मायक्रोसॉफ्टने महाराष्ट्रासाठी आयोजित केलेल्या ‘डिजिटल गव्हर्नन्स स्टेट रोडशो’ मध्ये क्लाऊड, डेटा आणि एआय यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल परिवर्तनपर विषय केंद्रस्थानी

भारतातील प्रशासकीय कामकाजाचे डिजिटल परिवर्तन करण्याकरिता क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा आणि एआय प्रस्तावित सेवा, यासारख्या तंत्रज्ञानाचे महत्व आणि संधीवर विचार-विमर्श करण्यासाठी, 'डिजिटल गव्हर्नन्स स्टेट रोडशो' हे ज्ञानाची देवाणघेवाण करणारे एकमेव असे व्यासपीठ आहे.

  • महाराष्ट्रातील डिजिटल गव्हर्नन्सचे भवितव्य यावर चर्चा घडविण्यासाठी राज्य सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमातील अधिकाऱ्यांना एकत्र आणले
  • महाराष्ट्रातील डिजिटल परिवर्तन यशस्वी होण्याकरिता आवश्यक असणारी महत्वाची डिजिटल कौशल्ये आणि तंत्रज्ञान याकरिता भागीदारी करण्याचे दिले वचन

मुंबई : भारतातील डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी सार्वजनिक उपक्रमांसोबत भागीदारी करण्यास बांधील असणाऱ्या, मायक्रोसॉफ्ट इंडिया या कंपनीने महाराष्ट्र राज्याकरिता ” डिजिटल गव्हर्नन्स स्टेट रोडशो” या पहिल्या आभासी चर्चासत्राचे आयोजन केले. त्यानिमित्ताने राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक कंपन्यांचे प्रमुख, औद्योगिक संस्था आणि तज्ञ या कार्यक्रमासाठी एकत्र आले.

त्यामध्ये ई-गव्हर्नन्स, शिक्षण, शहरी विकास, सायबर सुरक्षा आणि नागरिक संपर्क सारख्या राज्याच्या प्राध्यान्य क्षेत्रांमधील क्लाऊड, डेटा आणि एआय यांचा प्रभाव आणि एकत्रीकरण या विषयावरील चर्चेत त्यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन करतानाच, राज्याच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान आणि साधने उपलब्ध करून देण्याकरिता राज्य शासनासोबत सहकार्य करण्यास बांधील असल्याचे मायक्रोसाफ्टने यावेळी स्पष्ट केले.

भारतातील प्रशासकीय कामकाजाचे डिजिटल परिवर्तन करण्याकरिता क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा आणि एआय प्रस्तावित सेवा, यासारख्या तंत्रज्ञानाचे महत्व आणि संधीवर विचार-विमर्श करण्यासाठी, ‘डिजिटल गव्हर्नन्स स्टेट रोडशो’ हे ज्ञानाची देवाणघेवाण करणारे एकमेव असे व्यासपीठ आहे. वेगवान आणि चपळ मार्गाने नूतनीकरण करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात समस्या सोडविण्यासाठी आणि नागरिकांकरिता सार्वजनिक सेवांचे परिवर्तन करण्यासाठी एआयची शक्ती आणि क्लाऊड हे तंत्रज्ञान जगभरातील सार्वजनिक उपक्रमांमध्ये वापरले जात आहे.

आपल्या देशाची मूलभूत गरज लक्षात घेऊन, आर्थिक व सामाजिक प्रगतीला गती देण्यामध्ये तंत्रज्ञान कशी महत्वाची भूमिका घेऊ शकते, यावर चर्चा करण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट आपल्या ‘डिजिटल गव्हर्नन्स स्टेट रोडशोद्वारे, देशातील विविध राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील अधिकाऱ्यांना एकत्र आणते.

या चर्चासत्राचे उदघाटन करताना, गृह, गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कामकाज, माजी सैनिक कल्याण विभागाचे राज्यमंत्री ना. सतेज पाटील यांनी सांगितले कि, “आपल्या डिजिटल पायाभूत सुविधा आणि ई-गव्हर्नन्स यंत्रणेला भक्कम करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर महाराष्ट्र शासनाने नेहमीच लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली विविध विभागांमध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शेतकऱ्यांच्या कर्ज माफी योजनेसाठी आम्ही एक ऑनलाईन पोर्टल विकसित केले आणि डिजिटल परिवर्तनाचा वापर करून सुमारे ३४ लाखांपेक्षा जास्त कर्ज खात्यांची परतफेड केली आहे.

