citi in a machine will check the lungs of corona patients in 16 seconds
'या' मशीनमुळे कोरोना रूग्णांच्या फुफ्फुसाची तपासणी होणार १६ सेकंदात

कोरोना बाधित रूग्णाच्या फुफ्फूसाची तपासणी केवळ १६ सेकंदात करता येणार असून यामुळे रूग्णाचे लवकर निदान होण्यास मदत होणार आहे. 'सीटी इन ए बॉक्स' मशिनमुळे हे शक्य झाले असून यामुळे संसर्गाला पसरण्यापासून देखील रोखता येणे शक्य होणार आहे.

मुंबई : कोरोना बाधित रूग्णाच्या फुफ्फूसाची तपासणी केवळ १६ सेकंदात करता येणार असून यामुळे रूग्णाचे लवकर निदान होण्यास मदत होणार आहे. ‘सीटी इन ए बॉक्स’ मशीनमुळे हे शक्य झाले असून यामुळे संसर्गाला पसरण्यापासून देखील रोखता येणे शक्य होणार आहे. शिवया या मशिनमुळे आता इतर संसर्गजन्य आजारांसाठी आवश्यक सिटी स्कॅन चाचण्या ही करता येणार आहेत.

मुंबई प्रदेश महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथील मैदानावर भव्य कोविड केंद्र उभारले आहे. या केंद्रात आतापर्यंत हजारो कोरोना बाधितांवर उपचार कऱण्यात आले. कोरोना रूग्णांचे निदान व व्यवस्थापन करण्यासाठी कोविड केंद्रात ‘सीटी इन ए बॉक्स’ हे अत्याधुनिक मशीन नुकतेच दाखल झाले. देशातील हे पहिलं अत्याधुनिक मशीन आहे ज्यात फुफ्फुसाची तपासणी केवळ १६ सेकंदात होऊ शकते.

या मशीनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. रूग्णाच्या तपासणी दरम्यान आणीबाणी उद्भवल्यास ‘पेशंट स्कॅन मोड’ सुविधा आहे. मशिनच्या मदतीने फुफ्फुसाची तपासणी करतांना वैद्यकीय कर्मचारी रूग्णाच्या थेट संपर्कात येत नाही. या सुविधेमुळे सामाजिक अंतर राखणे शक्य होत असल्याने सुरक्षित वातावरणात कोरोना रूग्णांचे उत्कृष्ट निदान तसेच सुविधांची उपलब्धता करण्यास मदत होते. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पालिकेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

अनेक सामाजिक संघटना देखील पालिकेला मदत करत आहेत. त्यांच्या मदतीने पालिकेने कोरोना बाधित व इतर रूग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी उपचार व्यवस्थेतही वाढ केली आहे. सामाजिक संघटनांच्या सहर्यानेच ‘सीटी इन ए बॉक्स’ सुविधा उपलब्ध करण्यात आली असून पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.

डॉक्टरांना घरबसल्या अहवाल तपासणे शक्य होणार

सिटीस्कॅन मशीन अत्याधुनिक असून अत्यंत जलद सिटीस्कॅन यामध्ये होत आहेत. हे मशीन कंटेनर मध्ये असून मोबाईल पोर्टेबल आहे. त्यामुळे ते कोणत्याही रुग्णालयात हलवता येईल. २० ते २२ मिनिटात एक सिटीस्कॅन होते. एच आर, कार्डियाक, काँट्रास, ब्रेन असे अनेक सिटीस्कॅन यात होतात. यात सर्व ३४ स्लाईड असून सेंट्रली कनेक्टेड असल्याने डॉक्टरांला इन्फेक्टेड एरियामध्ये थांबण्याची गरज लागणार नाही डॉक्टर मोबाइल वर रिपोर्ट बघूनही उपचार सांगू शकतात अशी माहिती बीकेसी कोविड केंद्राचे प्रमुख डॉ.राजेश डेरे यांनी दिली.