जागतिक मेसेजिंग ॲप्लिकेशन बीपने आणले ग्रुप आणि चॅट इम्पोर्ट; आलंय असं भन्नाट फीचर की सहवापरकर्त्याला मॅन्युअली ॲड करण्याची गरज लागत नाही

भारतात बीपचे २ दशलक्ष यूजर्स असल्याने ही एक प्रमुख बाजारपेठ आहे; सर्वाधिक डाऊनलोड्सच्या निकषांवर दिल्लीचा पहिला क्रमांक आहे. सुरक्षितता व डेटाबद्दलच्या नितीमत्तेसाठी सर्वाधिक गुंतवणूक; वापरकर्ता अनुभवाच्या प्रत्येक स्तरावर वापरकर्त्याच्या संमतीला प्राधान्य दिले जाते.

  मुंबई : टर्कीमधील जागतिक लाइफ अँड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म बीपने, वापरकर्त्यांना त्यांचे ग्रुप चॅट्स सहजपणे अन्य ॲप्लिकेशनवर पाठवण्याची मुभा देणारे, नवीन फीचर सुरू केले आहे. जगभरातील 80 दशलक्ष वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या बीपने नवोन्मेषकारी गुंतवणूक केली आहे आणि यूजर्सना त्यांचे सध्याचे ग्रुप व इंडिव्हिज्युअल चॅट्स, व्हिडिओ आणि फोटोग्राफ्ससह, दुसऱ्या ॲप्लिकेशनवर एकाच वेळी हलवण्याची मुभा देणारे फीचर आणले आहे. अन्य ॲप्लिकेशनवर वापरकर्त्यांना मॅन्युअली प्रत्येक सहवापरकर्त्याला ॲड करावे लागते, तशी आवश्यकता यात पडणार नाही, कारण बीपमध्ये सर्व सहभागांना समाविष्ट करून थेट घेण्याची सोय आहे.

  भारत ही बीप साठी प्रमुख बाजारपेठ आहे. बीप ज्या परदेशी बाजारपेठांमध्ये काम करते, त्यांमध्ये भारतात प्रति युजर मेसेजचा दर सर्वाधिक आहे. त्यातच कोविड साथीमुळे निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीत बीपच्या सर्वच वापरकर्त्यांकडून ग्रुप व्हिडिओ कॉल्सची मागणी बरीच वाढली आहे. बीपचे ग्रुप व्हिडिओ फीचर एचडी दर्जाचे असून एकावेळी 10 लोकांना सहभागी करून घेऊ शकते. अन्य प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत ग्रुप व्हिडिओचा सरस अनुभव बीपवर मिळतो. सर्वाधिक डाऊनलोडस सोमवारी होतात आणि देशात डाऊनलोडसच्या संख्येबाबत दिल्लीचा क्रमांक पहिला आहे.

  बीप च्या पुरस्कारप्राप्त रिअल-टाइम भाषांतर आणि गुप्त मेसेजिंग या महत्त्वाच्या फीचर्सनाही भारतीय ग्राहकांद्वारे मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. बीप वर 106 भाषांतील लिखित शब्द व वाक्प्रचारांचे तत्काळ भाषांतर केले जाते. या भाषांमध्ये गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, मल्याळम, पंजाबी, तमिळ, सिंधी आणि तेलुगू या भारतीय भाषांचा समावेश आहे. बीपला 2020 च्या ग्लोबल मोबाइल अवॉर्डसमध्ये ‘कनेक्टेड कंझ्युमर कॅटेगरीत’, ‘मोस्ट इनोव्हेटिव मोबाइल ॲप’ हा पुरस्कार, त्यांच्या अंगभूत रिअल-टाइम भाषांतराच्या फीचरसाठी प्राप्त झाला होता.

  स्थानिकीकरणाकडे खऱ्या अर्थाने लक्ष पुरवत बीपने भारतीय बाजारपेठेसाठी क्रिकेट चॅनल देऊ केले आहे. हे क्रिकेट सामन्यातील लाइव्ह स्कोअर्स, टीम्सबद्दल माहिती, ताज्या बातम्या व क्रिकेटबद्दलची मूल्यमापने देणारे खास डिझाइन केलेले माध्यम आहे.

  भारतीय बाजाराचे महत्त्व सांगताना बीप चे मुख्य कार्यकारी अधिकारी बुराक अकिंसी म्हणाले, “भारत ही आमच्यासाठी प्रमुख बाजारपेठ आहे. मोबाइल स्मार्टफोन वापरणाऱ्यांपैकी 97 टक्के जण दैनंदिन संवादासाठी मोबाइल ॲप्सचा वापर करतात. तरुणांची मोठी लोकसंख्या आणि त्यांचा डिजिटल ज्ञानामुळे या बाजारपेठेत वाढीची संभाव्यता खूप अधिक आहे.

  फास्ट फूडची क्रेज कमी करण्यासाठी आता पालकांनीच पौष्टिक आहाराचा आग्रह धरायला हवा तरच येणारी पिढी सशक्त असेल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...

  2021 मधील पहिली तिमाही आमच्यासाठी गतीशील ठरली आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर उच्च दराने लाइक स्कोअर्स प्राप्त करत आम्ही 2 दशलक्षचा टप्पा गाठला आहे. आम्ही भारतीय बाजारपेठेतील ऑपरेटर्स व स्थानिक कंटेण्ट पुरवठादारांशी सहयोग करारांचाही पाठपुरावा करत आहोत. भारतीय ग्राहकांचे दररोजचे जीवन सुलभ करण्यासाठी आम्ही कृतज्ञतेने अभिनव उपाय आणि सुरक्षिततेमध्ये गुंतवणूक करणे सुरूच ठेवू.

  Global messaging application Bip brings group and chat imports abandoned feature that the couser does not need to add it manually