Telegram मध्ये जबरदस्त फिचर्सची एंट्री , जाणून घ्या काय आहे नवीन फिचर्स

टेलिग्राममध्ये आपण आपल्या वेळेनुसार मॅसेज शेड्यूल करू शकता. सोप्या भाषेत, आपण आपला मॅसेज एका विशिष्ट वेळेसाठी सेट केला की, आपला तो मॅसेज आपोआप पाठविला जाईल. याशिवाय आपण आपला पाठविलेला मॅसेज टेलिग्राममध्ये एडीट देखील करू शकता.हे फिचर इतर कोणत्याही अॅपमध्ये उपलब्ध नाही.

    भारतात टेलीग्राम वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी वादात सापडल्यानंतर लोक हे सध्या इतर पर्यायांच्या शोधत आहेत. अशा परिस्थितीत टेलीग्राम हे अॅप सध्या त्यांची पहिली पसंती ठरताना दिसत आहे. दरम्यान टेलीग्राम मध्ये बऱ्याच भन्नाट फिचर्सची सतत भर पडताना दिसत आहे, आज आपण टेलीग्रामच्या अशा काही खास फिचर्स विषयी जाणून घेणार आहोत.

    मॅसेज शेड्यूल आणि एडीट

    टेलिग्राममध्ये आपण आपल्या वेळेनुसार मॅसेज शेड्यूल करू शकता. सोप्या भाषेत, आपण आपला मॅसेज एका विशिष्ट वेळेसाठी सेट केला की, आपला तो मॅसेज आपोआप पाठविला जाईल. याशिवाय आपण आपला पाठविलेला मॅसेज टेलिग्राममध्ये एडीट देखील करू शकता.हे फिचर इतर कोणत्याही अॅपमध्ये उपलब्ध नाही.

    जवळपासचे यूजर कनेक्ट

    टेलिग्राम वापरकर्ते त्यांच्या सभोवतालचे कॉन्टॅक्ट लोकेट करु शकतात. यासह, आपण टेलिग्रामद्वारे इतर व्यक्तीशी फार लवकर कनेक्ट होऊ शकता. या अ‍ॅपचे हे सगळ्यात जबरदस्त फिचर आहे.

    अनलिमिटेड स्टोरेज आणि शेयरिंग क्षमता

    टेलीग्राम आपल्‍याला अनलिमिटेड क्लाउड स्टोरेज सुविधा देते . याद्वारे आपण क्लाऊडवर आपला डेटा सेव करू शकता. या व्यतिरिक्त, आपण टेलिग्रामवर १.५ जीबी पर्यंत फायली शेयर करू शकता. आपल्या व्यावसायिक जीवनात हे फिचर उपयोगी ठरू शकते.