एकदम स्वस्तात iPhone खरेदी करण्याची मोठी संधी, जबरदस्त ऑफर्ससह पाहा भन्नाट फिचर्स

फ्लिपकार्टवर देण्यात आलेल्या माहितीनुसार आयफोन 12 मिनी 6 हजार रुपयांपर्यंत सवलतीत खरेदी करता येईल. हे फोन 66,900 रुपयांऐवजी 61,900 रुपयांमध्ये घरी आणता येणार आहेत.

    फ्लिपकार्टवर (Flipkart) मोबाईल बोनन्झा सेल सुरू आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आयफोन 12 मिनी ( iPhone 12 Mini) स्वस्त घेण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टवर देण्यात आलेल्या माहितीनुसार आयफोन 12 मिनी 6 हजार रुपयांपर्यंत सवलतीत खरेदी करता येईल. हे फोन 66,900 रुपयांऐवजी 61,900 रुपयांमध्ये घरी आणता येणार आहेत.

    काय आहे फिचर्स

    आयफोन 12 मिनीमध्ये 5.4 इंचाची स्क्रीन आहे. कॉम्पॅक्ट बॉडीसह, हा आयफोन हातात ठेवण्यासाठी अत्यंत सोयीस्कर आहे. परंतु आपणास फोनवर कॉन्टेन्ट स्ट्रीम करायची असल्यास, हा अनुभव कदाचित त्याहून चांगला नाही. आय 12 मिनीमध्ये ए 14 बायोनिक चिपसेट देण्यात आली आहे. आयफोन 12 मिनी मध्ये 5.4 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. फोनमध्ये 12 मेगापिक्सल वाइड सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

    भन्नाट ऑफर

    Flipkart Mobile Bonanza Sale अंतर्गत आयफोन 11 चे 64 जीबी स्टोरेज मॉडेल 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु वापरकर्त्यांसह येणाऱ्या ऑफरचा फायदा घेता येईल आणि त्या अगदी कमी किंमतीत घरी घेऊन जाऊ शकतात. आपण आयफोन 11 खरेदी करण्यासाठी एचडीएफसी बँक कार्ड वापरत असल्यास, आपल्याला थेट 10 टक्के सूट मिळणार आहे.