गुगलचं खास डुडल, नववर्षाच्या स्वागताला होतेय रंगांची उधळण

डुडलवर एका घरासारखं घड्याळ (Home Watch) आहे. यामध्ये ३१ डिसेंबर २०२० च्या रात्रीचे बारा वाजले असून या घड्याळ्यामधून एक चिमणी बाहेर येताच तिनं २०२१ या नवीन वर्षाचं जोरदार स्वागत (Welcome 2021) केलं आहे. गुगलने हे डुडल नवीन वर्षाला समर्पित केले आहे.

गुगल (Google) नेहमीच अनेक दिग्गजांना आणि त्यांच्या योगदानाला सलाम करत असत. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या युजर्सला (Users) खास डुडल (Doodle) तयार करून त्या विषयी माहिती देत असतं. यावेळी २०२० हे वर्ष आता कोरोनासोबत (Corona) सरलं असून २०२१ च्या स्वागतासाठी गुगलवर जल्लोषाचा (Celebration On Google For The New Year) वर्षाव होत आहे.

डुडलवर एका घरासारखं घड्याळ (Home Watch) आहे. यामध्ये ३१ डिसेंबर २०२० च्या रात्रीचे बारा वाजले असून या घड्याळ्यामधून एक चिमणी बाहेर येताच तिनं २०२१ या नवीन वर्षाचं जोरदार स्वागत (Welcome 2021) केलं आहे. गुगलने हे डुडल नवीन वर्षाला समर्पित केले आहे.

डुडलवर क्लिक (Click) केले असता १ जानेवारी २०२१ ची तारीख गुगलच्या नवीन पानासह (New Page) दिसत आहे. तसेच उजव्या बाजूला सेलिब्रेशनचा कोन दिसत आहे. यावर क्लिक केले असता विविध रंगांची उधळण होत आहे. त्यामुळे गुगल आज रंगीबेरंगी झाल्यासारखं दिसतंय. गुगलने यावेळी खास डुडल तयार करून सर्वाचं मन जिंकलं आहे.