iPhone सोबत चार्जर न देणं अ‍ॅपलला पडलं भलतंच भारी, भरावा लागणार 14 कोटींचा दंड; कारण ऐकून तुम्ही हैराण व्हाल

ब्राझीलच्या एजन्सीने दिशाभूल करणार्‍या जाहिराती, चार्जर्सविना डिव्हाइसची विक्री आणि अयोग्य नियमांबाबत चुकीची माहिती पसरवल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले आहे. अ‍ॅपलच्या या पुढाकाराने पर्यावरणाला काही फायदा होत नसल्याचे प्रोकॉन-एसपीने सांगितलं आहे.

    नवी दिल्ली : जगातील आघाडीची फोन निर्माता कंपनी अ‍ॅपलला आपल्या iPhone 12 सिरीज स्मार्टफोनसह चार्जर न देणे महागात पडले आहे. 9to5Google च्या रिपोर्टनुसार, ब्राझीलची ग्राहक संरक्षण एजन्सी प्रोकॉन-एसपीने अ‍ॅपलला 2 मिलियन डॉलर्स (सुमारे 14 कोटी रुपये) दंड ठोठावला आहे.

    ब्राझीलच्या एजन्सीने दिशाभूल करणार्‍या जाहिराती, चार्जर्सविना डिव्हाइसची विक्री आणि अयोग्य नियमांबाबत चुकीची माहिती पसरवल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले आहे. अ‍ॅपलच्या या पुढाकाराने पर्यावरणाला काही फायदा होत नसल्याचे प्रोकॉन-एसपीने सांगितलं आहे.

    आपल्या निर्णयामध्ये एजन्सीने अ‍ॅपलला विचारले आहे की, चार्जर काढून टाकल्यानंतर कंपनीने iPhone 12 ची किंमत कमी केली का? मात्र अद्याप अ‍ॅपलने यावर उत्तर दिलेले नाही आहे. चार्जरबरोबर आणि त्याशिवाय हँडसेटची किंमत किती होती आणि कंपनीने चार्जरचे उत्पादन कमी केले का, अशा प्रश्नांची उत्तरेही कंपनीने दिली नाहीत.

    चार्जर न देण्यामागे अ‍ॅपलने दिलं होत हे कारण

    अ‍ॅपलने 2020 मध्ये आपली iPhone 12 सिरीज लाँच केली होती. त्यावेळी कंपनीने यासोबत चार्जर देणार नसल्याचे जाहीर केले होते. चार्जर न देण्यामागे कंपनीने सागितलं होत की, कंपनी चार्जर न देऊन ई-कचऱ्याची(इलेक्ट्रॉनिक कचरा) समस्या कमी करीत आहे. ज्याने पर्यावरणाला फायदा होईल, असं सांगितलं होत.