यंदा Ganesh Chaturthi ला सॅमसंग कन्‍झ्युमर ड्युरेबल्‍ससह घराला सुशोभित करा; जवळपास २० टक्‍क्‍यांपर्यंत Cashback आणि ९९० रूपये इतक्‍या कमी सुलभ EMI चा लाभ मिळवा

निवडक वॉशिंग मशिन्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १२ वर्षांची मोटर वॉरंटी मिळेल. निवडक रेफ्रिजरेटर्सवर ग्राहकांना एका ईएमआयवर सूट मिळू शकते. मायक्रोवेव्‍ह्जच्‍या निवडक मॉडेल्‍सच्‍या खरेदीवर ग्राहकांना कॉम्प्लिमेंटरी बोरोसिल किट मिळेल. शेवटचे म्‍हणजे निवडक एअर कंडिशनर्सच्‍या खरेदीवर ग्राहक मोफत इन्‍स्‍टॉलेशनचा लाभ घेऊ शकतात.

    मुंबई : गणेश चतुर्थीचा शुभ सण साजरा करताना सॅमसंग या भारताच्‍या सर्वात विश्‍वसनीय ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने आज त्‍यांचे टेलिव्हिजन्‍स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, मायक्रोवेव्‍ह्ज आणि एअर कंडिशनर्सवर आकर्षक ऑफर्सची घोषणा केली. सणाच्‍या आनंदामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत सॅमसंगने आकर्षक फायनान्‍स ऑफर्स सादर केल्‍या आहेत, जसे जवळपास २० टक्‍के अतिरिक्‍त कॅशबॅक आणि ९९० रूपये इतका कमी सुलभ ईएमआय. या ऑफर्स महाराष्‍ट्रामध्‍ये २१ सप्‍टेंबर २०२१ पर्यंत वैध असतील.

    या अद्वितीय ऑफर्स क्‍यूएलईडी टीव्‍ही, स्‍पेसमॅक्‍स फॅमिली हब रेफ्रिजरेटर, कर्ड माएस्‍ट्रो रेफ्रिजरेटर, फुली ऑटोमॅटिक फ्रण्‍ट लोड व टॉप लोड वॉशिंग मशिन्‍स, मायक्रोवेव्‍ह्ज आणि एअर कंडिशनर्स अशी सॅमसंग ग्राहकोपयोगी उत्‍पादने खरेदी करणा-या ग्राहकांना खात्रीदायी लाभ देतात.

    निवडक सॅमसंग टेलिव्हिजन्‍स खरेदी करणा-या ग्राहकांना सॅमसंग साऊंडबार्सवर जवळपास ५० टक्‍के सूट मिळू शकते. तसेच त्‍यांना निवडक टेलिव्हिजन्‍सवर २ वर्षांची वॉरंटी आणि १० वर्षांची नो-स्क्रिन बर्न इन वॉरंटी देखील मिळेल.

    निवडक वॉशिंग मशिन्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १२ वर्षांची मोटर वॉरंटी मिळेल. निवडक रेफ्रिजरेटर्सवर ग्राहकांना एका ईएमआयवर सूट मिळू शकते. मायक्रोवेव्‍ह्जच्‍या निवडक मॉडेल्‍सच्‍या खरेदीवर ग्राहकांना कॉम्प्लिमेंटरी बोरोसिल किट मिळेल. शेवटचे म्‍हणजे निवडक एअर कंडिशनर्सच्‍या खरेदीवर ग्राहक मोफत इन्‍स्‍टॉलेशनचा लाभ घेऊ शकतात.

    ”सणासुदीच्‍या काळामध्‍ये ग्राहक त्‍यांचे घर सुशोभित करण्‍यासाठी नवीन व स्‍मार्टर तंत्रज्ञानांसह अपग्रेड होऊ पाहतात. ग्राहक-केंद्रित ब्रॅण्‍ड असल्‍यामुळे आमचा ग्राहकांसाठी अद्वितीय तंत्रज्ञान सादर करण्‍यावर भर आहे. सॅमसंग सर्वोत्तम उत्‍पादने वितरित करण्‍याशी कटिबद्ध आहे आणि आमच्‍या नवीन ऑफर्स किफायतशीर दरातील उत्‍पादनांच्‍या व्‍यापक श्रेणीवर खात्रीदायी लाभ देतात. ग्राहक मूल्‍यतत्त्वाला अधिक प्राधान्‍य देत असताना आमचा विश्‍वास आहे की, या अद्वितीय ऑफर्स त्‍यांच्‍या अपेक्षांची पूर्तता करतील आणि अर्थपूर्ण नवोन्‍मेष्‍कारासह त्‍यांचे जीवन संपन्‍न करतील,” असे सॅमसंग इंडियाच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्‍यवसायाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष राजू पुल्‍लन म्‍हणाले.

