Flipkart ची शाश्वत मूल्य साखळीला चालना, सणासुदीच्या काळात जबाबदार उपभोगाला देणार प्रोत्साहन

या टीम्सनी सेलर भागीदारांसोबत केलेल्या मेहनतीमुळे अवलंबनाचा दर इतका वाढू शकला आहे. शाश्वत पॅकेजिंगचे पर्याय (Packing Options) वापरण्यासंदर्भात मार्गक्रमण करण्यासाठी यातून एक मार्ग आखला गेला आहे. शाश्वत पॅकेजिंग पर्यायांची निर्मिती सेलर भागीदारांसोबत करण्यात आली आहे.

    मुंबई : फ्लिपकार्ट (Flipkart) या भारतातील एतद्देशीय ई-कॉमर्स (E-Commerce) कंपनीने आगामी सणासुदीचा काळ आणि बिग बिलियन डेजच्या (Big Billion Days) पार्श्वभूमीवर आपल्या डिलिव्हरी फ्लीटमध्ये २००० इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा (Electric Vehicles) समावेश केला आहे. आपल्या स्वत:च्या पुरवठा साखळीत या वर्षी जुलैमध्ये सिंगल युझ प्लास्टिकचा (Single Use Plastic) वापर संपूर्णपणे बंद करण्यात आला आणि आता फ्लिपकार्टच्या ७५ टक्क्यांहून अधिक सेलर फुलफिल्ड शिपमेंटही शाश्वत पॅकेजिंगचा वापर करत आहेत. त्यामुळे या वापरात जुलै २०२० मध्ये यात २० टक्के वाढ होऊन भारतातील ७० हून अधिक केंद्रांचा यात समावेश करण्यात आला.

    या टीम्सनी सेलर भागीदारांसोबत केलेल्या मेहनतीमुळे अवलंबनाचा दर इतका वाढू शकला आहे. शाश्वत पॅकेजिंगचे पर्याय (Packing Options) वापरण्यासंदर्भात मार्गक्रमण करण्यासाठी यातून एक मार्ग आखला गेला आहे. शाश्वत पॅकेजिंग पर्यायांची निर्मिती सेलर भागीदारांसोबत करण्यात आली आहे. वेगवेगळ्या उत्पादन विभागांसाठी टिकाऊपणा, आकार आणि त्यासाठी येणारा खर्च यानुसार सुयोग्य विचार करून या पर्यायांची निर्मिती करण्यात आली आहे.

    भारतातील ९० शहरांमध्ये या २००० टू व्हीलर्स आणि थ्री व्हीलर्स ताफ्यात आणल्या असून या सणासुदीच्या काळात शाश्वत मार्गांनी पॅकेजेस डिलिव्हर करणे यामुळे शक्य होणार आहे. क्लायमेट ग्रूपच्या ईव्ही१०० मोहिमेतील सहकार्याचा भाग म्हणून २०३० पर्यंत आपल्या पुरवठा साखळी फ्लीटमध्ये २५००० ईव्हीचा समावेश करण्याची आणि १०० टक्के इलेक्ट्रिक दळणवळणाच्या दिशेने मार्गक्रमणाची बांधिलकी जाहीर केल्यानंतर अवघ्या वर्षभरात फ्लिपकार्टने शाश्वत मूल्यसाखळीतील दीर्घकालीन लक्ष्यातील १० टक्के कामगिरी पूर्ण केली आहे.

    फ्लिपकार्टच्या सस्टेनॅबिलिटी आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभागाचे प्रमुख महेश प्रताप सिंह म्हणाले, “सणासुदीचा काळ म्हणजे सर्व भागधारांकासाठी अधिक मूल्य निर्माण करणे आणि प्रगती करणे आणि आमच्या ग्राहकांना घरपोच त्यांची पॅकेजेस डिलिव्हर करताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्यासाठी योग्य अशा मार्गानेच हे उत्तम करता येईल. यंदाच्या सणासुदीच्या काळात आमचे हजारो डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह २००० हून अधिक इलेक्ट्रिक व्हिइकल्समधून ९० शहरांमधील हजारो पिनकोड्सवर डिलिव्हरी देतील. आमच्या लास्ट माइल फ्लीटच्या १०० टक्के इलेक्ट्रिफिकेशनच्या दिशेने आमच्या प्रवासातील हा फार महत्त्वाचा टप्पा आहे. बंगळुरु, दिल्ली एनसीआर, मुंबई, चेन्नई, वायधन, हैदराबाद, विदिशा, शाजापूर, झाबुआ, पुणे, सोनाई, मैसूर, रामपूर, फरिदाबाद, ठाणे अशा काही शहरांचा यात समावेश आहे. शाश्वततेचा प्रश्न असेल तेव्हा कोणताच भाग आमच्यासाठी फार दूरवर नसतो हेच यातून दिसून येते. आम्ही आमच्या पुरवठा साखळीतून सिंगल युझ प्लास्टिक पूर्णपणे बाद करत या सणासुदीचा काळ अधिक अनोखा केला आहे.”