आता फेसबुकवर घ्या TikTok चा आनंद, Facebook Reels सर्वप्रथम भारतात होणार लॉन्च

सध्या फेसबुक आणि इंस्टाग्राम रील्स स्वतंत्र ठेवण्याचा कंपनीचा विचार आहे. फेसबुक रील्स केवळ फेसबुक न्यूज फीडवर शेअर करण्याचा पर्याय असेल. त्याचप्रमाणे इन्स्टाग्राम रील्सही त्याच अ‍ॅपवर शेअर करता येईल. तेथे काही निवडक क्रिएटर्स असतील ज्यांना फेसबुकवर इन्स्टाग्राम रील्स शेअर करण्याची परवानगी असेल. तथापि, हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी केव्हा उपलब्ध असेल याबद्दल कोणतीही माहिती नाही.

    आता आपण फेसबुकवर टिकटॉक सारख्या छोट्या व्हिडिओंचा आनंद घेऊ शकणार आहे . जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकने अधिकृतपणे त्याचे फेसबुक रील्स फीचर लॉन्च केले आहे. हे नवीन फीचर भारतातून लाँच केले गेले आहे. मागील वर्षापासून या फीचरची चाचणी घेण्यात येत होती. फेसुबकने असेही म्हटले आहे की, काही इन्स्टाग्राम निर्मात्यांना त्यांची रील्स थेट फेसबुकवर शेअर करण्याची सुविधा देखील मिळणार आहे.

    फेसबुक रील्स म्हणजे काय
    खरं तर फेसबुकने टिकटॉक सारख्या छोट्या व्हिडिओंचं नाव बदलून रील्स केले आहे. फेसबुक रीलर्स अगदी इन्स्टाग्राम रीलसारखे असतात. या वैशिष्ट्याद्वारे, वापरकर्ते काही सेकंदांसाठी व्हिडिओ तयार करून त्यांना शेअर करू शकतात . हे व्हिडिओ न्यूज फीडमध्ये दिसतील. वापरकर्ते फेसबुकच्या संगीत लायब्ररीतून एखादे गाणे निवडून व्हिडिओ तयार करू शकतात तसेच विविध ईफेक्ट, टाइमर सेट करू शकतात. तसेच यूजर व्हिडिओचा वेग वाढवू किंवा कमी करू शकतो