आजपासून सेल; विविध स्मार्टफोन्सवर 20 हजारांपर्यंत मिळणार बंपर डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

आजपासून Flipkart वर एक मोठा सेल सुरू होणार आहे. या सेलचे नाव Big Saving Days Sale असून या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट देण्यात येणार आहे. जाणून घेऊया सविस्तर डिटेल्स.

  नवी दिल्लीः फ्लिपकार्ट (Flipkart) ने 5 ऑगस्ट पासून आपला बिग सेविंग डेज सेल (Big Saving Days Sale) ची घोषणा केली आहे. हा सेल 9 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंत आणि टीव्ही आणि अप्लायन्सेजवर 75 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. यासोबतच मोबाइल आणि टॅबलेट वर नो कॉस्ट ईएमआय आणि अतिरिक्त एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. Mi 11 Lite, Moto G60, ROG Phone आणि Mi 10T सीरीजच्या फोनवर जबरदस्त डिल्स उपलब्ध होणार आहेत.

  बँक ऑफर्स

  ई-कॉमर्स कंपनी (Flipkart) या सेल मध्ये अॅक्सिस बँक कार्ड (Axis Bank Card) आणि ICICI Bankच्या क्रेडिट कार्ड युजर्संना १० टक्के तात्काळ डिस्काउंट देणार आहे.

  Asus ROG Phone 3

  आसूस आरओजी फोन 3 ची किंमत 39 हजार 999 रुपये आहे. या फोनवर 7 हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे. फोनची मार्केटमधील किंमत 46 हजार 999 रुपये आहे.

  Motorola Razr

  मोटोरोला रेजर तुम्हाला 20 हजार रुपयांच्या सूट सोबत खरेदी करता येईल. या फोनला या सेल मध्ये 54 हजार 999 रुपयात खरेदी करू शकता. या फोनची मार्केट किंमत 74 हजार 999 रुपये आहे.

  Mi 10T Series

  फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्ही Mi 10T या फोनला 24 हजार 499 रुपयांत खरेदी करू शकता. यात फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. फोनवर 2 हजार 42 रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआय वरही खरेदी करू शकता.