फ्लिपकार्टच्या Big Billion Days मुळे सणासुदीच्या या काळात लाखो विक्रेते, एमएसएमईज, किराणा दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील संबंध अधिकच वृद्धिंगत

यावर्षी विक्रेत्यांची संख्या १.३ पटींनी वाढली असून त्यात एमएसएमईज, कारागीर, विणकर, हस्तकारागीर यांचा समावेश आहे. त्यापैकी १० टक्के पेक्षा जास्त जणांनी यावर्षीच्या विक्रीत ३ पट अधिक वाढ अनुभवली आहे. यंदाच्या टीबीबीडीमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा जास्त नव्या विक्रेत्यांचा समावेश असून ५७ टक्के जण दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील गावे व जयपूर, सुरत, हावडा, तिरूपूर, पानिपत या व अशा छोट्या शहरांतले आहेत.

 • २०२० च्या तुलनेत या टीबीबीडीमध्ये नव्या विक्रेत्यांच्या संख्येत ५५ टक्के वाढ
 • सणांच्या या महिन्यात दर ३ पैकी १ डिलिव्हरी किराणा भागीदारांकडून
 • फ्लिपकार्टच्या समर्थ प्रोग्रॅममधील दर्जेदार कारागीर आणि विणकर भागिदारांनी २०२० च्या तुलनेत या टीबीबीडीमध्ये अनुभवली ६ पटींची वाढ

बंगळुरू : फ्लिपकार्टचे (Flipkart) बिग बिलियन डेज (टीबीबीडी) २०२१ ची सांगता होत असतानाच भारतात विक्रेते, किराणा भागीदार आणि एमएसएमईजच्या (msme)  संख्येत नव्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. ग्राहकांचा प्रतिसाद हे ई-कॉमर्सचा (E Commerce) वापर वाढल्याचे निदर्शक असून त्याला विस्तृत श्रेणीतील उत्पादनांची खरेदी, जास्त सोयीस्करपणा, सहज वापरण्याजोगे तंत्रज्ञान आणि आर्थिक रचनेमुळे चालना मिळाली. टीबीबीडी (TBBD) २०२१ मुळे विक्रेते आणि एमएसएमईजसाठीच्या विकास संधींमध्ये दमदार वाढ झाली व फ्लिपकार्टचे (Flipkart) विशमास्टर आणि किराणासह पुरवठा साखळी भागिदारांना अधिक चांगले उत्पन्न मिळवणे शक्य झाले.

फ्लिपकार्टच्या कस्टमर आणि ग्रोथ विभागाच्या उपाध्यक्ष नंदिता सिन्हा म्हणाल्या, “यावर्षीच्या बिग बिलियन डेजला पुनरूज्जीवन आणि विकासाची चांगली जोड मिळाली. एकंदरीत वापर व ऑनलाइन खरेदीकडे वाढता कल यात मोठी वाढ झाल्याचा हा परिणाम होता. आम्ही सातत्याने ग्राहकांना सर्वोत्तम आणि आवश्यक उत्पादने पुरवणे सुरूच ठेवले असून ती विक्रेत्यांचे मोठे नेटवर्क व वाजवी उत्पादन श्रेणीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली. पर्यायाने त्यांचा खरेदीचा अनुभव सोपा आणि सफाईदार झाला. संपूर्ण यंत्रणा उंचावण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे एमएसएमईज, विक्रेते व आमच्या लाखो किराणा भागिदारांनाही विकासाच्या लक्षणीय संधी मिळाल्या. आमच्या विविध आर्थिक योजनांमुळे त्यांना मोठा लाभ झालाच, शिवाय जास्त चांगले उत्पन्न मिळवणे आणि देशभरात पोहोचणे शक्य झाले.”

राजस्थानमधील सिकर येथील फ्लिपकार्ट (Flipkart) समर्थ भागीदार पवन जांगीर, केंदालवूड, म्हणाले, “आम्ही या वर्षीच्या बिग बिलियन डेजच्या थोडं आधी समर्थमध्ये सहभागी झालो आणि एकंदर अनुभव विलक्षण होता. या प्रोग्रॅमच्या माध्यमातून कॅटलॉगिंग तसेच त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या कामाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या मदतीमुळे दमदार वाढ अनुभवायला मिळाली. या टीबीबीडीमध्ये आम्ही एक कोटी उत्पन्नाचा टप्पा ओलांडला, जो केवळ आमच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण कारागीर समाजासाठी विक्रमी टप्पा आहे. यामुळे तंत्रज्ञान व योग्य दृष्टिकोनाच्या मदतीने आमच्या कामाचा संपूर्ण देशभरात प्रसार करता येऊ शकतो यावर विश्वास बसण्यास मदत झाली.”