    सॅमसंगची वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन श्रेणी

    सॅमसंग क्‍यूएलईडी टेलिव्हिजन्‍स

    सॅमसंगचा क्‍यूएलईडी टीव्‍ही प्रिमिअम टीव्‍ही व कौटुंबिक मनोरंजनाचा स्‍तर उंचावतो. या टीव्‍हीमध्‍ये आकर्षक डिझाइनला साजेशी अशी सर्वात प्रगत पिक्‍चर क्‍वॉलिटी आहे. यामधील क्‍वॉन्‍टम डॉट तंत्रज्ञान टीव्‍हीची ब्राइटनेस पातळी वाढवते आणि प्रखर व सुस्‍पष्‍ट रंगसंगतींची निर्मिती करत निर्मात्‍यांना अपेक्षित असे प्रेक्षकांना उत्तम व्हिज्‍युअल अनुभव देते. क्‍यूएलईडी टीव्‍हींमध्‍ये ऑब्‍जेक्‍ट ट्रॅकिंग साऊंड (ओटीएस) आणि अॅक्टिव्‍ह वॉईस अॅम्‍प्‍लीफायर (एव्‍हीए) देखील आहे, ज्‍यामधून घरामध्‍येच सिनेमॅटिक अनुभव मिळण्‍याची खात्री मिळते. यासोबतच वन रिमोट कंट्रोलवरील नवीन बिक्‍स्‍बी व अॅलेक्‍सा वैशिष्‍ट्यासह युजर्सना वॉईस कंट्रोलची उत्तम सुविधा मिळते. अतिरिक्‍त कनेक्‍टर्स किंवा जटिल सेटअप्‍सशिवाय सर्व कनेक्‍टेड डिवाईसेसना कनेक्‍शन्‍सची खात्री मिळते.

    सॅमसंग स्‍पेसमॅक्‍स फॅमिली हब

    स्‍पेसमॅक्‍स फॅमिली हब संपूर्ण कुटुंबासाठी किचनला कनेक्‍टेड लिव्हिंग फन झोनमध्‍ये बदलतो. स्‍मार्टथिंग्‍ज इकोसिस्टिमसह कार्य करणारे होम कंट्रोल वैशिष्‍ट्य ग्राहकांना फॅमिली हब स्क्रिनमधून त्‍यांच्‍या कनेक्‍टेड अप्‍लायन्‍सेसवर नियंत्रण व देखरेख ठेवण्‍याची सुविधा देते. फूड मॅनेजमेंट वैशिष्‍ट्य दरवाजा उघडण्‍याशिवाय कधीही, कुठूनही फ्रिजचा आतील भाग पाहण्‍याची सुविधा देते. कौटुंबिक धमाल कधीच न थांबण्‍याच्‍या खात्रीसाठी होम एंटरटेन्‍मेंट उच्‍च दर्जाच्‍या स्‍पीकर्समधून संगीत ऐकण्‍याचा आनंद देते आणि या वैशिष्‍ट्याच्‍या माध्‍यमातून फॅमिली हब स्क्रिनवर स्‍मार्टफोनमधील कन्‍टेन्‍ट किंवा टीव्‍हीवरील मनोरंजन पाहता येते. कुटुंबासोबत व्‍यतित केला जाणारा वेळ अधिक सर्वसमावेशक करण्‍यासाठी कुटुंबातील सदस्‍य रेफ्रिजरेटर्सच्‍या टचस्क्रिनवरील दि फॅमिली कनेक्‍शन वैशिष्‍ट्याचा वापर करत त्‍यांचे वेळापत्रक ठरवू शकतात, फोटो शेअर करू शकतात आणि मजकूर संदेश पाठवू शकतात. ब्‍ल्‍यूटूथसह तुम्‍ही किचनमध्‍ये कूकिंग किंवा बेकिंग करताना कोणताही कॉल चुकवणार नाहीत. सॅमसंगचे वॉईस असिस्‍टण्‍ट बिक्‍स्‍बी व्‍यक्‍तीचे आवाज ओळखते आणि संदर्भांनुसार वैयक्तिकृत माहिती देते.

