रिमोट वर्किंग पद्धतीने काम करणाऱ्यांसाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सुचवलेल्या ७ बाबी

  • ऑनलाइन सुरक्षा ही एकत्रित जबाबदारी आहे आणि ती प्रत्येक व्यक्तीच्या पातळीवर सुरू होते, हे आपण समजून घ्यायला हवे. सायबर विश्वातील आपल्या अस्तित्वाबद्दल अधिक जागरुक बनण्याची आणि संभाव्य सायबर हल्ल्यांविरोधात संरक्षण उभारण्याची एक संधी आपल्याला या जागतिक संकटातून मिळाली आहे.

तुमच्या मालकांशी सुयोग्य संपर्क राखा 

तुमच्या मालकांनी कदाचित कंपनी इंट्रानेटवर कोरोनाबद्दलची माहिती एकत्र केली असेल. तुम्ही, तुमचे सहकारी आणि व्यवसायाला सुरक्षित ठेवण्यासाठी नवी धोरणे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

कंपनीच्या टेक टूलबॉक्समध्ये जे आहे ते वापरा

तुम्ही घरून काम करत असताना तुमच्या सायबर सुरक्षेच्या दृष्टीने साह्यकारी होतील, अशी काही टेक टूल्स कंपन्या बऱ्याचदा पुरवतात. यात फायरवॉल आणि अँटिव्हायरस संरक्षण, तसेच व्हीपीएन आणि २-फॅक्टर ऑथेंटिकेशन (द्विस्तरीय खातरजमा पद्धती) यासारखी सुरक्षा वैशिष्ट्यांचा यात समावेश असतो.

सुधारणा करण्याच्या इच्छेला आवर घाला

कर्मचारी बऱ्याचदा टीमध्ये काम करतात आणि त्याचा अर्थ इंस्टंट मेसेंजिंग आणि व्हीडिओ मिटिंग रूम्ससारखी साधने वापरून एकत्र काम केले जाते. पण एखादे टूल नीट काम करत नसेल तर त्याऐवजी काही पर्यायी साधन डाऊनलोड करण्याची इच्छा तुम्हाला होऊ शकते. हे करत असताना नकळत एखादा फारशी सुरक्षा नसलेला सॉफ्टवेअर प्रोग्राम व्यवस्थेत शिरकाव करून, त्याद्वारे एखादी अनधिकृत व्यकती तुमच्या कंपनीचा डेटा किंवा त्या मशिनवर असलेला तुमचा वैयक्तिक डेटा मिळवू शकतो.

सॉफ्टवेअर अपडेट आणि पॅचेसच्या बाबतीत सजग रहा

तुमच्या सर्व डिव्हाइसेससाठी सॉफ्टवेअर अपडेट्स उपलब्ध असल्याचे संदेश तुम्हाला मिळत असतात. अपडेट्समुळे सुरक्षेतील त्रुटी दूर होऊन तुमचा डेटा संरक्षित केला जातो.

तुमचा व्हीपीएन सुरू ठेवा

व्हीपीएन म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कमुळे कर्मचारी आणि व्यवसाय यांच्या दरम्यान डेटा एनक्रिप्ट करून सुरक्षित लिंक दिली जाते. व्हीपीएनमुळे सायबर गुन्हेगार आणि स्पर्धकांपासून माहिती सुरक्षित राहाते.

कोरोनाविषाणू संबंधित फिशिंग ईमेल्सपासून सावधान

सायबर गुन्हेगार कोरोना विषाणूच्या भीतीचा फायदा घेऊन कर्मचाऱ्यांना धोकादायक लिंक्स असलेले खोटे ईमेल्स पाठवत आहेत. अशा लिंक्सवर क्लिक केल्याने तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर मालवेअर डाऊनलोड करण्याची शक्यता असते. अशा फिशिंगच्या प्रयत्नांची खबर ताबडतोब तुमच्या मालकांना द्या. धोकादायक सॉफ्टवेअर असलेल्या फिशिंग ईमेलमुळे सायबर गुन्हेगार तुमच्या कम्प्युटरचा अॅक्सेस मिळवू शकतात किंवा संवेदनशील व्यावसायिक माहिती आणि आर्थिक माहिती पाहू शकतात.

दैनंदिन कार्यक्रमात बदल करा

घरून काम करताना तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात काही बदल करणं गरजेचं आहे. मात्र, काम परिणामकारकरित्या केलं जाईल आणि तुमच्या टीमशी योग्य संपर्क राखला जाईल, या प्रकारे दिवसाची आखणी करावी लागेल. त्यासाठी योग्य पावले उचला. सहकाऱ्यांशी संपर्क साधा आणि जोडलेले रहा.

कार्यालयात न जाता काम करताना फिशिंग अटॅक्स आणि इतर प्रकारच्या सायबर धोक्यांबद्दल अधिक सजग असणं आवश्यक आहे. ऑनलाइन सुरक्षा ही एकत्रित जबाबदारी आहे आणि ती प्रत्येक व्यक्तीच्या पातळीवर सुरू होते, हे आपण समजून घ्यायला हवे. सायबर विश्वातील आपल्या अस्तित्वाबद्दल अधिक जागरुक बनण्याची आणि संभाव्य सायबर हल्ल्यांविरोधात संरक्षण उभारण्याची एक संधी आपल्याला या जागतिक संकटातून मिळाली आहे. स्वत:ला, आपल्या कामाला आणि आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रत्येकाला सुरक्षित करण्यासाठी या संधीचा लाभ घेऊया.