couple challenge can be dangerous on social media Cyber police caution appeal

फेसबुक या सोशल प्लॅटफॉर्मने सध्या जोडप्यांना वेड लावले. अगदी सत्तर वर्षांच्या जोडप्यांपासून ते नवदांपत्य फेसबुकवरील 'कपल चॅलेंज' स्वीकारले आहे. फेसबुकवरील 'कपल चॅलेंज' या 'हॅश टॅग'खाली दांपत्य धडाधड छायाचित्र अपलोड करत सुटले आहेत.

  • तुम्हाला आर्थिक फटकाही बसण्याची शक्यता अधिक

नागपूर (Nagpur) : फेसबुक (facebook) या सोशल प्लॅटफॉर्मने (social platform) सध्या जोडप्यांना (couples) वेड लावले. अगदी सत्तर वर्षांच्या जोडप्यांपासून ते नवदाम्पत्यांनी फेसबुकवरील ‘कपल चॅलेंज’ (couple challenge) स्वीकारले आहे. फेसबुकवरील ‘कपल चॅलेन्ज’ या ‘हॅश टॅग’ (hashtag) खाली दाम्पत्य धडाधड छायाचित्र अपलोड करत सुटले आहेत.

छायाचित्र अपलोड करण्यापूर्वी थांबा, साधव रहा. तुमच्या प्रोफाइलवर सायबर गुन्हेगारांची पाळत आहे. तुम्ही अपलोड केलेले छायाचित्र धोकादायक व मानहानीकारक ठरू शकते. आर्थिक फटकाही तुम्हाला बसण्याची शक्यता अधिक आहे. फेसबुकवर छायाचित्र अपलोड करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला सायबर पोलिसांनी (cyber police) दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून फेसबुकवर कपल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज, सिंगल चॅलेंज, खाकी चॅलेंज, डॉटर चॅलेंज आदी ‘हॅशटॅग’ वापरून छायाचित्र अपलोड करण्याची स्पर्धाच लागली आहे. अनेक जण पत्नीसोबतचे विविध ठिकाणी काढलेले छायाचित्र कपल चॅलेंज , फॅमिली चॅलेंज या हॅशटॅग खाली फेसबुकवर अपलोड करीत आहेत. मात्र वेळीच सावध न झाल्यास सायबर गुन्हेगार या छायाचित्रांना मॉर्फ करुन आपली बनावट प्रोफाइल तयार करुन त्यावर आपल्या आवडत्या व्यक्तीचे अश्लील छायाचित्र अपलोड करु शकतात. त्याद्वारे आपल्याला ब्लॅकमेलही करु शकतात. वेळीच सवाध न झाल्यास आपल्याला हातात पश्चातापाशिवाय काहीच राहणार नाही.

एका सर्चमध्ये लाखो छायाचित्रे couple challenge

फेसबुक या समाज माध्यमावर कपल चॅलेन्ज नावाने सर्च केल्यास एकाच वेळी लाखो दाम्पत्याचे छायाचित्र दिसून येतात. अगदी सहज उपलब्ध होत असलेल्या या छायाचित्रांचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. छायाचित्र मॉर्फ एडिट करुन गुन्हेगार आवडत्या व्यक्तीचे अश्लील छायाचित्र तयार करतात त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही घडण्याची शक्यता आहे. नागपुरात समाजमाध्यमांवरील छायाचित्रांचा वाप करुन ब्लॅकमेल करण्याच्या सुमारे साडेतीनशे तक्रारी आल्या असून एकूण सायबर गुन्ह्यांची संख्या साडेतीन हजारांपेक्षा अधिक आहे.

सावधगिरी बाळगा caution appeal

समाजमाध्यमांवर छायाचित्र अपलोड करताना युझर्सने सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. समाजमाध्यम हे टाइमपासचे साधन आहे. विविध ठिकाणचे छायाचित्र अपलोड करुन आपण सायबर गुन्हेगारांना नकळत आपल्या आर्थिक परिस्थितीची माहिती करुन देतो. छायाचित्राद्वारे गुन्हेगार आपली परिस्थिती ओळखून आपल्याला ब्लॅकमेल करु शकतो. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्यात येत आहे. समाजमाध्यमांवर छायाचित्र अपलोड करताना काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक बागुल यांनी केले आहे.