ॲमेझॉन पे देतो व्यापाऱ्यांना त्रासविरहीत अनुभव, ‘ॲमेझॉन पे फॉर बिजनेस’; ॲपवर व्हॉईस नोटिफीकेशन फिचरची सुरूवात

ॲमेझॉन पे फॉर बिजनेस ॲप लहान व्यापाऱ्यांना त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट स्वीकारणे सुलभ करण्यासाठी मदत करतो. हे बहु-भाषिक ॲप आहे जे देशभरातील व्यापारी डाऊनलोड करू शकतात. त्यांनी व्यापारी म्हणून नोंदणी केल्यानंतर सोप्या टप्प्यांमध्ये त्यांची आवडती भाषा निवडू शकतात.

  • ग्राहकाकडून प्रत्येक पेमेंटसाठी हे फिचर व्यापाऱ्यांना ऑडियो मेसेज मधून सूचना देईल

नवी दिल्ली : ॲमेझॉन पे ने आज ‘ॲमेझॉन पे फॉर बिजनेस’ ॲपसाठी व्हॉईस नोटिफीकेशन च्या सुरूवातीची घोषणा केली. या सुरूवातीसह, भारतभरातील लहान व्यवसाय त्यांच्या व्यवसायामध्ये गर्दीची वेळ असतांना पेमेंट मिळाल्याच्या नोटिफीकेशनसाठी वाट बघण्यात वेळ न घालवता त्रासविरहीत अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. सुरूवातीला, हे फिचर इंग्लीश आणि हिंदी मध्ये उपलब्ध असेल.

ॲमेझॉन पे फॉर बिजनेस ॲप लहान व्यापाऱ्यांना त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट स्वीकारणे सुलभ करण्यासाठी मदत करतो. हे बहु-भाषिक ॲप आहे जे देशभरातील व्यापारी डाऊनलोड करू शकतात. त्यांनी व्यापारी म्हणून नोंदणी केल्यानंतर सोप्या टप्प्यांमध्ये त्यांची आवडती भाषा निवडू शकतात.

सुरूवातीबद्दल बोलतांना, ॲमेझॉन पे इंडियाचे सीईओ महेंद्र नेरूळकर म्हणाले, “पेमेंट विश्वसनीय, सोयीस्कर आणि रीवार्ड मिळणारे करावे हे ॲमेझॉन पे चे ध्येय आहे. व्यापाऱ्यांसाठी व्हॉईस नोटिफीकेशनच्या सुरूवातीसह, ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या पेमेंटवर लक्ष ठेवणे दुकानदार आणि ऑफलाईन व्यापाऱ्यांसाठी सोपे करणे हे आमचे उदिष्ट्य आहे. व्यापाऱ्यांनी नोटिफीकेशनसाठी त्यांचा फोन बघण्याऐवजी, ॲमेझॉन पे ॲप प्राप्त झालेल्या पेमेंटचे ऑडियो कंफर्मेशन देते, त्यामुळे व्यापारी त्यांच्या ग्राहकांना पेमेंट मिळाले का हे तपासल्याशिवायच सेवा देऊ शकतात.”

ग्राहक आता कोणत्याही UPI ॲपचा वापर करून ॲमेझॉन पे QR कोड स्कॅन करून त्यांच्या फोनवरूनच पेमेंट करू शकत असल्याने ॲमेझॉन पे फॉर बिजनेस ॲप व्यापाऱ्यांसाठी पेमेंट स्वीकारणे सुलभ करते. व्यापाऱ्यांना मिळालेल्या पेमेंटसाठी वास्तव-वेळेतील ऑडियो नोटिफीकेशन आणि एकत्रित व्हीव मिळतो.

ॲप सध्या अँड्रॉईड वर उपलब्ध आहे आणि ॲपवर नोंदणी करून व्यापारी युनिक क्वीक रिसपॉन्स (QR) कोड तयार करून डिजीटल पेमेंट स्वीकारतील. व्यवहारांचा स्वीकार केल्यावर व्यापाऱ्यांसाठी आकर्षक रीवार्ड सुद्धा आहेत.