खळबळजनक ! एलियन्स आणि अमेरिका यांच्यात गुप्त करार ; इस्त्राईलच्या संशोधकाचा दावा

अंतराळात एलियन्स अस्तित्वात आहेत आणि त्यांनी अमेरिकेसोबत गुप्त करार केल्याचा खळबळजनक दावा इस्त्राईल अंतराळ सुरक्षा उपक्रमाचे प्रमुख हाइम इशेद (General Haim Eshed) यांनी केला आहे.

अंतराळात एलियन्स अस्तित्वात आहेत आणि त्यांनी अमेरिकेसोबत गुप्त करार केल्याचा खळबळजनक दावा इस्त्राईल अंतराळ सुरक्षा उपक्रमाचे प्रमुख हाइम इशेद (General Haim Eshed) यांनी केला आहे. हाइम इशेद यांनी म्हटले आहे की, एलियन्स अंतराळातच नव्हे तर पृथ्वीवरही लपून बसले आहेत. अमेरिकेसोबत त्यांचा एक गुप्त करार (Aliens- US Secret Deal) झाला असून एलियन्स इस्त्राईलच्याही संपक्रात असल्याचा दावा इशेद यांनी केला आहे. हाइम यांच्या दाव्यानंतर जगभरातील अंतराळ संशोधकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

ग्लोबल न्यूज डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिका आणि इस्त्राईल यांच्यात प्रदीर्घ काळापासून एलियन्सवर काम सुरु आहे. परंतू त्यांचे अस्तित्व एक रहस्य बनून राहिले आहे. गेली ३० वर्षे इस्त्राईलचा स्‍पेस सिक्‍यॉरिटी प्रोग्राम (Israel’s space security program) सांभाळलेल्या हाइम इशेद यांनी दावा केला आहे की. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एलियन्ससोबतच्या गुप्त कराराबाबत माहिती आहे. पृथ्वीतलावावरील एलियन्सची उपस्थिती अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे कारण एलियन्समध्ये अद्याप मानवता तयार झाली नाही. यामुळे अमेरिका आणि एलियन्स यांच्यात झालेल्या गुप्त करारानुसार एलियन्समध्ये मनावता निर्माण होईपर्यंत सुरु असलेले सर्व कार्य गुप्त ठेवण्यात येईल. तसेच अमेरिकेसोबत झालेल्या गुप्त करारानुसार हे एलियन्स मंगळ ग्रहावर जमीनीखाली एक गुप्त अड्डा करुन राहात आहेत. यातून आंतराळवीर आणि एलियन्स एकमेकांसोबत सहकार्याने काम करत आहेत. हाईम इशेद यांनी इस्त्राईलचा स्‍पेस सिक्‍यॉरिटी प्रोग्राम ३० वर्षे सांभाळला आहे. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत.