china creates on nuclear powered artificial sun ten times more powerful than real
प्रतिकात्मक छायाचित्र

हा कृत्रिम सूर्य तयार करण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू होते. कृत्रिम सूर्याचा हा प्रकल्प यशस्वी झाल्याने चीनने विज्ञानाच्या दुनियेत मानाचे स्थान पटकावले असून आज इथवर अमेरिका, जपान सारख्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम देशांनाही मजल मारता आलेली नाही.

चीन तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगतीचे नव-नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनने अमेरिका, रशिया आणि जपान सारख्या विकसित देशांनाही मागे टाकले आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी अणूंचा वापर करून अणुभट्टीच्या सहाय्याने यशस्वीरित्या या कृत्रिम सूर्याची निर्मिती केली आहे. सूर्य खऱ्या सूर्यासारखाच असल्याचा या वैज्ञानिकांनी दावा केला आहे. हे अणूंचं असं फ्यूजन खऱ्या सूर्यापेक्षा कैक पटींनी उर्जा देणार असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी शुक्रवारी आपल्या अहवालात हा दावा केला आहे.

हा कृत्रिम सूर्य तयार करण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू होते. कृत्रिम सूर्याचा हा प्रकल्प यशस्वी झाल्याने चीनने विज्ञानाच्या दुनियेत मानाचे स्थान पटकावले असून आज इथवर अमेरिका, जपान सारख्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम देशांनाही मजल मारता आलेली नाही.

अणू संशोधनाचा चमत्कार

चीनच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, चीनने या प्रकल्पाची सुरूवात वर्ष २००६ मध्ये केली होती. चीनने कृत्रिम सूर्याला एचएल-2एम (HL-2M) नाव दिलं आहे. हा सूर्य चीनच्या राष्ट्रीय न्युक्लिअर कॉर्पोरेशनने साऊथवेस्टर्न इंस्टिट्यूट ऑफ फिजिक्सच्या वैज्ञानिकांनी एकत्र येत तयार केला आहे. प्रतिकूल वातावरणातही सौरऊर्जा तयार करता येऊ शकेल हा या प्रकल्पाचा उद्देश होता. कृत्रिम सूर्याचा प्रकाश हा प्रत्यक्षातल्या सूर्यापेक्षा कैक पटींनी अधिक असणार आहे. अणूच्या फ्युजनच्या मदतीने या सूर्याचे नियंत्रणही याच व्यस्थेतून करण्यात येणार आहे.

१५० दशलक्ष पर्यंत असेल तापमान

चीनच्या मीडियाने दावा केला आहे की, कृत्रिम सूर्याच्या कार्यप्रणालीत एक शक्तिशाली चुंबकीय क्षेत्राचा उपयोग करण्यात येतो. या दरम्यान हा १५० दशलक्ष म्हणजेच १५ कोटी डिग्री सेल्सियस तापमान तयार करू शकतो. पीपल्स डेलीने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रत्यक्षातल्या सूर्यापेक्षा १० पटींनी अधिक उष्ण आहे.

प्रत्यक्षातल्या सूर्याचे तापमान जवळपास १५ दशलक्ष डिग्री सेल्सिअस आहे. पृश्वीतलावर असलेल्या अणुभट्ट्यांबाबत बोलायचं झालं तर, या ठिकाणी उर्जा निर्माण करण्यासाठी विखंडन प्रकियेचा वापर करण्यात येतो. हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा उष्णता अणूंचे विभाजना करून उत्पन्न होते. परमाणु संलयन प्रत्यक्षात सूर्यावर होते आणि यावर आधारित चीनने एचएल -2 एम तयार केला आहे.

सिचुआनमध्ये झाली आहे निर्मिती

चीनच्या सिचुआन प्रांतात असलेल्या अणुभट्टीला नेहमीच कृत्रिम सूर्य असे संबोधले जाते. ही प्रत्यक्षातल्या सूर्याप्रमाणेच प्रचंड उष्णता आणि वीज निर्माण करते. चीनी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धीला दिलेल्या अहवालानुसार, अणुउर्जा फ्युजन एनर्जीचा विकास चीनच्या सामरिक उर्जा गरजांची पूर्तता करण्यासोबतच उर्जा आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला हातभार लावण्यास पूरक ठरणार आहे.

चीनने खर्च केलाय ‘एवढा पैसा’

संलयन प्राप्त करणे खूपच कठीण काम आहे. या प्रकल्पाची म्हणजेच आयटीईआरचे एकूण मूल्य २२.५ अब्ज डॉलर्स आहे. जगातील अनेक देश सूर्य तयार करण्याचा प्रयत्न करत होते पण, उष्ण प्लाज्मा एका ठिकाणी ठेवणे आणि त्यातून फ्युजनपर्यंत त्याच तापमानात ठेवणे हे खूपच जिकीरीचे काम होते.