तुमचं फेसबुक प्रोफाईल ब्लॉकनंतरही लपून-छपून कोण-कोण पाहतंय माहितीय का?; माहिती करून घेण्यासाठी असं करा चेक

अनेकदा आपल्या सोशल फ्रेंडशीपमध्ये काही खटके उडालेले असते. यानंतर लोक एकमेकांना ब्लॉक करतात. मात्र यामध्ये काही जण चोरून प्रोफाईल चेक करीत असतात. अनेकदा आपलं प्रोफाईल हे नेमकं कोण पाहतं हे जाणून घ्यायची उत्सुक असते.

  नवी दिल्ली – फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. याठिकाणी मिनिटा-मिनिटाला लोक आपली माहिती शेअर करत असतात. मात्र अनेकदा आपल्या सोशल फ्रेंडशीपमध्ये काही खटके उडालेले असते. यानंतर लोक एकमेकांना ब्लॉक करतात. मात्र यामध्ये काही जण चोरून प्रोफाईल चेक करीत असतात. अनेकदा आपलं प्रोफाईल हे नेमकं कोण पाहतं हे जाणून घ्यायची उत्सुक असते.

  आता हे सहज समजणार आहे. तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही फेसबुकच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन चेक करू शकता की, तुमचं प्रोफाईल कोणी कोणी पाहिलं आहे. अन्य युजर्स डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची मदत घेऊ शकतात.

  – सर्वात आधी डेस्कटॉप वर फेसबुकला लॉगिन करा.

  – आता आपल्या टाईमलाईनवर कुठेही उजव्या बाजुला क्लिक करून View page source ला किंवा CTRL+U दाबा.

  – आता ctrl+f दाबून सर्च बारमध्ये BUDDY_ID ला सर्च करा.

  – तुम्हाला BUDDY_ID सोबत 15 अंकांचा एक कोड मिळेल.

  – या कोडला कॉपी करून आणि ब्राऊजरला facebook.com/profile ID (15 अंकांचा कोड) टाईप करून सर्च करा.

  –  आता थेट त्यांचं प्रोफाईल ओपन होईल. ज्याने या आयडीने तुमचं प्रोफाईल चेक केलं आहे.