“भारताचे अभिनंदन!” जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कने केले इस्रोचे अभिनंदन ; जाणून घ्या विशेष कारण

गगनयान हा भारताचा महत्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रम आहे, ज्या अंतर्गत भारत आपले पहिले मानवनिर्मित अवकाशयान अंतराळात पाठवेल. इस्रोने निवेदनात म्हटले आहे की, गगनयान कार्यक्रमासाठी इंजिन पात्रता आवश्यकतेचा भाग म्हणून जीएसएलव्ही एमके ३ वाहनाच्या एल ११० द्रव अवस्थेसाठी ही चाचणी घेण्यात आली.

  वॉशिंग्टन : भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) बुधवारी आपल्या गगनयान कार्यक्रमाशी संबंधित एक मोठी चाचणी यशस्वीरित्या घेतली. यासाठी, इस्रोला जगातील दुसरा श्रीमंत माणूस आणि स्पीक्सएक्स आणि टेस्लासारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क यांचा अभिनंदन संदेश मिळाला. इस्रोने विकास इंजिनची तिसरी दीर्घ-कालावधीची थर्मल चाचणी यशस्वीरित्या घेतली.

   

  या इंजिनचा उपयोग गगनयान मिशन सुरू करण्यासाठी केला जाईल. इस्रोने ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली. इस्रोच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मस्कने लिहिले, “भारताचे अभिनंदन! मस्क यांनी भारतीय ध्वजाचे इमोजी पोस्ट करत असे सांगितले.

  हा आहे गगनयान कार्यक्रम
  गगनयान हा भारताचा महत्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रम आहे, ज्या अंतर्गत भारत आपले पहिले मानवनिर्मित अवकाशयान अंतराळात पाठवेल. इस्रोने निवेदनात म्हटले आहे की, गगनयान कार्यक्रमासाठी इंजिन पात्रता आवश्यकतेचा भाग म्हणून जीएसएलव्ही एमके ३ वाहनाच्या एल ११० द्रव अवस्थेसाठी ही चाचणी घेण्यात आली. तामिळनाडूच्या महेंद्रगिरी इस्त्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स (आयपीआरसी) येथे चाचणी केंद्रात हे इंजिन २४० सेकंदासाठी प्रक्षेपित करण्यात आले.

  रशियामध्ये प्रशिक्षण दिले जात आहे
  GSLV Mk III चा उपयोग गगनयानच्या प्रारंभासाठी केला जाईल. इस्रोने याची यशस्वी चाचणी घेतली आहे. जून २०१९ मध्ये इस्रोने रशियाच्या ग्लाव्हकोसमोसबरोबर करार केला होता ज्यात उमेदवारांची निवड, क्लिनिकल चाचण्या आणि अंतराळ चाचण्यांचा समावेश होता. सोयुज मानवयुक्त अंतराळ यंत्रणेचे बारकाईने ज्ञान घेताना अंतराळवीरांना अल्पकालीन वजनविरहितपणाचे प्रशिक्षण दिले जात आहे.