
पनी नवीन M1 प्रोसेसरचा वापर यात करण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हा वर्षाच्या पहिल्या सहामाहीनंतर लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय या मॅकबुकसोबतच मॅगसेफ चार्जिंगही मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
दिग्गज कंपनी Apple या वर्षी 2021 मध्ये स्लिम डिझाइनचे नवीन डिव्हाइस सादर करणार आहे. हा कंपनीचा मॅकबुक एअर असणार आहे. हा मॅकबुक अधिक स्लिम आणि वजनाने अत्यंत हलका असणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. याचे वजन अवघे 1.29 किलोग्रॅम आणि जाडी 0. 63 इंच असण्याची शक्यता आहे.
सोबतच कंपनी नवीन M1 प्रोसेसरचा वापर यात करण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हा वर्षाच्या पहिल्या सहामाहीनंतर लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय या मॅकबुकसोबतच मॅगसेफ चार्जिंगही मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
लीक झालेल्या अहवालानुसार, Apple च्या नवीन मॅकबुक एअर मध्ये 13 इंचाची स्क्रिन असणार आहे, ज्याभोवती पातळ बेझल वापरली जातील. यावेळचे मॅकबुक हे अनेक वर्षांपर्यंत अपग्रेड करता येणार आहे.
तर ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, 2021 मॅकबुक एअर मॉडेलमध्ये मॅगसेफ चार्जिंग फीचर मिळेल. नवीन मॉडेलमध्ये दोन USB 4.0 पोर्ट मिळतील. मॅकबुक प्रो मॉडेलमध्ये SD कार्ड स्लॉटही मिळण्याची शक्यता आहे, याच्या मदतीने व्हिडिओ एडिटर्सना काम करणे सोपे होईल. अहवालात सांगितल्याप्रमाणे नवीन मॅकबुकमध्ये सेल्युलर कनेक्टिविटी आणि फेस आयडी सारखे फीचर्स असणार नाहीत. फेस आयडी फीचर देण्यासाठी कंपनीला यावर अजून काम करावं लागणार आहे.
अहवालानुसारच सांगायचं तर मॅकबुक एअर 15 इंच स्क्रिन साइझपर्यंत लाँच करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. म्हणजेच मॅकबुकमध्ये IPS टेक्नोलॉजी असलेला LED-बॅकलिट डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. सोबतच अहवालात असंही नमूद केलं आहे की, हा मॅकबुक आजवरचा सर्वात महागडा मॅकबुक असण्याची शक्यता आहे.