सॅमसंग कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटर घरी आणा आणि यंदाचा ‘दहीहंडी’ सण साजरा करा

दह्याचे भारतीय परंपरेमध्‍ये, तसेच पाककलेमध्‍ये खास स्‍थान आहे. दह्याचे आरोग्‍यविषयक फायदे असून सौंदर्यासाठी घरगुती उपाय म्‍हणून देखील दह्याचा वापर केला जातो. शतकांपासून दही व साखरेचे मिश्रण नवीन शुभारंभ किंवा शुभकार्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते.

  • जवळपास १५ टक्‍क्‍यांपर्यंत कॅशबॅक आणि सुलभ ईएमआय सुविधा मिळवा

नवी दिल्ली : यंदा सणासुदीचा काळ सॅमसंग कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटसह साजरा करा आणि दही बनवणाऱ्या जगातील पहिल्‍या रेफ्रिजरेटरमध्‍ये ‘दहीहंडी’ सणासाठी दही बनवा. सॅमसंग कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटर या सणासुदीच्‍या काळामध्‍ये जवळपास १५ टक्‍क्‍यांपर्यंत कॅशबॅक आणि सुलभ ईएमआय सुविधांसह आकर्षक फायनान्‍स पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध असणार आहे.

दहीहंडी साजरी करणे हा जन्‍माष्‍टमी सणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. हा सण साजरा करताना मातीच्‍या मडक्‍यामध्‍ये दही भरून ती हंडी उंचावर बांधण्‍यात येते आणि तरूण गोपाळांचा समूह मानवी थर रचत ती हंडी फोडण्‍याचा प्रयत्‍न करतात.

दह्याचे भारतीय परंपरेमध्‍ये, तसेच पाककलेमध्‍ये खास स्‍थान आहे. दह्याचे आरोग्‍यविषयक फायदे असून सौंदर्यासाठी घरगुती उपाय म्‍हणून देखील दह्याचा वापर केला जातो. शतकांपासून दही व साखरेचे मिश्रण नवीन शुभारंभ किंवा शुभकार्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते.

भारतीय ग्राहकांच्‍या गरजा समजून घेण्‍याच्‍या दृष्टिकोनासह सॅमसंगने भारतीय घरासाठी दही बनवण्‍याच्‍या संकल्‍पनेमध्‍ये क्रांती घडवून आणली आणि दही बनवणारा जगातील पहिला रेफ्रिजरेटर कर्ड माएस्‍ट्रो™ निर्माण करण्‍यात आला. या तंत्रज्ञानाने दही बनवण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल केला आहे आणि आता रेफ्रिजरेटरमध्‍ये सुलभतेने दही बनवता येते.

सॅमसंगची कर्ड माएस्‍ट्रो™ श्रेणी दही बनवताना होणारे श्रम दूर करण्‍यासाठी ग्राहकां‍करिता वरदान ठरली आहे. कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटरमधून हाताने स्‍पर्श न करता दही बनवता येते, ज्‍यामुळे सातत्‍यता व चवीबाबत तडजोड न करता आरोग्‍यदायी दही तयार होण्‍याची खात्री मिळते.

सॅमसंगने रेफ्रिजरेटर्सच्‍या २०२० श्रेणीचा भाग म्‍हणून दही बनवणारा जगातील पहिला फ्रॉस्‍ट फ्री रेफ्रिजरेटर लाँच केला. या रेफ्रिजेटरला मिळालेले भव्‍य यश पाहून २०२१ मध्‍ये डायरेक्‍ट कूल आणि साइड-बाय-साइड विभागामधील रेफ्रिजरेटर्स सादर करण्‍यात आले आहेत.

कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटर तुमच्‍या कुटुंबासोबत व्‍यतित करण्‍याच्‍या मौल्‍यवान वेळेमध्‍ये अडथळा न येण्‍याची खात्री घेतो. हा रेफ्रिजरेटर सात ते आठ तासांमध्‍ये – फिकट दह्यासाठी सात तास आणि घट्ट दह्यासाठी आठ तास–दही तयार करतो. दूध उकळवून थंड करावे आणि त्‍यामध्‍ये दही तयार करण्‍यासाठी लागणारे घटक मिश्रित करावे. कर्ड माएस्‍ट्रो™ सर्वात महत्त्वाचे काम म्‍हणजे किण्‍वन प्रक्रियेचे काम करतो. तो दहीचे किण्‍वन करण्‍यासह स्‍टोअर देखील करतो आणि जवळपास ३ दिवसांपर्यंत दह्याला ताजे ठेवतो.

कर्ड माएस्‍ट्रो™ प्रत्‍येकवेळी त्‍याच प्रक्रियेने दही बनवतो आणि विविध वातावरणीय स्थितींमध्‍ये दही बनवण्‍याच्‍या समस्‍यांचे निराकरण करतो.

कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटर ताजे, आरोग्‍यदायी, चविष्‍ट व हायजेनिक दही देतो आणि अधिक फूड स्‍टोरेज व फूड प्रीझर्व्‍हेशन ते फूड प्रीपरेशनसह भारतातील पारंपारिक रेफ्रिजरेटर स्थितीला नवीन स्‍तरावर घेऊन जातो. दही बनवण्‍याच्‍या प्रक्रियेला कर्नाल येथील आयसीएआर-नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट (एनडीआरआय)ची मान्‍यता मिळाली आहे.

रेफ्रिजरेटर व्‍यवसायामधील कर्ड माएस्‍ट्रो™ चे योगदान दुप्‍पटीने वाढले आहे आणि विभागाने मागील वर्षामध्‍ये ३०० टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे.

हा अर्थपूर्ण नवोन्‍मेष्‍कार वर्षानुवर्षे भारतीय ग्राहकांच्‍या गरजा सखोलपणे जाणून घेण्‍याच्‍या सॅमसंग इंडियाच्‍या ‘मेक फॉर इंडिया’ उपक्रमाचा भाग आहे आणि ग्राहकांना दही बनवताना होणा-या श्रम दूर करतो. यामुळे सॅमसंगला देखील रेफ्रिजरेटर विभागामधील ३३ टक्‍के एम/एससह पहिल्‍या क्रमांकाचे स्‍थान कायम राखण्‍यास आणि २०२१ मधील पोकळी अधिक व्‍यापकपणे भरून काढण्‍यास मदत झाली आहे.

जन्‍माष्‍टमी सण (दहीहंडी सण) जवळच आला आहे, ज्‍यामुळे हा नाविन्‍यपूर्ण डिझाइन रेफ्रिजरेटर खरेदी करण्‍यासाठी उत्तम काळ आहे. हा रेफ्रिजरेटर निश्चितच आपले जीवन अधिक सोईस्‍कर करतो.