फेंडा ऑडिओने लाँच केला 100 वॅट पावरफुल आउटपुटवाला F&D PA300 पार्टी स्पीकर

सणासुदीच्या हंगामात संगीताला मागणी असते - मग ते भजन असो, एम्बीएंट म्युझिक असो किंवा बॉलिवूडची नवीन धून असो, सर्वासाठी आणि विशेषत: घरच्या पार्ट्यांसाठी, फेंडा ऑडिओच्या या नवीन स्पीकर सिस्टमला लोकांना एका मंचावर एकत्र आणण्यासाठी बनविले आहे.

  • मल्टी-कलरडिस्कोलाईट्स आणि, कराओके, गिटार इनपुटसह बदला तुमचा मूड

मुंबई : जर तुम्ही सणासुदीसाठी सज्ज होत आहात? तर चांगल्या संगीताने ह्या क्षणाचा आनंद घ्या, कारण आता फेंडा ऑडिओने फेस्टिव्ह सीझनसाठी नवीन F&D PA300, 100 वॅट वाला ब्लूटूथ वायरलेस पार्टी स्पीकर (bluetooth wireless party speaker) सिस्टीम लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा नवीन स्पीकर पावरफुल परफॅार्मंस, मल्टीपलइनपुट्स, कराओके (Karaoke) मोडने युक्त आहे व त्याची मजबूत पोर्टेबल बॉडी (portable body) आहे.

F&D PA300 इनडोअर आणि आऊटडोअर दोन्ही वापरांसाठी उपयुक्त स्पीकर आहे. तो रिचार्जेबल बॅटरीसह येतो ज्यामुळे पॉवर नसतानाही तुम्ही कुठेही तो वापरू शकता.

सणासुदीच्या हंगामात संगीताला मागणी असते – मग ते भजन असो, एम्बीएंट म्युझिक असो किंवा बॉलिवूडची नवीन धून असो, सर्वासाठी आणि विशेषत: घरच्या पार्ट्यांसाठी, फेंडा ऑडिओच्या या नवीन स्पीकर सिस्टमला लोकांना एका मंचावर एकत्र आणण्यासाठी बनविले आहे.  ७-इंच मोठे वूफर आणि २-इंच ट्विटरद्वारे चालणारा हा शक्तिशाली स्पीकर 100-वॅट एम्पलीफायरसह येतो.

F&D PA300 हे सुनिश्चित करतो की, तुम्ही संगीताची प्रत्येक धून ती हाईबीट असो वा लो ती ऐकू शकता, मग ती कर्कश तुतारीची असो किंवा दणदणीत ढोल. त्यांनी याच्या डिजाईन साठी त्यात बहु-रंगीत डिस्को लाईट लावले आहेत, जे संगीताच्या बीटवर झगमगतात आणि तुमच्या थिरकणाऱ्या पावलांना कधी थकू न देण्यासाठी एक वेगळाच मूड बनवितात.

या स्पीकरची बॉडी मजबूत एडीएस प्लास्टिकने बननलेली आहे, जी कोणत्याही अंतर्गत नुकसानी पासून त्यांचे संरक्षण करते. यात मेटल ग्रिल देखील लावलेला आहे जो फ्रंटड् राईव्हला बाह्य नुकसानापासून वाचवते. फेंडा ऑडिओने यात एक ट्रॉली सिस्टीम लावली आहे जेणेकरून तुम्ही त्याला पार्टीसाठी कुठेही बाहेर घेऊन जाऊ शकता. यात ७०००एमएएच रिचार्जेबलली-आयन (Li-Ion) बॅटरी आहे जी तुम्हाला सातत्याने 5 तासांपर्यंत तुमच्या आवडत्या संगीताचा आनंद देते.

F&D PA300असे वैशिष्ट्यपूर्ण स्पिकर्स आहेत ज्यात, युएसबी, ऑक्स, ब्लूटूथ, मायक्रोफोन आणि गिटारसारखे अनेक इनपुट्स पहावयास मिळतात. बातम्या आणि संगीतासाठी स्थानिक रेडिओ स्टेशनला ट्यून करण्यासाठी या स्पीकरमध्ये इनबिल्ट एफएम रेडिओ देखील आहे आणि यात एक कराओके मोड आहे जो वायर्ड आणि वायरलेस दोन्ही मायक्रोफोनसह कार्य करतो.

व्हॉल्यूमपासून ट्रॅकमध्ये बदल आणि प्ले/पॉजपर्यंत, सर्व नियंत्रणे स्पीकरच्यावर उपलब्ध आहेत, आयआर रिमोट कंट्रोल वापरून याला लांबून देखील नियंत्रित करता येते. तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात – या सणासुदीच्या हंगामात स्वत:ला हा पार्टी स्पीकर भेट द्या आणि आपले मित्र-परिवार आणि कुटुंबियांना एका व्यासपीठावर आणा.

किंमत आणि उपलब्धता:

F&D PA300 सर्व आघाडीच्या रिटेल स्टोअर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ज्याची फेस्टिव्ह सीझन लिमिटेड टाइम प्राइस ऑफर 15,999/-आहे. यासह याची, 12 महिन्यांची वॉरंटी देखील आहे.