WhatsApp कॉल आणि मेसेज चेक करण्यासंदर्भात सरकार घेणार ही दखल? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं नेमकं सत्य

सरकार सर्व व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे कॉल रेकॉर्ड करणार असून आपलं डिव्हाईस मंत्रालयाच्या सिस्टमशी कनेक्ट होईल. तसंच या मेसेजमध्ये पुढे असंही सांगण्यात आलं, की WhatsApp मेसेजमध्ये तीन टिक असतात. जर सरकारने तुमच्या एखाद्या मेसेजची दखल घेतली असेल, तर मेसेजला दोन ब्लू टिक आणि एक रेड टिक येईल.

    नवी दिल्ली : भारतात माहिती-तंत्रज्ञानाचे (आयटी) नवे नियम लागू करण्यात आल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंद आणली जाईल, की व्हॉट्सअ‍ॅप ब्लॉक होईल, असे अनेक प्रश्नांच्या चर्चांना ऊत आला आहे. अशातच आता व्हॉट्सअ‍ॅपबाबतचा एक मेसेज वायुवेगाने व्हायरल होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपने अधिसूचित केलेल्या नवीन नियमांबाबत हा मेसेज असल्याच्या चर्चा चवीने चघळल्या जात आहेत.

    या मेसेजमध्ये असं म्हटलं जातंय, की सरकार सर्व व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे कॉल रेकॉर्ड करणार असून आपलं डिव्हाईस मंत्रालयाच्या सिस्टमशी कनेक्ट होईल. तसंच या मेसेजमध्ये पुढे असंही सांगण्यात आलं, की WhatsApp मेसेजमध्ये तीन टिक असतात. जर सरकारने तुमच्या एखाद्या मेसेजची दखल घेतली असेल, तर मेसेजला दोन ब्लू टिक आणि एक रेड टिक येईल. मेसेजच्या तीनही टिक लाल रंगाच्या झाल्यास, सरकारने त्यावर कार्यवाही सुरू केली आहे, असं त्या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे.

    परंतु असा मेसेज जर तुम्हालाही आला असेल, तर घाबरु नका. हा मेसेज पूर्णपणे फेक मेसेज असून, सरकारने यापैकी कोणतेही नियम अधिसूचित केलेले नाहीत. कॉल रेकॉर्ड केले जातील आणि अतिरिक्त रेड टिक सिस्टम सुरू करण्याबाबत सरकारकडून कोणतीही बाब नमूद करण्यात आलेली नाही. हा व्हायरल मेसेज पूर्णपणे खोटा आहे.

    WhatsApp वर सध्या दोन टिक येतात, तुमचा मेसेज पोहोचला आणि वाचला गेला असं दर्शवणाऱ्या या दोन ब्लू टिक आहेत. त्यामुळे अशा रेड टिकसारख्या फॉर्वर्डवर विश्वास ठेऊ नका. हे पूर्णपणे खोटे, फेक मेसेज आहेत. योग्य माहितीसाठी आयटी नियम २०२१ पाहू शकता.

    government is not going to check record your whatsapp all neither extra red tick introduced know truth behind viral message