योजनांची अंमलबजावणी, सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्सचे मजबुतीकरण आणि ब्लॉकचेनच्या विकासात गुंतलेली स्टार्टअप्स यांच्यावर लक्ष केंद्रित करणारे विविध डिजिटल उपक्रम जोरदारपणे राबविले जात आहेत. देशात सर्वात जास्त मागणी असलेली, आपली ई-गव्हर्नन्स यंत्रणा यशस्वी करण्यासाठी, विविध विभाग अभिनव तंत्रज्ञान आणि साधनांचा उत्कृष्ट वापर कशाप्रकारे करीत आहेत, यावर चर्चा करण्याकरिता ‘स्टेट रोडशो’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक समभागीदारांना एकत्र आणील, असा माझा ठाम विश्वास आहे. ही चर्चसत्राची मालिका महाराष्ट्रापासून सुरुवात केल्याबद्दल मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मी कौतुक करतो, तसेच सरकारसाठी आणि आम जनतेसाठी डिजिटल सुविधा अधिकाधीक भक्कम, सुरक्षित, सुलभ आणि अनुकूल करण्यासाठी सातत्याने नवनिर्मिती करावी आणि पुढे यावे, असे मी मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांना आवाहन करतो,” असेही ते म्हणाले.

आपल्या प्रास्तविकामध्ये बोलताना, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सार्वजनिक उपक्रम विभागाचे कार्यकारी संचालक नवतेज बाल यांनी सांगितले कि, गतवर्षात भारतातील सार्वजनिक क्षेत्राने प्रचंड चपळता, नाविन्यता आणि लवचिकता दाखविली आहे, समस्यांचे निराकरण केले आहे तसेच नागरी सेवांची निरतंरता सुनिश्चित केली आहे. ही लवचिकता आणि प्रतिक्रियेला सक्षम करण्यामध्ये तंत्रज्ञानाने प्रमुख भूमिका बजावली आहे. तंत्रज्ञानावर आधारित विकास आणि नवनिर्मितीची अमंलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्रा सारख्या आघाडीच्या राज्यात, डिजिटल गव्हर्नन्स स्टेट रोडशो या उपक्रमाची सुरुवात होणे हे आमचे सौभाग्य आहे. कार्यक्षम, पारदर्शक आणि उत्पादक कारभारासाठी डेटा, एआय आणि क्लाउड तंत्रज्ञानाचा फायदा करून घेण्याकरिता सरकारी अधिकाऱ्यांना अधिक बळकट बनविण्यासाठी देशभरातील राज्य सरकारांसोबत एकत्र येऊन आम्ही काम करू, अशी आशा मी व्यक्त करतो,” असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील अधिका-यांच्या सहभागाने पॅनेल चर्चासत्र, महत्वपूर्ण चर्चा आणि एक कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्राचे लोकायुक्त संजय भाटिया, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव व राज्याच्या परिवहन आणि बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, वित्त विभागाचे प्रधान सचिव डॉ. राजगोपाल देवरा, राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह अन्य वक्त्यांचा समावेश होता. ई-गव्हर्नन्सच्या भवितव्याबाबत महाराष्ट्राचा दृष्टिकोन, प्रशासनासाठी डिजिटल परिवर्तन आणि नवनिर्मिती, स्मार्ट शहरी पायाभूत प्रकल्पांकरिता तंत्रज्ञानाचा वापर, नागरी विकासामध्ये डेटा आणि विश्लेषणाचे महत्व, तसेच सायबर सुरक्षेबाबतचा दृष्टिकोन या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.

देशातील केंद्र आणि राज्य शासनाच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्याकरिता, महत्वाची डिजिटल कौशल्ये आणि तंत्रज्ञान वितरित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनी त्यांच्यासोबत एकत्रितपणे कार्यरत आहे. तसेच त्यासाठी कंपनीने भारतातील प्रशासकीय परिस्थितिकीच्या डिजिटल परिवर्तनामध्ये सखोल गुंतवणूक केली आहे.