सॅमसंगच्या प्रमुख रेफ्रिजरेटर व टीव्‍हीसाठी ऑगमेण्‍टेड रिॲलिटी डेमोसह घरातूनच वास्‍तववादी व्‍हर्च्‍युअल शॉपिंगचा अनुभव घ्‍या

एआर डेमो ग्राहकांना त्‍यांच्‍या घरांमधूनच आरामात सॅमसंग उत्‍पादने पाहण्‍याची व त्‍याबाबत माहिती मिळवण्‍याची सुलभ सुविधा देते, ज्‍यामुळे ते घरांमधूनच बाहेर न पडता खरेदीसंदर्भात योग्‍य निर्णय घेऊ शकतात.

  • एआर डेमो ग्राहकांना त्‍यांच्‍या घरांमधूनच व्‍हर्च्‍युअली उत्‍पादनाचा अनुभव घेण्‍याची, उत्‍पादनाचा आकारमान पाहण्‍याची आणि योग्‍य निर्णय घेण्‍याची सुविधा
  • ग्राहक स्‍टोअरला भेट देण्‍यासाठी अपॉइण्‍टमेंट देखील बुक करू शकतात
  • आवडत्‍या उत्‍पादनांचे लाइव्ह व्हिडिओ डेमो मिळवू शकतात
  • त्‍यांच्‍या जवळच्‍या रिटेल स्‍टोअर्समधून थेट ऑनलाइन खरेदी करू शकतात

नवी दिल्ली : सॅमसंग या भारताच्‍या सर्वात मोठ्या व सर्वात विश्‍वसनीय ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने त्‍यांचे प्रमुख रेफ्रिजरेटर व टीव्‍हीसाठी नवीन ऑगमेण्‍टेड रिॲलिटी (एआर) सक्षम डेमोसह ग्राहकांसाठी त्‍यांच्‍या कॉन्‍टॅक्‍टलेस ऑफरिंग्‍जमध्‍ये वाढ केली आहे. या डेमोमुळे ग्राहकांना घरांमध्‍येच त्‍यांच्‍या आवडीच्‍या सॅमसंग उत्‍पादनांचा व्‍हर्च्‍युअली अनुभव घेता येईल.

ग्राहक एआर डेमोचा वापर करत त्‍यांच्‍या लिव्हिंग रूममध्‍ये व्‍हर्च्‍युअली सॅमसंगची लाइफस्‍टाइल टीव्‍ही ‘दि सेरिफ’ पाहू शकतात किंवा त्‍यांच्‍या किचनमध्‍ये आधुनिक स्‍पेसमॅक्‍स फॅमिलीहब™ रेफ्रिजरेटर कसा दिसेल याचा ३६०-अंश व्‍ह्यू पाहू शकतात. तसेच उत्‍पादनांच्‍या वैशिष्‍ट्यांबाबत सविस्‍तर माहिती प्राप्‍त करू शकतात. ग्राहक उत्‍पादनाचे आकारमान आणि घरातील सजावट व जागेमध्‍ये उत्‍पादन सामावू शकते का हे देखील पाहू शकतात.

एआर डेमो ग्राहकांना त्‍यांच्‍या घरांमधूनच आरामात सॅमसंग उत्‍पादने पाहण्‍याची व त्‍याबाबत माहिती मिळवण्‍याची सुलभ सुविधा देते, ज्‍यामुळे ते घरांमधूनच बाहेर न पडता खरेदीसंदर्भात योग्‍य निर्णय घेऊ शकतात.

सॅमसंगने दि सेरिफ लाइफस्‍टाइल टीव्‍ही आणि स्‍पेसमॅक्‍स फॅमिलीहब™ रेफ्रिजरेटर्ससह एआर डेमो सादर केला आणि ही सुविधा लवकरच इतर उत्‍पादनांमध्‍ये देखील समाविष्‍ट करण्‍यात येईल.

”ग्राहक अधिक वेळ घरामध्‍येच व्‍यतित करण्‍यासोबत स्‍मार्टर लाइफस्‍टाइल निवडीचा सातत्‍याने शोध घेत असल्‍यामुळे आम्‍ही खात्री घेतली आहे की, ते घराबाहेर न पडता घरांमधूनच आरामात त्‍यांच्‍या आवडीच्‍या सॅमसंग उत्‍पादनांचा अनुभव घेऊ शकतील. नवीन एआर डेमो सुविधा आमच्‍या ग्राहकांना तंत्रज्ञानासह सक्षम करते, ज्‍यामुळे ते प्रायोगिक पद्धतीने योग्‍य निर्णय घेऊ शकतात,” असे सॅमसंग इंडियाच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्‍यवसायाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष राजू पुल्‍लन म्‍हणाले.

