ॲमेझॉन पे UPI ग्राहकांची संख्या झाली 5 Crore ;  हा आनंद साजरा करण्यासाठी सप्टेंबर मध्ये दररोज मिळणार रिवार्ड

ग्राहक कोणताही युपीआय क्यूआर कोड स्कॅन (UPI QR Code Scan) करून 2 कोटी स्थानिक दुकानांना पेमेंट (Payment) करण्यासाठी ॲमेझॉन ॲपचा (Amazon App) वापर करत आहे. मागील एक वर्षात, आमचे ॲमेझॉन युपीआयचा वापर करत असलेले 75% हून अधिक ग्राहक मध्यम आणि लहान शहरांमधील आहेत, ज्यावरून युपीआय चा विकास दिसून येतो.

  • कोठेही, कोणालाही पे करा: स्थानिक दुकानांपासून, संपर्कांना पैसे पाठविण्यापर्यंत, मासिक बिल भरणे आणि बरेच काही
  • सुरू करण्यासाठी ॲमेझॉन ॲपमध्ये ॲमेझॉन पे वर जा

नवी दिल्ली : ॲमेझॉन पे (Amazon Pay) ने घोषित केले की, आता 5 करोड ग्राहक ॲमेझॉन पे युपीआय (Amazon Pay UPI) चा वापर करत आहेत. हा महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी, ॲमेझॉन पे सप्टेंबर महिन्यात खरेदी, बिल भरणे, व्यापाऱ्यांना ऑनलाईन पेमेंट करणे आणि त्यांच्या संपर्कांना पैसे पाठवणे यासाठी ॲमेझॉन पे युपीआय चा वापर करत असलेल्या सर्व ग्राहकांना दररोज रिवार्ड (Rewards) देत आहे.

या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलताना, ॲमेझॉन पे चे सीईओ आणि उपाध्यक्ष महेंद्र नेरूळकर म्हणाले, “कोणत्याही गोष्टीसाठी पेमेंट करणे विश्वासाचे, सोयीस्कर आणि रिवार्ड असलेले असावे हे आमचे ध्येय आहे. युपीआय चा जलद वापर होत असल्याबद्दल आम्ही उत्साही आहोत, ज्यामुळे आता ग्राहकांना खरेदी व्यतिरीक्त त्यांच्या ॲमेझॉन ॲपवरून बरेच काही करता येणार आहे. युपीआय च्या माध्यमातून आमच्या लाखो ग्राहक आणि व्यापाऱ्यांना आम्ही सेवा देत असल्याबद्दल आणि शासनाच्या रोख रक्कम कमी वापरणारा भारत (लेस-कॅश इंडिया) च्या स्वप्नामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत.”

ग्राहक कोणताही युपीआय क्यूआर कोड स्कॅन करून 2 कोटी स्थानिक दुकानांना पेमेंट करण्यासाठी ॲमेझॉन ॲपचा वापर करत आहे. मागील एक वर्षात, आमचे ॲमेझॉन युपीआयचा वापर करत असलेले 75% हून अधिक ग्राहक मध्यम आणि लहान शहरांमधील आहेत, ज्यावरून युपीआय चा विकास दिसून येतो. स्थानिक दुकानांसोबतच, ॲमेझॉन ॲप मधील ॲमेझॉन पे चा आता ग्राहक त्यांचे फोन आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी, त्यांच्या संपर्कांना पैसे पाठविण्यासाठी, घरगुती कामगारांना पगार देण्यासाठी, Amazon.in वर खरेदी करण्यासाठी, आणि बऱ्याच गोष्टींसाठी वापर करू शकतात.

ग्राहक त्यांचे ॲमेझॉन प उघडून, ॲमेझॉन पे वर जाऊन, आणि काही सेकंदांमध्ये त्यांचे यूपीआय अकाऊंट सेट अप करून ॲमेझॉन पे यूपीआय चा वापर चालू करू शकतात, आणि 24×7 यूपीआय आणि ॲमेझॉन पे चा सोयीस्करपणा आणि सुरक्षा यांसह पेमेंट करू शकतात, आणि दररोजच्या रिवार्डचा आनंद घेऊ शकतात.