    सॅमसंग कर्ड माएस्‍ट्रो रेफ्रिजरेटर्स

    रेफ्रिजरेटर्सची कर्ड माएस्‍ट्रो रेंज सॅमसंगच्‍या ‘मेक फॉर इंडिया’ नाविन्‍यतांचा भाग आहेत आणि कंपनीला वर्षानुवर्षे भारतीय ग्राहकांच्‍या गरजांबाबत असलेल्‍या सखोल माहितीमधून ही रेंज तयार करण्‍यात आली आहे. हे रेफ्रिजरेटर्स दही बनवण्‍याच्‍या त्रासाला दूर करतात आणि फूड प्रीझर्व्‍हेशनपासून फूड प्रीपरेशनपर्यंत रेफ्रिजरेटरच्‍या पारंपारिक वापरामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. कर्ड माएस्‍ट्रो प्रत्‍येकवेळी त्‍याच प्रक्रियेने आरोग्‍यदायी व शुद्ध दही बनवतो आणि विविध वातावरणीय स्थितींमध्‍ये दही बनवण्‍याच्‍या समस्‍यांचे निराकरण करतो. सॅमसंगच्‍या कर्ड माएस्‍ट्रो रेफ्रिजरेटर्समधील दही बनवण्‍याच्‍या प्रक्रियेला कर्नाल येथील आयसीएआर- नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट (एनडीआरआय)ची मान्‍यता मिळाली आहे.

    सॅमसंग मायक्रोवेव्‍ह्ज

    सॅमसंगने खास भारतासाठी बनवण्‍यात आलेल्‍या मायक्रोवेव्‍ह ओव्‍हन्‍समध्‍ये नाविन्‍यता आणत भारतीय कूकिंगमध्‍ये क्रांतिकारी बदल आणला आहे. ग्राहक आता नवीन मायक्रोवेव्‍ह रेंजमध्‍ये रोटी/नान व दहीसह मसाला, तडका आणि सन-ड्राय फूड तयार करू शकतात.

    सॅमसंग विंडफ्री एसी ३.०

    सॅमसंगची विंड-फ्री ३.० यंत्रणा २३,००० सूक्ष्‍म-छिद्रांचा वापर करत खोलीच्‍या कानाकोप-यापर्यंत हवा पसरवते, ज्‍यामुळे संपूर्ण खोलीमध्‍ये थंडावा जाणवतो. इष्‍ट तापमानापर्यंत पोहोचल्‍यानंतर यंत्रणा एकसमान ताजी हवा पसरवते. विंड-फ्री ३.० यंत्रणा युजर्सना वाय-फायच्‍या माध्‍यमातून बिक्‍स्‍बीचा वापर करत त्‍यांच्‍या एसींवर नियंत्रण ठेवण्‍याची सुविधा देते. युजर दूरूनच एसीच्‍या कार्यसंचालनावर नियंत्रण ठेवू शकतात आणि लाइव्‍ह अभिप्रायासह कार्यसंचालन निर्धारित करू शकतात. एआय ऑटो-कूलिंग वापर व लिव्हिंग रूमच्‍या स्थितींनुसार थंडावा आपोआपपणे सानुकूल करते. तसेच वेलकम कूलिंग जिओ-फेन्सिंग वैशिष्‍ट्यांचा वापर करत युजरला लोकेशनवर पोहोचण्‍यापूर्वीच त्‍यांच्‍या पसंतीनुसार खोलीमध्‍ये थंडावा निर्माण करण्‍याची सुविधा देते.

    सॅमसंग वॉशिंग मशिन्‍स

    डिजिटल इन्‍व्‍हर्टर मोटर्स असलेल्या सॅमसंग वॉशिंग मशिन्‍स वापरादरम्‍यान कमी ऊर्जेचा वापर करतात. तसेच वॉशिंग मशिन सुरू असताना आवाज व स्‍पंदन देखील कमी होतात. हायजिन स्टिम कपडे स्‍वच्‍छ व सॅनिटाईज झाल्‍याची खात्री देते. हे वैशिष्‍ट्य ड्रमच्‍या तळामधून वाफ उत्‍सर्जित करत वॉशिंगचा दर्जा सुधारते. परिणामत: ड्रममधील प्रत्‍येक कपडा वेगवेगळा स्‍वच्‍छ धुतला गेल्‍याची खात्री मिळते. हायजिन स्टिम गडद डाग आणि ९९.९ टक्‍क्‍यांपर्यंत जीवाणू दूर करते.