आता कंप्युटर आणि लॅपटॉपवरही व्हॉट्सॲप ॲप, मिळणार असे ढिंचॅक फीचर्स; असं करा झटपट डाऊनलोड

फेसबुकचा मालकी हक्क असलेली कंपनी व्हॉट्सॲप बीटा युझर्ससाठी व्हॉट्सॲप फॉर डेस्कटॉप ॲपची टेस्टिंग सुरू झाली आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, युझर्स या ॲपचा आता वापर करू शकतात. रेग्युलर व्हॉट्सॲप युझर्सच्या आधी कंपनी नवीन फीचर्स बीटा ॲप मध्ये जारी करते.

    नवी दिल्ली : व्हॉट्सॲपचा (Whatsapp) वापर जगभरातील लाखो लोक करतात आणि याच कारणामुळे मेसेजिंग ॲपमध्ये (Messaging App) युझर्सला चांगला अनुभव मिळावा यासाठी नवीन फीचर्स सतत येत असतात. व्हॉट्सॲपने बीटा (Beta) वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सॲप फॉर डेस्कटॉप ॲप लाँच (Whatsapp For Desktop App Launch) केल्याचे वृत्त आहे. या व्यतिरिक्त, व्हॉट्सॲपमध्ये मल्टी-डिव्हाइस सपोर्ट मिळण्यासाठी युझर्स बऱ्याच काळापासून प्रतिक्षेत आहेत.

    फेसबुकचा मालकी हक्क असलेली कंपनी व्हॉट्सॲप बीटा युझर्ससाठी व्हॉट्सॲप फॉर डेस्कटॉप ॲपची टेस्टिंग सुरू झाली आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, युझर्स या ॲपचा आता वापर करू शकतात. रेग्युलर व्हॉट्सॲप युझर्सच्या आधी कंपनी नवीन फीचर्स बीटा ॲप मध्ये जारी करते. WhatsApp for Desktopचे बीटा व्हर्जन आधीपासूनच डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे आणि कंपनी याचे बीटा व्हर्जन 2.2133.1 वर एक अतिशय कामाच्या फीचरचीही चाचणी करत आहे.

    जर तुम्हीही ॲपचं लेटेस्ट बीटा व्हर्जन इंस्टॉल करण्याचा वितार करत असाल तर उत्तमच आहे. कंपनी एखाद्याची व्हॉइस नोट दुसऱ्या युझरला पाठविण्यापूर्वी प्रथम रेकॉर्ड केल्यानंतर ऐकू येणाऱ्या फीचरचीही चाचणी करत आहे. म्हणजेच तुम्हीही एखाद्या युझरला व्हॉइस नोट पाठविणार असाल तर रेकॉर्ड झाल्यानंतर तो पाठवावा लागतो. तो पाठविण्याआधी ऐकण्याचा पर्याय नाही. रेकॉर्डेड व्हॉइस नोट ऐकण्याचं हे फीचर iOS आणि अँड्रॉईड युजर्ससाठीही चाचणी करण्यात येत आहे. याशिवाय युझर्सला व्हॉइस नोटसाठी डिझाइनचा ॲक्सेसही मिळणार आहे.

    WhatsApp for Desktop Beta Appसाठी साइन अप कसे करावे

    डेस्कटॉप बीटा ॲपसाठी व्हॉट्सॲपमध्ये साइन इन करणे अँड्रॉइड आणि आयओएस प्रमाणेच सोपे आहे. विंडोजसाठी व्हॉट्सॲप डेस्कटॉप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकता. WABetaInfo म्हणते की एकदा डेस्कटॉपसाठी व्हॉट्सॲपची लेटेस्ट बीटा आवृत्ती डाऊनलोड झाली की, तुम्हाला पुन्हा पुन्हा लेटेस्ट व्हर्जन मॅन्युअली डाऊनलोड करावे लागणार नाही, पण सर्व अपडेट्स आपोआप उपलब्ध होतील.