Dell Inspiron सीरिजमधील चार नवीन लॅपटॉप्स भारतात लाँच; जाणून घ्या

नवीन डेल इंस्पिरॉन 14 2-in-1 ला युजर्स लॅपटॉप, टेंट, स्टॅन्ड आणि टॅबलेट अश्या विविध मोडमध्ये वापरू शकतील. हा intel आणि AMD कॉन्फिगरेशनसह आला आहे. दोन्ही व्हेरिएंट्समध्ये 1,920×1,080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 14 इंचाचा फुल HD टच डिस्प्ले देण्यात आला आहे. intel व्हेरिएंट 11th-Gen Intel Core i7 प्रोसेसर आणि 2GB GDDR5 ग्राफिक मेमरी कार्डसह येतो.

    Dell ने आपल्या Inspiron सीरिजमध्ये चार नवीन लॅपटॉप भारतात लाँच केले आहेत. यात Inspiron 14 2-in-1, Dell Inspiron 14, Dell Inspiron 15 आणि Dell Inspiron 13 चा समावेश आहे. या नवीन Dell लॅपटॉप्समधील बेजल्सचा आकार कमी करण्यात आला आहे. तसेच टचपॅडचा आकार वाढवण्यात आला आहे. Dell Inspiron सीरीजच्या लॅपटॉपमध्ये फिंगरप्रिंट रीडर देखील देण्यात आला आहे.

    नवीन डेल इंस्पिरॉन 14 2-in-1 ला युजर्स लॅपटॉप, टेंट, स्टॅन्ड आणि टॅबलेट अश्या विविध मोडमध्ये वापरू शकतील. हा intel आणि AMD कॉन्फिगरेशनसह आला आहे. दोन्ही व्हेरिएंट्समध्ये 1,920×1,080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 14 इंचाचा फुल HD टच डिस्प्ले देण्यात आला आहे. intel व्हेरिएंट 11th-Gen Intel Core i7 प्रोसेसर आणि 2GB GDDR5 ग्राफिक मेमरी कार्डसह येतो.

    Dell Inspiron 14 मध्ये 1,920×1,080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 14 इंचाचा Full-HD डिस्प्ले आणि 11th-Generation Intel Core i7 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, Dell Inspiron 15 लॅपटॉपमध्ये 1,920×1,080 पिक्स्ल वाले 15.6 इंचाचा Full-HD डिस्प्ले आहे. लॅपटॉप्समध्ये 16GB पर्यंतचा DDR4 रॅम आणि स्टोरेजसाठी 1TB पर्यंतची M.2 PCIe NVMe SSD आहे. Inspiron 14 आणि Inspiron 15 लॅपटॉपमध्ये HDMI पोर्ट, Thunderbolt 4 पोर्ट, USB Type-C 3.2 Gen2 पोर्ट, दोन USB Type-A 3.2 Gen1 पोर्ट्स, हेडफोन जॅक आणि Wi-Fi 6 देण्यात आला आहे.