“जरा सुट बताईए”, “भैय्या जुते दिखाना” : आता भारतीय करणार बोली भाषेत ऑनलाइन शॉपिंग; फ्लिपकार्टची व्हॉईस सुविधा

ही सुविधा उपलब्ध झाल्यापासून लाखो फ्लिपकार्ट ग्राहकांनी व्हॉईस सुविधेचा लाभ घेत त्यांचा ई-कॉमर्स व्यवहार अधिक सोपा आणि आनंददायी केला आहे. यासाठी त्यांनी हिंदी, इंग्लिश आणि या दोन भाषा मिळून बोलीभाषेत सूचना दिल्या. फ्लिपकार्टच्या सध्याच्या डेटामुळे या सुविधेच्या वापराबद्दलचे काही रंजक निष्कर्ष समोर आले आहेत.

  मुंबई : काही गोड खावंसं वाटतंय का? मग फक्त म्हणा “कुछ मीठा खाने का मन हो रहा है” आणि चॉकलेटच्या बॉक्सपासून पारंपारिक मिठायांपर्यंत अनेक पर्याय तुमच्या स्क्रीनवर दिसू लागतील. तुमचा आवडता ब्रँड पहायचा आहे म्हणा आणि क्षणाधार्त तोही स्क्रीनवर दिसू लागेल. ही आहे फ्लिपकार्टची व्हॉईस सुविधा. यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या बोलीभाषेचा लहेजा न बदलता ॲपवर संवाद साधता येईल.

  ही सुविधा उपलब्ध झाल्यापासून लाखो फ्लिपकार्ट ग्राहकांनी व्हॉईस सुविधेचा लाभ घेत त्यांचा ई-कॉमर्स व्यवहार अधिक सोपा आणि आनंददायी केला आहे. यासाठी त्यांनी हिंदी, इंग्लिश आणि या दोन भाषा मिळून बोलीभाषेत सूचना दिल्या. फ्लिपकार्टच्या सध्याच्या डेटामुळे या सुविधेच्या वापराबद्दलचे काही रंजक निष्कर्ष समोर आले आहेत.

  अधिक प्रश्न, अधिक शंका, दररोज पन्नास लाख सूचना दिल्या गेल्या :

  • फ्लिपकार्टवर दररोज ५० लाखांहून अधिक सूचना मांडल्या जातात आणि ही सुविधा सुरू झाल्यापासून हा आकडा ५०० दशलक्षांहून अधिक झाला आहे
  • फ्लिपकार्ट ॲपच्या इंग्लिश भाषेच्या इंटरफेसवर दररोज ४० लाख प्रश्न येतात, यातील ४० टक्के प्रश्न हिंदी आणि इंग्लिश अशा असतात
  • फ्लिपकार्ट ॲपच्या हिंदी भाषेच्या इंटरफेसवर १.५ दशलक्ष प्रश्न दररोज येतात त्यातील ३५ टक्के इंग्रजी आणि हिंग्लिश असे असतात.

  ‘सूट बताइए’ ते ‘जुते दिखाना भैय्या’ – आता बोलीभाषेतून शोध:

  • १६ वर्षांच्या मुलीसाठी ड्रेस दाखवण्याच्या सूचनेपासून ते एखाद्या विशिष्ट दिवशी डिलिव्हरी होऊ शकतील अशी उत्पादने… प्रत्येक व्हॉईस सर्चमध्ये काही थोडके शब्द तेच असले तरी सगळे सर्च अनोखे असतात. यातील काही रंजक व्हॉईस कमांड्स :
  • दो साल के बच्चे से लेकर दस साल के जूते दिखाना भैया (“ओ भाऊ, जरा २ ते १० वर्षांच्या मुलांच्या चपला दाखवा)
  • सोलह सत्रह साल की लड़की का सूट बताओ (“१६-१७ वर्षांच्या मुलीला ड्रेस दाखवा)
  • जो इसमें से इस टाइम डिलीवरी पे हो वह वाले जिम के सेट (वेळेवर डिलिव्हरी होईल असे जीमचे सेट)

  सर्वात लोकप्रिय उत्पादनांची कॅटेगरी :

  • सर्व चौकशांमध्ये लाईफस्टाईल आणि बीजीएमएचचा वाटा ५५ ते ६० टक्के आहे
  • व्हॉईसचा वापर हल्ली इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल कॅटेगरीसाठीही अधिक केला जातो, कारण यात अधिक सुस्पष्ट सूचना आणि विविध वैशिष्ट्ये सांगण्याची गरज भासते

  रांचीपासून समस्तीपूर पर्यंत – तृतीय श्रेणी आणि त्यापुढील शहरे सर्वाधिक संख्येसह व्हॉईस सर्चेसमध्ये आघाडीवर :

  • तृतीय श्रेणी आणि त्यापुढील शहरांचा व्हॉईस कमांड्समधील एकूण वाटा ६२ टक्के आहे
  • वाराणसी, रांची, भागलपूर, मेदिनीपूर, हावडा आणि गाझियाबाद ही शहरे व्हॉईस कमांडमधील पहिल्या २५ शहरांमध्ये
  • महानगरांचा वाटा १९ टक्क्यांहून अधिक, नवी दिल्ली आघाडीचे शहर

  विकेंड्स म्हणजे आराम करणं आणि व्हॉईस सर्चेसचे प्रयोग करणं :

  • फ्लिपकार्टच्या डेटानुसार व्हॉईस कमांडचा वापर आठवडाभराच्या तुलनेत वीकेंड्सना अधिक होतो, कारण याच काळात वापरकर्त्यांना उत्पादने शोधण्याच्या नव्या पद्धतींचे प्रयोग करायचे असतात
  • संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत फ्लिपकार्टवर व्हॉईस कमांड्सचा अधिक वापर