एंजल ब्रोकिंगने गुंतवणूक शिक्षण मंच ‘स्मार्ट मनी’ लाँच केला

स्मार्ट मनीमध्ये नवशिके, गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स या तिघांसाठीही माहिती आहे. या तिघांसाठी १० मोड्युल्स आणि १०० चॅप्टर्स सध्या आहेत. याअंतर्गत गुंतवणुकीची मूलभूत वैशिष्ट्यांपासून तात्त्विक आणि तांत्रिक विश्लेषणाची सखोल माहिती आहे. व्यवहार्य उदाहरणे, बॅज आणि प्रमाणपत्रे देऊन हे शिक्षण अधिक रंजक करण्यात आले आहे. स्

मुंबई : ट्रेडिंग आणि गुंतवणुकीत प्रावीण्य मिळवणे आता आणखी सोपे झाले आहे. कारण एंजल ब्रोकिंगने गुंतवणूकदारांना प्रशिक्षण देण्याकरिता शैक्षणिक मंच ‘स्मार्ट मनी’ची सुरुवात केली आहे. या मंचावर वैयक्तिकत मोड्युल्स, कार्यशाळा, प्रमाणपत्रे, लाइव्ह सेशन्स आणि क्वीजसह स्वत:च्या वेगासह शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. स्मार्ट मनी एक मजेदार शिक्षणाचा दृष्टीकोन तयार करते तसेच वापरण्यासाठी कुणालाही मोफत आहे. हा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत उपलब्ध आहे.

स्मार्ट मनीमध्ये नवशिके, गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स या तिघांसाठीही माहिती आहे. या तिघांसाठी १० मोड्युल्स आणि १०० चॅप्टर्स सध्या आहेत. याअंतर्गत गुंतवणुकीची मूलभूत वैशिष्ट्यांपासून तात्त्विक आणि तांत्रिक विश्लेषणाची सखोल माहिती आहे. व्यवहार्य उदाहरणे, बॅज आणि प्रमाणपत्रे देऊन हे शिक्षण अधिक रंजक करण्यात आले आहे. स्मार्ट मनीमध्ये प्रत्येक चॅप्टरच्या अखेरीस क्वीज देण्यात आली असून प्रमुख संकल्पना सहज लक्षात राहण्यासाठी ग्लॉसरीदेखील देण्यात आली आहे.

एंजल ब्रोकिंगचे सीएमओ प्रभाकर तिवारी म्हणाले, “भारत हा आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, जिथे बहुतांश लोक शेअर बाजाराच्या समूहात प्रवेश करत आहेत. यात पुढे कसे जायचे, यासाठी त्यांना एक दिशा हवी आहे. स्मार्ट मनी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, आम्ही ते प्राधान्याने केले आहे. या मंचावर वैयक्तिकृत दृष्टीकोन ठेवण्यात आला असून लोकांना हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. हा एक अंतर्ज्ञानी अनुभव असून पहिल्यांदा गुंतवणूक करणारे तसेच सराईत ट्रेडर्ससाठीही याचा उपयोग होईल. स्मार्ट मनी हा लोकांना दीर्घकाळापर्यंत मदत करत राहील तसेच गुंतवणुकीचे माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी मदत करत जास्तीत जास्त परतावे मिळवून देईल.”

एंजल ब्रोकिंगचे सीईओ विनय अग्रवाल म्हणाले, “कोणत्याही नव्या गुंतवणुकदाराच्या प्रवासात आर्थिक शिक्षण हा महत्त्वाचा घटक असतो. आज भारतात २ टीअर आणि ३ टीअर, तसेच त्याही पलिककडे असलेल्या रिटेल गुंतवणुकदारांची संख्या वाढत आहे. एंजल ब्रोकिंगमध्ये आम्ही ग्राहकांना जास्तीत जास्त सक्षम करण्यावर भर देतो. स्मार्ट मनी मंच लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. यासोबतच, आमच्या ट्रेडर्सची कौशल्ये अधिक वाढवण्यासाठी हे मदत करेल. तसेच पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्या मिलेनिअल्सना डीआयवाय फॅशनमध्ये संपत्ती निर्माण करण्याकरिता उपयुक्त ठरेल.”