‘या’ योजनेअंतर्गत ग्राहकांना एकच नंबरवर वेगवेगळ्या सेवांचा एकच रिचार्ज करता येणार , एअरटेलची मोठी घोषणा

एअरटेलने ग्राहकांची ही अडचण लक्षात घेऊन, भारतातील पहिली ऑल इन वन सोल्युशन योजना आणली आहे. यामध्ये डीटीएच, मोबाईल, फायबरच्या सेवांचा एकच ग्राहक क्रमांक असेल. आणि सर्व सेवांसाठी एकच रिचार्ज असेल.

  मुंबई : एअरटेल ब्लॅक Airtel Black या योजनेअंतर्गत ग्राहकांना एकच ग्राहक नंबरवर वेगवेगळ्या सेवांचा एकच रिचार्ज करता येणार आहे. देशातील प्रमुख दुरसंचार क्षेत्रातील कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे.

  आजकाल अनेक कुटूंबांमध्ये एकाच कंपनीचे मोबाईल सिम, डीटीएच, फायबर सेवा सुरू असतात. त्यांचे वेगवेगळे रिचार्ज वेगवेगळ्या तारखेला संपतात. एअरटेलने ग्राहकांची ही अडचण लक्षात घेऊन, भारतातील पहिली ऑल इन वन सोल्युशन योजना आणली आहे. यामध्ये डीटीएच, मोबाईल, फायबरच्या सेवांचा एकच ग्राहक क्रमांक असेल. आणि सर्व सेवांसाठी एकच रिचार्ज असेल.

  ऑल इन वन 2099 रुपये दर महिना
  3 मोबाईल कनेक्शन
  1 फायबर कनेक्शन
  1 डीटीएच कनेक्शन

  फायबर + मोबाईल 1598 रु. दर महिना
  2 मोबाईल कनेक्शन
  1 फायबर कनेक्शन

  डीटीएच + मोबाईल 1349 रु. दर महिना
  3 मोबाईल