google doodle for satelite man

गुगलने तयार केलेल्या डुडलमध्ये (google doddle for satelite man of India)प्राध्यापक राव(professor rao) यांच्या एका हातात उपग्रह असल्याचे चित्र रेखाटण्यात आले आहे. त्यांच्यामागे अंतराळ आणि पृथ्वी दाखवण्यात आली आहे.  गुगलने प्राध्यापक राव यांच्याबद्दल म्हटले आहे की, राव यांची ताऱ्यांच्या तंत्रज्ञानातील प्रगती अजुनसुध्दा आकाशगंगेमध्ये जाणवत आहे.

    भारतीय प्राध्यापक आणि वैज्ञानिक उडुपी रामचंद्र राव(udupi ramchandra rao) यांचा आज ८९ वा वाढदिवस आहे. राव यांना ‘भारताचे सॅटेलाईट मॅन’ म्हणून ओळखले जाते. त्यानिमित्त गुगलने खास डुडल तयार केले आहे.

    गुगलने तयार केलेल्या डुडलमध्ये प्राध्यापक राव यांच्या एका हातात उपग्रह असल्याचे चित्र रेखाटण्यात आले आहे. त्यांच्यामागे अंतराळ आणि पृथ्वी दाखवण्यात आली आहे.  गुगलने प्राध्यापक राव यांच्याबद्दल म्हटले आहे की, राव यांची ताऱ्यांच्या तंत्रज्ञानातील प्रगती अजुनसुध्दा आकाशगंगेमध्ये जाणवत आहे.

    राव हे भारतीय अवकाश वैज्ञानिक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) चे अध्यक्ष होते. त्यांनी १९७५ साली ‘आर्यभट्ट’ या भारताच्या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचे पर्यवेक्षण केले होते.

    प्राध्यापक राव हे मुळचे कर्नाटकातले. त्यांचा जन्म १० मार्च १९३२ रोजी झाला. वैश्विक किरणशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम सुरु केले. डॉक्टरेट पूर्ण झाल्यावर त्यांनी अमेरिकेत प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यांनी नासाच्या पायोनियर आणि एक्सप्लोरर स्पेस प्रोब या प्रकल्पांवरदेखील काम केले.

    राव १९६६ मध्ये भारतात परत आले. त्यानंतर भौतिक विज्ञान संशोधन प्रयोगशाळेत, एक व्यापक उच्च उर्जा खगोलशास्त्र कार्यक्रम सुरू केला. १९८४ ते १९९४ या काळात त्यांनी भारताच्या अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले. पुढे २०१३ मध्ये राव सॅटेलाईट हॉल ऑफ फेममध्ये सामील झाल. याच काळात मंगलयानाची मोहिम साकार झाली .भारताच्या सॅटेलाईट मॅनचे २०१७ मध्ये निधन झाले.