Amazfit GTR smartwatch
ॲमेझफिट जीटीआर स्मार्टवॉच

या स्मार्टवॉचवर ईएमआयचा पर्यायही देण्यात आला आहे. 445 रुपये प्रतिमहिना इतक्या ईएमआयवर तुम्ही हे स्मार्टवॉच खरेदी करू शकता. दरम्यान कंपनीने अजून दोन स्मार्टवॉच लाँच केले आहेत.

मुंबई : बहुप्रतिक्षित Amazfit GTR2 हे स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहे. या वॉचसोबत कंपनीकडून 1799 रुपये किंमतीची एक स्ट्रॅपदेखील दिली जात आहे. नव्या फिटनेस ट्रॅकरमध्ये एमोलेड पॅनलही देण्यात आले आहे. या वॉचमध्ये तुम्हाला 12 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. कंपनी हे स्मार्टवॉच दोन वेगवेगळ्या एडिशन्समध्ये विकत आहे. लेटेस्ट Amazfit GTR 2 स्पोर्ट्स एडिशनची किंमत 12,999 रुपये इतकी आहे तर क्लासिक एडिशनची किंमत 13,499 रुपये इतकी आहे.

या स्मार्टवॉचवर ईएमआयचा पर्यायही देण्यात आला आहे. 445 रुपये प्रतिमहिना इतक्या ईएमआयवर तुम्ही हे स्मार्टवॉच खरेदी करू शकता. दरम्यान कंपनीने अजून दोन स्मार्टवॉच लाँच केले आहेत. अमेजफिट GTS2 आणि अमेजफिट GTS2 मिनी या नावांचे दोन स्मार्टवॉच कंपनीने लाँच केले आहेत.

फिचर्स

Amazfit GTR 2 मध्ये 1.39 इंचांचा एमोलेड टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 326ppi डेन्सिटी आणि 450 nits पिक ब्राईटनेस देतो. ॲमेझफिटने या स्मार्टवॉचमध्ये 417mAh क्षमेची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी तब्बल 14 दिवस टिकते. जर तुम्ही पॉवर सेव्हिंग मोडचा वापर करत असाल तर हिच बॅटरी तब्बल 38 दिवस टिकू शकते. या स्मार्टवॉचमध्ये एक्सेलेरोमीटर, एयर प्रेशर सेन्सर, एंबियन्ट लाईट सेन्सर आणि गायरोस्कोप देण्यात आला आहे.

कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये 12 प्रोफेशनल स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचमध्ये 3 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. तसेच यामध्ये बिल्ट इन माइक्रोफोन स्पीकर देण्यात आला आहे. हे वॉच कॉल फंक्शन, जीपीएस, एनएफसी, वायफाय आणि ब्लुटूथ कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल.