फ्लिपकार्ट आणलं शॉप्सी, स्थानिक उद्योजकतेला चालना देणारे डिजिटल व्यासपीठ

वापरकर्त्यांनी फक्त त्यांचा फोन नंबर वापरून शॉप्सीवर नोंदणी करायची आहे आणि तिथून त्यांचा ऑनलाइन उद्योजकतेचा प्रवास सुरू होईल. उदयोन्मुख व्यावसायिकांना अगदी सहज, गुंतवणूक, उत्पादनांचा साठा किंवा लॉजिस्टिक व्यवस्थापन यातलं काहीही न करता त्यांचा व्यवसाय सुरू करता येईल, फक्त त्यांच्यावर विश्वास टाकणारी माणसे हवीत.

  • उद्योजक भारतीयांना कोणत्याही थेट गुंतवणुकीशिवाय स्वत:चा ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्याची संधी उपब्लध होणार
  • शॉप्सीसह २०२३ पर्यंत २५ दशलक्ष ऑनलाइन उद्योजकांना सक्षम करण्याचा फ्लिपकार्टचा उद्देश, डिजिटल कॉमर्सचे लाभ त्यांना मिळणार
  • शॉप्सीमध्ये प्रत्येक उद्योजकासाठी फॅशन, ब्युटी, मोबाइल्स, होम आणि इतर अनेक विभागांमधील १५ कोटी उत्पादने

बंगळुरु : फ्लिपकार्ट या भारतातील एतद्देशीय ई-कॉमर्स बाजारपेठेने आज शॉप्सी हे ॲप सादर करत असल्याची घोषणा केली. या ॲपमुळे भारतीयांना कोणत्याही गुंतवणुकीशिवाय स्वत:चा ऑनलाइन व्यवसाय सुरू करता येणार आहे. त्यांच्या स्थानिक नेटवर्कवर प्रभाव टाकण्याची आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या क्षमता असल्याने शॉप्सीच्या वापरकर्त्यांना लोकप्रिय सोशल मीडिया आणि मॅसेजिंग ॲप्सच्या माध्यमातून फॅशन, ब्युटी, मोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अशा विविध विभागांमध्ये फ्लिपकार्ट विक्रेत्यांकडे उपलब्ध १५ कोटी उत्पादनांची व्यापक यादी संभाव्य ग्राहकांसोबत शेअर करता येईल.

वापरकर्त्यांनी फक्त त्यांचा फोन नंबर वापरून शॉप्सीवर नोंदणी करायची आहे आणि तिथून त्यांचा ऑनलाइन उद्योजकतेचा प्रवास सुरू होईल. उदयोन्मुख व्यावसायिकांना अगदी सहज, गुंतवणूक, उत्पादनांचा साठा किंवा लॉजिस्टिक व्यवस्थापन यातलं काहीही न करता त्यांचा व्यवसाय सुरू करता येईल, फक्त त्यांच्यावर विश्वास टाकणारी माणसे हवीत.

हे वापरकर्ते लोकप्रिय सोशल मीडिया आणि मॅसेजिंग ॲपच्या माध्यमातून संभाव्य ग्राहकांशी कॅटलॉग शेअर करू शकतील, त्यांच्या वतीने ऑर्डर देऊ शकतील आणि या व्यवहारावर कमिशनही मिळवू शकतील. कोणत्या प्रकारचे उत्पादन ऑर्डर केले जात आहे यावर कमिशनची टक्केवारी अवलंबून असेल. डिजिटल कॉमर्समधील नव्या ग्राहकांसाठी त्यांच्या विश्वासातील व्यक्तीच्या माध्यमातून ही प्रक्रिया सोपी करून त्यांना उत्पादने उपलब्ध करून देणे, हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे.

फ्लिपकार्टच्या ग्रोथ ॲण्ड मॉनेटायझेशन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रकाश सिकारिया म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून फ्लिपकार्ट देशभरात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण करण्याची बांधिलकी जपत आहे. हा दृष्टिकोन वृद्धिंगत करत लाखो उदयोन्मुख भारतीयांना मिळकतीच्या संधी मिळवून देण्यासाठी शॉप्सी सादर करण्यात आले आहे. आता कोणीही, कुठूनही अगदी शून्य गुंतवणुकीसह आपला ऑनलाइन व्यवसाय सुरू करू शकेल. त्याचप्रमाणे आम्ही फ्लिपकार्टची अनेक वर्षांची ई-कॉमर्स क्षेत्रातील तज्ज्ञता भारतीय उद्योजकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. उद्योजकांना आता फ्लिपकार्टचे कॅटलॉग, प्रस्थापित डिलिव्हरी नेटवर्क्स आणि सुविधांचा लाभ घेत उद्योगात विश्वासार्हता आणि वेग आणता येईल. या लाभांमुळे त्यांना अंतिम ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करता येईल आणि त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढण्यास अधिकच फायदा होईल.”

भारतातील अनेक ऑनलाइन वापरकर्ते दोन कारणांमुळे ऑनलाइन व्यवहार करत नाहीत-विश्वासार्हता आणि सहजता. जगभरात, एक माध्यम म्हणून ‘डिस्ट्रिब्युटेड कॉमर्स’ने या समस्या सोडवण्यात साह्य केले आहे आणि त्यामुळे प्रचंड वाढही अनुभवली आहे. या वापरकर्त्यांचा विश्वास आहे, ते जिथे वेळ देतात अशा समुदायांसाठी आणि तृतीय पक्ष माध्यमांसाठी ई-कॉमर्सला बळकटी देणे हा शॉप्सीचा उद्देश आहे.

इतकेच नाही, जागतिक महासंकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक वैयक्तिक स्वरुपावरील उद्योजकांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला आणि प्रत्यक्षातील लॉजिस्टिक आव्हानांमुळे व्यवसायातील प्रगती जणू थांबली. उद्योजकांची व्यवसाय करण्याची पद्धत, ग्राहकांचे खरेदी वर्तन यात या महासंकटाने आमूलाग्र बदल घडवले, व्यवसायात नफा मिळवण्यासाठी अनेक लघु आणि सुक्ष्म व्यावसायिकांना डिजिटल कॉमर्सकडे वळण्यास प्रवृत्त केले. यामुळे नाविन्यपूर्ण, या व्यवसायांना देशभरातील ग्राहकांना सेवा देत डिजिटल ब्रँड्स बनण्यात साह्य करतील अशा नाविन्यपूर्ण ई-कॉमर्स मॉडेल्सना मोठी संधी प्राप्त झाली.

शॉप्सी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Flipkart launches Shopsy a digital platform for local entrepreneurship