कोविड-१९ संदर्भात चुकीची माहिती पसरू नये यासाठी फेसबुकचे सहकार्य

या साथीच्या काळात आम्ही जगभरातील कोविड-१९ विषयी चुकीची माहिती देणार्‍या १२ दशलक्षांहून अधिक गोष्टींना फेसबुक आणि इन्स्टाग्राम वरून काढून टाकले आहे. यामध्ये मान्यताप्राप्त लसींबद्दलची खोटी माहिती इत्यादींचा समावेश आहे. फेसबुकने थर्ड पार्टी फॅक्ट चेकर्सनी चुकीची म्हणून मार्क केलेल्या १६७ दशलक्षांहून अधिक पोस्ट्स वर खोटी असल्याची वॉर्निंग लेबल्स लावली आहेत.

  आजमितीस आम्ही अनेक लोकांबरोबर संपर्क वाढवून लोकांना अचूक स्त्रोतांकडून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असून चुकीची माहिती प्रसारित होऊ नये विशेष करून कोविड -१९ विषयी चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही मोठ्या प्रमाणावर आमचे कम्युनिटी स्टॅन्डर्ड्स किंवा ॲड पॉलिसीज मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून चुकीची किंवा फेक माहिती देणार्‍या अकाऊंट्स आणि कंटेंट्स वर कार्यवाही करत आहोत. त्यामुळे आता लोकांना पोस्ट मधील कंटेंट मध्ये सत्यता मिळू शकेल जेणेकरून ते वाचून, विश्वासाने ती पोस्ट शेअर करतील.

  या साथीच्या काळात आम्ही जगभरातील कोविड-१९ विषयी चुकीची माहिती देणार्‍या १२ दशलक्षांहून अधिक गोष्टींना फेसबुक आणि इन्स्टाग्राम वरून काढून टाकले आहे. यामध्ये मान्यताप्राप्त लसींबद्दलची खोटी माहिती इत्यादींचा समावेश आहे. फेसबुकने थर्ड पार्टी फॅक्ट चेकर्सनी चुकीची म्हणून मार्क केलेल्या १६७ दशलक्षांहून अधिक पोस्ट्स वर खोटी असल्याची वॉर्निंग लेबल्स लावली आहेत. ज्यावेळी लोक ही खोटी असल्याची लेबल्स पाहतील त्यावेळी त्यातील ९५ टक्के लोक हे ती पोस्ट पूर्ण न पाहता ओरिजिनल कंटेंट पाहण्यावर लक्ष केंद्रित करतील.

  आम्ही लोकांना त्यांनी कोणताही ऑनलाईन कंटेट पाहून त्या माहितीच्या आधारे सुयोग्य निर्णय घेण्यावर भर देत असतो. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून येत्या काही आठवड्यांत आम्ही भारतात एक नवीन मोहीम सुरू करणार असून या मोहिमेअंतर्गत लोकांना कोविड-१९ शी संबंधित चुकीच्या माहिती संदर्भात लोकांमध्ये ज्ञान देऊन तसेच कोविडशी संबंधित संपूर्णत: सरकारी स्त्रोत जसे www.mygov.in/covid-19/ सारख्या वेबसाईटना भेट देण्यास प्रवृत्त करणार आहोत.

  आम्ही सहा सोप्या टिप्स तयार केल्या असून यामुळे कोविड १९ विषयीची चुकीच्या माहितीशी लढा देणे शक्य होईल. या टिप्स चा प्रसार हा फेसबुक वरून विविध कलात्मक जाहिराती आणि लिंक तसेच www.fightcovidmisinfo.com/india/ यासारख्या मायक्रोसाईट्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या वेबसाईट आणि जाहिरातींच्या माध्यमातून आम्ही लोकांना खालील गोष्टी करण्यास प्रोत्साहित करणार आहोत

  • संपूर्ण स्टोरी पहा, केवळ शीर्षक पाहू नका
  • विश्वसनीस स्त्रोत आहे का ते तपासा
  • सत्य सगळ्यांना सांगा, अफवा पसरवू नका
  • संपूर्ण माहिती ही विश्वसनीय सूत्रांकडून मिळवा
  • जर चुकीची माहिती असल्यास ती आपल्या परिजन आणि मित्रांना द्या
  • शेअर करण्याआधी थोडं थांबा.

  ही मोहीम आणि वेबसाईट इंग्रजी सह एकाच वेळी हिंदी, तमिळ, तेलगू, ओरिया, मल्याळम, मराठी, कन्नड, गुजराती आणि बंगाली अशा ९ भारतीय भाषांमध्ये सुरू करण्यात येत आहे.

  कोविड १९ विषयी सातत्याने खरी आणि अचूक माहिती प्राप्त करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून फेसबुकने देशातील काही आघाडीच्या डॉक्टर्स बरोबर सहकार्य करून आणखी एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून #DoctorKiSuno या मोहिमे अंतर्गत १२ व्हिडिओजचे प्रसारण करण्यात येणार असून यांत कोविड१९ विषयी विचारल्या जाणार्‍या सामान्य प्रश्नांची उत्तरे डॉक्टर्स https://www.facebook.com/FacebookIndia या लिंक वरून देतील आणि यामध्ये लहान मुलांमधील कोविड-१९, मधुमेह आणि कोविड १९ तसेच कोविड १९ दरम्यानचे मानसिक आरोग्य अशा विषयांचा समावेश आहे.

  या माध्यमातून कोविड-१९ महामारी आणि त्यापुढे ही आम्ही सातत्याने आमच्या भागिदारांबरोबर काम करून समाजात पसरणार्‍या चुकीच्या माहिती विरोधात लढा देणार आहोत. जर कोणाला मदत लागली तर आम्ही त्याचे स्त्रोत उपलब्ध करून देऊन ते जो कंटेंट ऑनलाईन पहात आहेत त्या आव्हानाचा मुकाबला करत ते सामाजिक माध्यमातून अचूक माहिती प्रसारित करतील यासाठी प्रयत्न सुरू राहतील.

  Facebooks cooperation to prevent misinformation about Covid 19