आता हा एकच मास्क वापरा : एअरबॉर्न मानवी पॅथॉजन्स पासून (airborne human pathogens) संरक्षणासाठी रियुजेबल बॅटरी ऑपेरेटेड मास्क विकसित

कोविड -१९ च्या साथीच्या महामारीत सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क लावणे ही एक मूलभूत गरज बनली आहे. मोठे मेळावे, सार्वजनिक वाहतूक, कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये या ठिकाणी कोरोनाव्हायरसचे संक्रमण होण्याची शक्यता खूप जास्त आहे. नियमित वापरातील साधे मास्क एरोजेल आणि मोठ्या धूलिकणांपासून संरक्षण करतात; तथापि, ते बहुतेक मानवी पॅथॉजन्सपासून संरक्षण देत नाहीत.

  मुंबई : सुनंदन दिवातीया स्कूल ऑफ सायन्स (एसडीएसओएस)ने एक मास्क तयार केला जो एअरबॉर्न ह्युमन पॅथॉजन्स (airborne human pathogens) पासून संरक्षणाची पुरेपूर हमी देतो. यावेळी एनएमआयएमएस विद्यापीठाचे (NMIMS) सन्माननीय कुलगुरू अमरीशभाई पटेल, कुलगुरू, उपकुलगुरू, एनएमआयएमएस विद्यापीठाच्या कुलसचिव आणि एनएमआयएमएस विद्यापीठाच्या एसडीओएसचे डीन यांच्या उपस्थितीत या टेक्नॉलॉजीचे व्यापारीकरण आणि विपणनासाठी मिल्टन ग्रुप ऑफ फार्मा कंपनी, मुंबईकडे २१ जून रोजी हस्तांतरण करण्यात आले

  कोविड -१९ च्या साथीच्या महामारीत सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क लावणे ही एक मूलभूत गरज बनली आहे. मोठे मेळावे, सार्वजनिक वाहतूक, कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये या ठिकाणी कोरोनाव्हायरसचे संक्रमण होण्याची शक्यता खूप जास्त आहे. नियमित वापरातील साधे मास्क एरोजेल आणि मोठ्या धूलिकणांपासून संरक्षण करतात; तथापि, ते बहुतेक मानवी पॅथॉजन्सपासून संरक्षण देत नाहीत. या बाबींचा आणि विषाणूच्या रोगजनकत्वाचा (pathogenicity of the virus) विचार करता, एनएमआयएमएस विद्यापीठाच्या सुनंदन दिवातीया स्कूल ऑफ सायन्स येथे एक अनोखा मास्क विकसित करण्यात आला आहे जो या रोगजनकांपासून पूर्णपणे संरक्षण देईल.

  हा मास्क एनएमआयएमएस युनिव्हर्सिटीच्या सुनंदन दिवातीया स्कूल ऑफ सायन्सचे डीन डॉ. नितीन देसाई यांची कल्पना आहे आणि त्यांनी सहकारी डॉ. वृषाली जोशी यांच्यासह, डॉ. डॉक्टरेट फेलो, सुनंदन दिवातीया स्कूल ऑफ सायन्सने हे वास्तव घडवून आणले आहे.

  मोबाईल किंवा हेडफोन वापरताना सुद्धा हा बॅटरी चलित मास्क वापरण्यास सुरक्षित आहे. विकसित केलेल्या मास्क मध्ये धातूच्या जाळीसोबत कॉटनचे चार स्तर आहेत जे इलेक्ट्रिकल फिल्टरचे काम करतात. श्वासोच्छवासाच्या वेळी, मास्कच्या संपर्कात येणारे रोगकारक विषाणू त्वरित निष्क्रिय होतात आणि वापरकर्त्यास संपूर्ण संरक्षण प्रदान करतात. हा मास्क पुनर्वापरासाठी योग्य तसेच सेल्फ-स्टेरलायझिंग (निर्जंतुकीकरण) आणि पर्यावरणास पूरक आहे.

  काळजीपूर्वक वापरल्यास बॅटरी ६ महिन्यांहून अधिक काळ चालू शकते आणि ती बदलण्याजोगीही आहे. ८००-१००० रुपये किंमतीचा हा मास्क ऑनलाईन उपलब्ध असून पुढील आठवड्यात बाजारात दाखल होईल. हा एक मास्क सहा महिन्यांत वापरल्या जाणार्‍या २४० मास्कची जागा घेतो , त्यामुळे पर्यावरणाला अनुकूल आहे.

  Airborne Reusable Battery Operated Mask developed for protection against human pathogens