लखनौच्या किराणा डिलिव्हरी भागीदार रागिणी राय म्हणाल्या, ‘स्टेशनरी दुकान चालवण्यानं मला घरगुती खर्च भागवायला, शिवाय माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला मदत झाली, पण फ्लिपकार्टच्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रॅममुळे माझ्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणं आणि त्यांच्या भविष्यासाठी बचत करणं मला शक्य झालं. मी पहिल्यांदाच बिग बिलियन डेजमध्ये सहभागी होत आहे आणि माझ्यासाठी तसंच मुलांसाठी मोठी मिळकत व संधींचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहे. महामारीनंतरच्या जगात असे प्रोग्रॅम्स आमच्यासारख्या लोकांसाठी आशेचा किरण असून त्यामुळे नव्या संधींच्या माध्यमातून आपले कौशल्य उंचावण्यास मदत होत आहे.’

विक्रेते आणि एमएसएमईजना ई-कॉमर्सच्या खऱ्या क्षमतेचा लाभ

यावर्षी विक्रेत्यांची संख्या १.३ पटींनी वाढली असून त्यात एमएसएमईज, कारागीर, विणकर, हस्तकारागीर यांचा समावेश आहे. त्यापैकी १० टक्के पेक्षा जास्त जणांनी यावर्षीच्या विक्रीत ३ पट अधिक वाढ अनुभवली आहे. यंदाच्या टीबीबीडीमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा जास्त नव्या विक्रेत्यांचा समावेश असून ५७ टक्के जण दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील गावे व जयपूर, सुरत, हावडा, तिरूपूर, पानिपत या व अशा छोट्या शहरांतले आहेत.

यंत्रणेत सहभागी होण्यास चालना

हजारो पिनकोडवर त्याच दिवशी डिलिव्हरीज पोहोचवल्या जात असल्याने ग्राहकांच्या समाधानातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने फ्लिपकार्टने सणासुदीच्या या काळात किराणा डिलिव्हरी भागिदारांच्या माध्यमातून ३० दशलक्ष डिलिव्हरीज करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या बिग बिलियन डेजमध्ये फ्लिपकार्टच्या समर्थ प्रोग्रॅममधील दर्जेदार कारागीर व विणकरांनी टीबीबीडी २०२० च्या तुलनेत ६ पट वाढ अनुभवली. भारतातील कारागीर, विणकर, लघुउद्योग यांना ई-कॉमर्स क्षेत्रात सामावून घेण्याच्या उद्देशाने २०१९ मध्ये समर्थ प्रोग्रॅम सुरू करण्यात आला होता. सर्वात लोकप्रिय समर्थ उत्पादने घरसजावट (शोभेच्या वस्तू, किल्ली ठेवण्याचे होल्डर्स), नैसर्गिक सौंदर्य उत्पादने (शॅम्पू, मॉइश्चरायझर) आणि स्त्रियांसाठी पारंपरिक वस्त्रप्रावरणे (साड्या) या विभागांतील होती.

या सणासुदीच्या काळातील भारताची प्रीमिअम वस्तूंच्या दिशेने आणि अपग्रेड होण्याकडे वाटचाल

