डिजिटल ट्रांझेक्शन होणार सुलभ; बँकांनी घेतलाय ‘असा’ निर्णय, तुम्हीही म्हणाल हे तर उशीरा सुचलेलं शहाणपण

डिजिटल बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पची स्थापन करणे आणि नव्याने सॉफ्टवेअर निर्मिती करून बँकिंग सुविधा सुलभ करण्यावर भर दिला जाणार आहे. याबाबत गेल्याच आठवड्यात अर्थ सचिवांसोबत झालेल्या बैठकीतही चर्चा झाली होती.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क,दिल्ली.

    देशात सध्या डिजिटल व्यवहारांचे चलन वाढले असून कोरोना साथीच्या रोगानंतर हा एक मोठा पर्यायही असल्याचे सिद्ध झाले आहे. आता लोकंही डिजिटल पेमेंटवरच निर्भर राहू लागले आहेत. तथापि डिजिटल ट्रांझेक्शनबाबत काही समस्याही उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ही पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देत एक कंपनी स्थापन करण्यावर विचार सुरू केला आहे अशी माहिती दोन बँकांनी दिली.