मेल्यानंतर बदलतात ‘फिंगरप्रिंट’; मोबाइलचा लॉकही उघडू शकत नाही

सर्वच बॉलीवुड चित्रपटात तुम्ही पाहिले असेल की, विलेन कुणाला जीवे मारल्यानंतर मालमत्ता आणि इतर आवश्यक कागदपत्रांवर त्याच्या अंगठ्याचे निशान घेतो. परंतु, वास्तविकता यापासून कोसो दूर आहे. विज्ञानानुसार, असे होऊ शकत नाही. मेल्यानंतर आपले फिंगरप्रिंट बदलतात. बदलण्यापूर्वीसुद्धा तुम्ही फिंगरप्रिंटचा उपयोग करू शकत नाही, कारण मेल्यावर मानव शरीरात इलेक्ट्रिकल चार्ज संपतो. त्या इलेक्ट्रिकल चार्जद्वारेच शरीराचे कोशिका तंत्र काम करते.

  दिल्ली : सर्वच बॉलीवुड चित्रपटात तुम्ही पाहिले असेल की, विलेन कुणाला जीवे मारल्यानंतर मालमत्ता आणि इतर आवश्यक कागदपत्रांवर त्याच्या अंगठ्याचे निशान घेतो. परंतु, वास्तविकता यापासून कोसो दूर आहे. विज्ञानानुसार, असे होऊ शकत नाही. मेल्यानंतर आपले फिंगरप्रिंट बदलतात. बदलण्यापूर्वीसुद्धा तुम्ही फिंगरप्रिंटचा उपयोग करू शकत नाही, कारण मेल्यावर मानव शरीरात इलेक्ट्रिकल चार्ज संपतो. त्या इलेक्ट्रिकल चार्जद्वारेच शरीराचे कोशिका तंत्र काम करते.

  मृत्युपूर्वी तुमचे फिंगरप्रिंट्स जेवढे साफ असतात आणि ते ओळखल्या जाऊ शकतात. तसेच मृत्युनंतर राहत नाही. ते केवळ बदलतच नाही, तर ब्लर आणि अस्पष्ट होतात. जर तुम्ही गुन्हेगारी नॉव्हेल वाचणे किंवा त्याप्रकारच्या चित्रपटांचे शौकीन आहात, तर तुम्हाला वाटेल की असे होऊ शकत नाही. एका अभ्यासात आढळून आले की, प्रिटिंगच्या दोन सेटदरम्यान अंतर वाढण्यासोबतच फिंगरप्रिंट ओळख कमी तर विश्वसनीय होतात.

  फिंगरप्रिंटसाठी खास उपकरण

  सहसा मेल्यानंतर कुठल्याही व्यक्तीची बोटे अकडतात. ज्यामुळे त्यांचे फिंगरप्रिंट घेणे सोपे होत नाही. विज्ञानाने यासाठी विशेष उपकरण विकसित केले आहेत. अशातच बोटांवर एका विशेष आकाराच्या उपकरणाचा उपयोग करून फिंगरप्रिंट घेतले जाऊ शकतात. परंतु, अनेकदा फिंगरप्रिंट घेणे जवळपास अशक्य होते. जर एखादे शव कुजते, अशा स्थितीतही तुम्ही त्याचे फिंगरप्रिंट घेऊ शकत नाही. मृत आणि जीवित व्यक्तींच्या फिंगरप्रिंटमध्ये अधिक अंतर येते. याची ओळख डॉक्टर, फॉरेंसिक एक्सपर्ट तर लावतात. तर प्रयोगशाळांमध्येही यांची ओळख पटते. फॉरेंसिक एक्सपर्ट त्वरीत हे समजतात की, हे फिंगरप्रिंट मृत की जीवित व्यक्तीच्या हाताचे आहेत.

  मृत व्यक्तिच्या फिंगरप्रिंटद्वारे काहीच माहिती मिळू शकत नाही. अनेकदा मृतकाची ओळखही फिंगरप्रिंटद्वारे होते. अशात सायंस त्वचेचे प्रिंट घेण्यासाठी सिलिकॉन पुट्टीचा उपयोग करतात. सिलिकॉन पुट्टीवर जे प्रिंट बनतात. त्याचे फोटो काढून त्या प्रिंट्सचा उपयोग केल्या जाऊ शकतो.

  मोबाइलचा लॉकही उघडू शकत नाही

  आजकाल प्रत्येक मोबाईल फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर लावले असतात. परंतु हे फिंगरप्रिंट सेंसर तुम्ही मेल्यानंतर काम करीत नाही. जर आपण फिंगरप्रिंट सेंसरच्या स्मार्टफोनचा उपयोग करतो. त्याची टेक्नॉलॉजी एवढी अॅडव्हान्स होते की, ते एक मृत अणि जीवित व्यक्तीदरम्यानमधील अंतर त्वरीत पकडतो. जर तुम्ही कुठल्या मृत व्यक्तीचे फिंगरप्रिंट त्याच्याच फोनच्या सेंसरवर टच कराल तर फोन अनलॉक होणार नाही.

  काय आहे कारण

  यामागे सर्वात मोठे कारण असे आहे की, मृत्यूनंतर आपले जे फिंगरप्रिंट असतात, ते आंकुचन पावतात. यामुळेच हे फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी एक मृत आणि एक जीवित व्यक्तीतील अंतर ओळखते. सहसा फिंगरप्रिंट सेंसर मृत्युनंतर सुरुवातीच्या काही मिनिटात तर काम करू शकते. परंतु, नंतर काम करू शकत नाही.