 • या टीबीबीडीमध्ये फ्लिपकार्टच्या वाजवी आणि उच्च दर्जा असलेल्या उत्पादन श्रेणीमुळे ग्राहक ऑनलाइन खरेदी करताना उच्च दर्जा असलेली उत्पादने निवडत असल्याचा ट्रेंड दिसून आला.
  बिग बिलियन डेजदरम्यान सर्वात लोकप्रिय खरेदीमध्ये आतापर्यंत जीवनशैलीविषयक, इलेक्ट्रॉनिक्स आणि मर्चंडायझिंग, गृहोपयोगी उत्पादने आणि मोबाइल्स अशा विभागांचा समावेश दिसून आला आहे.
 • बिग बिलियन डेजदरम्यान विक्री झालेल्या प्रीमियम स्मार्टफोन्सची संख्या टीबीबीडी २०२० मध्ये दुप्पट झाली आहे. त्यातून ४१.७८ टक्के प्रीमियम स्मार्टफोन्स तिसऱ्या श्रेणीतील शहरांत राहणाऱ्या ग्राहकांनी खरेदी केले. या टीबीबीडीमध्ये विकल्या गेलेल्या ५ पैकी १ स्मार्टफोन 5G अनेबल्ड होता.
 • या टीबीबीडीमध्ये ग्राहकांनी ४४००० अनोख्या ब्रँड्सची जीवनशैलीविषयक उत्पादने खरेदी केली गेली, फॅशन वॉर्डरोब अद्ययावत करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे हे निदर्शक आहे.
 • मोठी उपकरणे खरेदी करताना एकूण ग्राहकांपैकी पंचमांश ग्राहकांनी वाजवी पेमेंट रचनेची निवड केली.
 • ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात स्मार्ट वॉचेस आणि फिटनेस बँड्समध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत १०० टक्के वाढ झाली व त्यातून स्मार्ट वेयरेबल्सकडे कल असल्याचे ठळकपणे दिसून आले.
 • किराणा आणि स्थानिक विभागांकडून वाढत्या गरजा पुरवल्या जात आहेत, कारण गेल्या काही काळात देशभरातील ग्राहकांना दैनंदिन वापराच्या वस्तू ऑनलाइन खरेदी करण्याचा कल वाढला आहे.
 • बागकामाचा छंद जोपासणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे घरगुती वापराची साधने विशेषतः बागकामाच्या साधनांमधील रस वाढला आहे. होम इम्प्रुव्हमेंट विभागात वार्षिक पातळीवर 80 टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्क फ्रॉम होममुळे यंदाच्या टीबीबीडीमध्ये फर्निचर व मॅट्रेसला असलेली चांगली मागणी टिकून राहिली.

ग्राहकांच्या कार्टमध्ये आता दयाही

फ्लिपकार्ट अ‍ॅपवरील ‘रिवॉर्ड स्माइल’ कॅम्पेनसाठी ग्राहकांनी आपली रिवॉर्ड्स वापरून देशभरातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. फ्लिपकार्ट गिव्ह इंडियासह भागिदारीमध्ये वंचित मुलांना जेवण पुरवून त्यांची पोषण तत्वांची दैनंदिन गरज पूर्ण करत आहे. आतापर्यंत २२१९२८ कॉइन्सचे दान करत हजारो मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात साह्य झाले.

वाजवी आर्थिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी खास रचना

नाविन्यपूर्ण आणि गरजेनुसार तयार केली जाणारी आर्थिक रचना उदा. फ्लिपकार्ट पे लेटर, नो-कॉस्ट ईएमआय, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड व अशा पर्यायांमुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीची उत्पादने सहज खरेदी करणे शक्य झाले. संपूर्ण उत्पादन श्रेणी देशभरात सर्व पिनकोड्सवर उपलब्ध करण्यात आल्यामुळेही फायदा झाला. टीबीबीडीची उत्सुकता ठळकपणे दिसून आली, कारण लाखो ग्राहकांनी अर्ली अ‍ॅक्सेसच्या आधीच केवळ १ रुपया भरून उत्पादने प्री- बुक केली होती.

सणासुदीचा हा काळ खास करणारा अनोखा ग्राहक संवाद

देशभरातील तब्बल १.१ दशलक्ष लोकांनी फ्लिपकार्ट अ‍ॅपवरील लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे संवाद साधला. भारतीय सणांची पद्धत जपत फ्लिपकार्टने यंदा आपल्या ग्राहकांना ‘बीबीडी शगुन’चे (खास रिवॉर्ड) वाटप केले. या योजनेअंतर्गत सुमारे २० दशलक्ष ग्राहकांनी २० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम रिडीम केली.

होलसेल मूल्य साखळीत विकासाला वाव

बिग बिलियन डेज सेल –बेस्ट प्राइस कॅश-अ‍ॅण्ड-कॅरी दालने आणि २४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत फ्लिपकार्ट होलसेल १००००+ पिन कोड्स ठिकाणी १.५ दशलक्षांपेक्षा जास्त किराणांसाठी आकर्षक ऑफर्सचा समावेश करण्यात आला. फ्लिपकार्ट होलसेलद्वारे किराणांचे डिजिटायझेशन करण्यावर भर दिला जात असून या बिग बिलियन डेजमध्ये प्लॅटफॉर्मवरील रिटेल यंत्रणेतील किराणा व सदस्यांच्या संख्येत १.३ पटींची वाढ झाल्याचे दिसून आले. बीटूबीसाठी डिजिटल कॉमर्सच्या ट्रेंडमध्ये फ्लिपकार्टच्या एकूण होलसेल ग्राहकांसाठी ४५ टक्के जणांनी ऑनलाइन व्यवहार केला, तर ३५ टक्के जणांनी सेल्फ- सर्व्हिसचा पर्याय निवडला.