…म्हणून Google आपले ‘हे’ खास ॲप करणार आहे कायमचे बंद ; डेटा ट्रान्सफरसाठी अवघे तीन दिवस शिल्लक

जर तुम्ही तुमची आवडती गाणी आतापर्यंत गुगल प्ले म्युझिकवर सेव्ह करुन ठेवली आहेत, तर दुसऱ्या कोणत्यातरी ॲपवर सेव्ह करून ठेवावी. गेल्या वर्षी कंपनीने गुगलने आपल्या गुगल प्ले म्युझिक ॲपला युट्यूब म्युझिक ॲपमध्ये रिप्लेस करणार असल्याची घोषणा केली होती.

  गुगलने त्याच्या खास सेवेविषयी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. गुगलने आठ वर्षांपासून सुरू असलेले गुगल प्ले म्युझिक ॲप ही सेवा येत्या 24 फेब्रुवारी रोजी बंद करणार असून यानंतर गुगल या ॲपला कोणत्याही प्रकारचे अपडेट्स देणार नाही. त्यामुळे जर तुम्ही गुगल प्ले म्युझिक युजर असाल तर तुमच्याकडे डेटा ट्रान्सफरसाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत.

  जर तुम्ही तुमची आवडती गाणी आतापर्यंत गुगल प्ले म्युझिकवर सेव्ह करुन ठेवली आहेत, तर दुसऱ्या कोणत्यातरी ॲपवर सेव्ह करून ठेवावी. गेल्या वर्षी कंपनीने गुगलने आपल्या गुगल प्ले म्युझिक ॲपला युट्यूब म्युझिक ॲपमध्ये रिप्लेस करणार असल्याची घोषणा केली होती.

  गुगल आपल्या युजर्सना ई मेलला गुगल प्ले म्युझिक ॲपचा डेटा पाठवणार आहे तो डाटा आपल्याला युट्यूब म्युझिक ॲपवर ट्रान्सफर करावा लागेल. जर डाटा डिलीट केला तर तो पुन्हा रिकव्हर करता येणार नाही.

  दरम्यान गुगल ही सेवा बंद करण्याचे प्रमुख कारण म्हणजे म्युझिक सेगमेंटमध्ये वाढत चाललेली स्पर्धा असल्याचे सांगितले जात आहे. सध्या खूप सारे म्युझिक ॲप्लिकेशन्स जसे की स्पोटीफाय, विंक असे ॲप आहेत.

  असा करता येईल आपला डेटा ट्रान्सफर

  मोबाईल ॲप किंवा musicgoogle.com जाऊन करू शकता. मोबाईल ॲपच्या डेटा ट्रान्सफरसाठी डेस्कटॉपवर युट्यूब म्युझिक किंवा दुसऱ्या ठिकाणाचा पर्याय मिळेल. याशिवाय तुम्ही तुमची म्युझिक लायब्ररी डाऊनलोड ही करू शकता किंवा डिलीटही करण्याची सोय तुम्हाला उपलब्ध आहे.