अन्य पर्यायांची गरजच उरली नाही : Aadhaar Card डाऊनलोड, रिप्रिन्ट करण्यासाठी आलं ‘App’; घसबसल्या होणार ३५ कामे

जर तुम्हाला आधार कार्डाशी निगडीत कोणताही बदल करायचा असेल तर आता तुम्ही तो आपल्या स्मार्टफोनच्या आधारेही करू शकता. तुम्ही आपल्या आधार कार्डाच्या बाबतीतील तब्बल ३५ कामं ॲपद्वारे करून शकता.

  • Aadhaar Card App : आधार कार्डाशी निगडीत महत्त्वाची सर्व कामे या ॲपद्वारे करता येऊ शकतात. ३५ कामे ॲपद्वारे करता येणार

नवी दिल्ली : सध्या आधार कार्ड आपल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक झालं आहे. सरकारी योजना असतील किंवा अन्य कोणत्या बाबी अनेक ठिकाणी आधार कार्डाबाबत विचारणा केली जाते.

परंतु जर तुमच्या आधार कार्डावर एखादी चूक असेल तर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर त्यात कोणतीही चूक असेल तर ती आता लगेच दुरूस्त करणं सोपं झालं आहे.

जर तुम्हाला आधार कार्डाशी निगडीत कोणताही बदल करायचा असेल तर आता तुम्ही तो आपल्या स्मार्टफोनच्या आधारेही करू शकता. तुम्ही आपल्या आधार कार्डाच्या बाबतीतील तब्बल ३५ कामं ॲपद्वारे करूच शकता.

  • यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये mAadhaar App डाऊनलोड करावं लागेल.
  • जर तुमच्याकडे mAadhaar App चं जुनं व्हर्जन असेल तर तुम्हाला ते अनइन्स्टॉल करून नवं ॲप डाऊनलोड करावं लागेल. UIDAI ने या ॲपचं नवं व्हर्जन लाँच केलं आहे. याद्वारे आता ग्राहकांना अनेक सुविधा देण्यात येत आहेत.
  • mAadhaar App च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधार कार्डाची कॉपी डाऊनलोड करून ठेवू शकता. तसंच यासोबत तुम्हाला आधार कार्ड रिप्रिन्टचाही ऑप्शन देण्यात येत आहे.
  • या ॲपच्या माध्यमातून तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये आधार कार्ड दाखवू शकता. जेव्हा तुम्हाला आयडी दाखवायचं असेल त्यावेळी तुम्ही या ॲपच्या माध्यमातून आयडी म्हणून आधार कार्ड दाखवू शकता.
  • mAadhaar App या ॲपद्वारे तुम्हाला तुमचा पत्ता बदलण्याचीही संधी मइळणार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील पाच सदस्यांचं आधार कार्ड ठेवू शकता. तसंत ते मॅनेज करणंही याद्वारे शक्य आहे.
  • mAadhaar App या ॲपद्वारे आधार कार्डधारक आपला युआयडी किंवा आधार कार्ड क्रमांक हवा तेव्हा लॉक अनलॉक करू शकतो. आधार सोबतच बायोमेट्रिक डेटा जोडलेला असतो आणि तो अतिशय संवेदनशील असतो.
  • या ॲपमध्ये तुम्ही बायोमॅट्रिक लॉकिंग सिस्टमही एकदा अनेबल करून शकता. त्यामुळे जोवर तुम्ही ते अनलॉक करणार नाही त्याचा वापर तुम्हाला करता येणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाचं आहे.
  • ॲपद्वारे तुम्हाला क्युआर कोड आणि ईकेव्हायसीचा डेटा शेअर करता येणार आहे. कोणत्याही सरकारी कामात पेपरलेस व्हेरिफिकेशनसाठी याची मदत घेता येऊ शकते. यामध्ये पासवर्डनं सुरक्षित केलेलाय ईकेव्हायसी आणि क्युआर कोड पाठवता येऊ शकतो.
  • तुमच्या नजीक कोणत्या ठिकाणी आधार कार्ड एनरॉलमेंट सेंटर आहे हेदेखील याद्वारे तुम्हाला पाहता येऊ शकतं.

ही घ्या खबरदारी

कोणत्याही बनावट वेबसाईटवरून किंवा स्टोअरवरून बनावट ॲप डाऊनलोड करू नका. https://tinyurl.com/yx32kkeq (Android) आणि https://tinyurl.com/taj87tg (iOS) यावरून तुम्हाला हे ॲप डाऊनलोड करता येईल.

download aadhaar card reprint app launched maadhar you can do 35 things sitting home see the details