देशातली पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू; चंदिगड पासून अवघ्या ४५ मिनिटांत हिसारला पोहोचणार

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केंद्र सरकारच्या 'उडान' योजनेअंतर्गत चंदिगडपासून हिसारसाठी चंदिगड विमानतळावर हवाई टॅक्सी सेवेचे उद्घाटन केले. चंदिगडपासून हिसार साठी १७५५ रुपये एअर टॅक्सीसाठी द्यावे लागतील. या टॅक्सीचे ऑनलाइनच बुकिंग करून वापर करता येणार आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत चंदिगडपासून हिसारसाठी चंदिगड विमानतळावर एअर टॅक्सी सेवेचे उद्घाटन केले. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, देशात प्रथमच, एअर टॅक्सीच्या रुपात एका छोट्या विमानाचा वापर या सेवेसाठी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यात हिसार ते डेहराडूनसाठीच्या सेवा १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात चंदिगड ते डेहराडून आणि हिसार ते धर्मशाळेपर्यंत दोन आणखी मार्गांवर २३ जानेवारीपासून जोडण्यात येणार आहेत. कंपनीची योजना शिमला, कुल्लू आणि अन्य ठिकाणांचाही समावेश करण्याची आहे.

४५ मिनिटांचा असेल प्रवास

चंदिगड ते हिसारच्या एअर टॅक्सी सेवेत ४ जणांना पायलटसह प्रवास करता येईल. हा प्रवास ४५ मिनिटांचा असेल. एअर टॅक्सी खासगी पद्धतीनेही बुकिंग करता येणार आहे. याचा चार्ज वेगळा असणार आहे. चंदिगडपासून हिसारसाठी १७५५ रुपये एअर टॅक्सीसाठी द्यावे लागतील. या टॅक्सीचे ऑनलाइनच बुकिंग करून वापर करता येणार आहे.

या एअर टॅक्सी सेवेचा शुभारंभ हरियाणाच्या झज्जर स्थित बेरी गावातील रहिवासी कॅप्टन वरुण सुहाग करत आहेत. कॅप्टन वरुण माजी लष्करप्रमुख दलबीर सुहाग यांचे भाचे आहेत. त्याचे वडील कर्नल रामपास सुहाग आहेत. कॅप्टन वरुण यांची योजना आहे की, येत्या काळात ते २६ विविध मार्गांवर ही एअर टॅक्सी सेवा सुरू करणार आहेत.

एका अहवालानुसार, कॅप्टन वरुण सुहाग यांनी एअर टॅक्सी सेवा स्टार्टअपची सुरुवात २०१५ मध्ये केली होती. त्याचा उद्देश असा आहे की, भारतीयांना स्वस्तात विमान सेवा द्यायची असून त्यांचा वेळही वाचला पाहिजे हा या सेवेचा उद्देश आहे. केंद्र सरकारच्या उडान च्या अंतर्गत या टॅक्सी सेवेचे संचलन करण्यात येत आहे. चंदिगड ते हिसार दरम्यान ही पहिली सेवा आहे. येत्या काळात अनेक मार्गांवर अशा प्रकारची टॅक्सी सेवा सुरू होणार आहे.