china launches gaofen 14 earth observation satellite
आता चीन ठेवणार सगळ्या जगावर घारीसारखी नजर; लाँच केलाय अर्थ ऑब्जरवेशन उपग्रह

चंद्रावर ध्वज फडवल्यानंतर चीनने रविवारी एक अर्थ ऑब्जरवेशन उपग्रह लाँच केला आहे. गाओफेन- १४ असं या उपग्रहाचं नाव असून जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून जमिनीवरील वस्तूंचे हाय रिझोल्यूशन छायाचित्र टिपण्यासाठी सक्षम आहे.

पेइचिंग : चंद्रावर ध्वज फडविल्यानंतर चीनने रविवारी एक अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह लाँच केला आहे. गाओफेन -१४ असं या उपग्रहाचं नाव असून जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून जमिनीवरील वस्तूंचे हाय रिझोल्यूशन छायाचित्र टिपण्यासाठी सक्षम आहे. हा उपग्राह मार्च-३बी रॉकेटच्या माध्यमातून दक्षिण पश्चिम चीनच्या सिचुआन प्रांतातील शिचांग उपग्राह प्रक्षेपण केंद्रातून लाँच करण्यात आला.

अनेक कामे करणार चीनचा हा उपग्रह

गाओफेन-१४ एक ऑप्टिकल स्टिरियो मॅपिंग करणारा उपग्रह आहे. हा जगभरातील उच्च-गुणवत्तेची अचूक स्टिरिओ प्रतिमा हस्तगत करण्यास, मोठ्या प्रमाणात डिजीटल टॉपोग्राफिक नकाशे, डिजीटल उन्नतीकरण मॉडेल्स, डिजीटल पृष्ठभागावरील मॉडेल्स आणि डिजिटल ऑर्थोफोटो प्रतिमा तयार करण्यात आणि मूलभूत भौगोलिक माहिती प्रदान करण्यास सक्षम आहे.

ड्रॅगनची सैन्य शक्ती आणखी वाढणार

अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रहाचा प्रयोग सैन्य आणि असैनिकी दोन्ही प्रकारच्या कामांसाठी करता येऊ शकतो. या उपग्रहात अनेक हाय रिझोल्यूशन कॅमेरे बसविले आहेत. जे जमिनीवर तीन फूट उंचीवर स्थित एखाद्या वस्तूची हाय क्वालिटी छायाचित्रे टिपण्यास सक्षम आहे. भारत-अमेरिकेतील वाढत्या संकटांचा सामना करण्यासाठी चीनचे सैन्य याचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सप्टेंबरमध्ये चीनला बसला होता फटका

सप्टेंबर मध्ये चीनचा एक अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह मिशन लाँचिंग दरम्यान अयशस्वी झाले होते. जिलिन-१ गाओफेन ०२-सी उपग्रह जिकुआन उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून कुआझु-१ए रॉकेटमधून लाँच केला होता. या दरम्यान याचे रॉकेट तांत्रिक अडचणींमुळे अर्ध्या वाटेवरच नष्ट झाले होते.

३ डिसेंबरला चीनने चंद्रावर फडकवला होता ध्वज

चीनचे चंद्रयान चांग ई-५ ने ३ डिसेंबरला चंद्रावर आपला राष्ट्रीय ध्वज फडकविला होता. यासोबतच अमेरिकेनंतर चीन जगातला दुसरा असा देश ठरला आहे ज्याचा ध्वज चंद्रवर पोहोचला आहे. चीनच्या अंतराळ यानाला चंद्रावर पोहोचविण्यासाठी लांग मार्च-५ रॉकेटचा वापर करण्यात आला होता. चीनने यापूर्वीच चंद्रावरच्या दोन मोहिमा केल्या आहेत. यात चेंग-ई-३ नावाचे स्पेसक्राफ्ट २०१३ मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले होते. तर जानेवारी २०१९ मध्ये चेंग-ई-४ चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर आणि यूटू-२ रोवरसह उतरले होते. ही मोहीम आजही सुरूच आहे असं सांगण्यात येत आहे.