एआर डेमोची कार्यपद्धती

सॅमसंग एक्‍स्‍परिअन्‍स कन्‍सल्‍टण्‍ट्स उत्‍पादनामध्‍ये रूची असलेल्‍या ग्राहकांना एआर डेमोची लिंक शेअर करतील. ग्राहक सॅमसंगच्‍या फेसबुक पेजवरून देखील ही लिंक मिळवू शकतात. त्‍यांच्‍या स्‍मार्टफोन कॅमेराचा वापर करत इच्छित ठिकाणी टेलिव्हिजन किंवा रेफ्रिजरेटर ठेवू शकतात.

कॅमेरा जागेचे स्‍कॅनिंग करून आकारमानाप्रमाणे उत्‍पादन ठेवेल आणि घरामध्‍ये उत्‍पादनाचा वास्‍तविक लुक कसा असेल याचे दृश्‍य दाखवेल. रेफ्रिजरेटरच्‍या बाबतीत युजर्स रेफ्रिजरेटरचा दरवाजा देखील उघडू शकतात आणि उत्‍पादनाच्‍या सर्वांगीण अनुभवासाठी आतील भाग देखील पाहू शकतात.

व्‍हर्च्‍युअल अनुभवानंतर ग्राहकांना ‘रिक्‍वेस्‍ट कॉलबॅक’ पर्याय मिळेल आणि ते त्‍यांच्‍या जवळच्‍या सॅमसंग रिटेलरशी संपर्क करू शकतील. ज्‍यामधून त्‍यांच्‍या घरामधून बाहेर न पडता सॅमसंग उत्‍पादने खरेदी करण्‍याची खात्री त्‍यांना मिळू शकते.

एआर डेमोबाबत अधिक माहिती येथे मिळवा:

दि सेरिफ: https://web2.avataar.me/samsungce/serifcta/index.html

स्‍पेसमॅक्‍स फॅमिलीहब™: https://web2.avataar.me/samsungce/spacemaxcta/index.html

अनटॅक्‍ट २.०

मागील काही आठवड्यांमध्‍ये सॅमसंगने ग्राहकांसाठी अनेक कॉन्‍टॅक्‍टलेस ऑफरिंग्‍ज सादर केल्‍या आहेत, ज्‍यामधून त्‍यांना सुरक्षित वातावरणामध्‍ये सुलभपणे त्‍यांच्‍या उत्‍पादनांचा अनुभव घेण्‍यामध्‍ये आणि खरेदी करण्‍यामध्‍ये मदत होते.

अपॉइण्‍टमेंट घेत खरेदी करा

ग्राहक https://www.samsungindiamarketing.com/Promotions/promo-of-the-month/. येथे ऑनलाइन फॉर्म भरत त्‍यांच्‍या जवळच्‍या रिटेलरमध्‍ये अपॉइण्‍टमेंट्स बुक करू शकतात. फॉर्म भरल्‍यानंतर सॅमसंग एक्‍स्‍परिअन्‍स कन्‍सल्‍टण्‍ट ग्राहकाशी संपर्क साधतो आणि स्‍टोअरमध्‍ये येण्‍यासाठी अपॉइण्‍टमेंट बुक करण्‍यामध्‍ये साह्य करतो.

घरीच लाइव्‍ह व्हिडिओ डेमो

सॅमसंग एक्‍स्‍परिअन्‍स कन्‍सल्‍टण्‍ट्स ग्राहकांना व्हिडिओ कॉलच्‍या माध्‍यमातून कोणत्‍याही उत्‍पादनाचे डेमो दाखवतील आणि घरांमधूनच आरामशीरपणे उत्‍पादने निवडण्‍यामध्‍ये साह्य करतील. उत्‍पादनाची निवड केल्‍यानंतर ग्राहक ऑनलाइन पेमेण्‍ट देखील करू शकतात आणि त्‍यांच्‍या घरांमध्‍ये उत्‍पादनाची डिलिव्‍हरी प्राप्‍त करू शकतात, ज्‍यासाठी त्‍यांना घराबाहेर पडण्‍याची गरज नाही.

जवळच्‍या रिटेल स्‍टोअर्समधून उत्‍पादने खरेदी करा

सुलभ गुगल सर्चसह ग्राहक आता सॅमसंग उत्‍पादनांची विक्री करणा-या त्‍यांच्‍या जवळच्‍या रिटेल स्‍टोअर्सच्‍या वेबसाइट्सचा शोध घेऊ शकतात. ते डिजिटल पेमेण्‍ट्स व्‍यासपीठ बीनाऊच्‍या माध्‍यमातून या स्‍टोअर वेबसाइट्सवर निवडलेल्‍या उत्‍पादनांसाठी पेमेण्‍ट्स करू शकतात.

Experience realistic virtual shopping from home with augmented reality demos for Samsungs flagship refrigerators and TVs