल अतिशय मोठं आहे.

    नवी दिल्ली: देशात 5G वर काम सुरू करण्यात आलं आहे. Bharti Airtel ने 5G ट्रायल गुरुग्राममध्ये सुरू केलं आहे. यात डाउनलोड स्पीड 1Gbps पर्यंत आहे. आता

    मनेही मुंबईत 5G ट्रायल सुरू केलं असल्याची माहिती आहे. 5G ट्रायलसाठी देशातच डेव्हलप केलेल्या 5G इक्विपमेंट्स (Indigenously Developed Equipment) आणि टेक्नोलॉजीचा वापर केला आहे.

    दिलेल्या माहितीनुसार, Reliance Jio मिड आणि mmwave बँड्स दोघांचा वापर करुन मुंबईत 5G ट्रायल करत आहे. याचा स्पीड 4G हून अतिशय अधिक असल्याचंही ते म्हणाले. आहे. साईट डिप्लोएड प्रकरणात Jio चं 5G ट्रायल अतिशय मोठं आहे.

    दिल्ली, मुंबई, गुजरात आणि हैदराबादमध्ये Jio ने ट्रायलसाठी अप्लाय केलं आहे. डिपोर्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने नुकतंच 5G ट्रायलसाठी 700MHz, 3.5 GHz आणि 26GHz बँड्स स्पेक्ट्रम Airtel, Reliance Jio आणि Voddafone Idea साठी उपलब्ध करुन दिलं होतं.