व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट अधिक सुरक्षित करण्यासाठी ‘या’ आहेत तीन स्मार्ट ट्रीक्स ; फोन चोरी झाल्यानंतरही घाबरण्याची गरज नाही, काय आहेत ?

व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच नवनवीन फीचर्स देत असतं. काही वर्षांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने स्टेटस फीचर आणलं होतं. या स्टेटस फीचरला युझर्सनी भरघोस प्रतिसाद दिला. प्रत्येक जण व्हॉट्सअ‍ॅपच्या या स्टेट्सद्वारे मेसेज, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. परंतु व्हॉट्सअ‍ॅपचे अकाऊंट सुरक्षित आहे की नाही, हे आपण पाहतच नाही. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपला अधिक सुरक्षा मिळावी, यासाठी या तीन गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.

  चॅटिंगसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा (Whatsapp) मोठ्या प्रमाणात केला जातो. युझर्सला चॅटिंगचा चांगला अनुभव मिळावा, म्हणून व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच नवनवीन फीचर्स देत असतं. काही वर्षांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने स्टेटस फीचर आणलं होतं. या स्टेटस फीचरला युझर्सनी भरघोस प्रतिसाद दिला. प्रत्येक जण व्हॉट्सअ‍ॅपच्या या स्टेट्सद्वारे मेसेज, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. परंतु व्हॉट्सअ‍ॅपचे अकाऊंट सुरक्षित आहे की नाही, हे आपण पाहतच नाही. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपला अधिक सुरक्षा मिळावी, यासाठी या तीन गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.

  टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी इनेबल करा

  व्हॉट्सअ‍ॅपला फोन सेटिंग्जच्या सहाय्याने लॉक करा

  चॅट केलेल्या गोष्टींची बॅकअप करण्यासाठी आवश्यकता नाही

  सर्वात पहिली स्टेप म्हणजे टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी इनेबल करा

  आपल्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटला  जास्त प्रमाणात सुरक्षा मिळावी यासाठी अकाऊंटमध्ये सेटिंग्ज करणे खूप महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे टू स्पेट व्हेरिफिकेशनसाठी इनेबल करा. त्यानंतर ६ अंकांचा एक पासवर्ड तुम्हाला क्रिएट करावा लागेल. ज्यामुळे तुम्हाला तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अधिक सुरक्षित ठेवणं सोपं जाईल. जर तुमचा फोन चोरीला गेल्यास या ६ अंकांच्या पासवर्ड नंबर शिवाय कोणीही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप उघडू शकत नाही. परंतु युझर्सला आपलं पासवर्ड लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे.

  व्हॉट्सअ‍ॅपला फोन सेटिंग्जच्या सहाय्याने लॉक करा

  व्हॉट्सअ‍ॅपला अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी या दुसऱ्या पर्यायाचा देखील तुम्ही वापर करू शकता. फोनमध्ये उपलब्ध असलेल्या बायोमॅट्रीक फीचरच्या सहाय्याने युझर्स आपले अकाऊंट लॉक करू शकतात. तसेच फिंगरप्रिंट स्कॅन किंवा फेस अनलॉकच्या मदतीने सुद्धा युझर्स आपले अकाऊंट लॉक करू शकतात. परंतु बायोमॅट्रीक डेटा याहीपेक्षा उत्तम फिचर आहे.

  चॅट केलेल्या गोष्टींची बॅकअप करण्यासाठी आवश्यकता नाही

  व्हॉट्सअ‍ॅप सर्व चॅट्स आणि मीडिया फाईल्स एका क्लाऊड सर्वरमध्ये एकत्रित करून ठेवतो. जे अमेरिका आणि यूरोपमध्ये उपलब्ध आहे. जगभरात सर्व यूझर्स आपला डेटा सुरक्षित कसा ठेवता येईल, यावर सर्वाधिक भर देतात. इंटरनेट वर असलेली कोणतीही गोष्ट १०० टक्के हॅकप्रूफ नसते. युझर्सला स्वत:हून या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल की, त्यांच्या चॅट्सचं बॅकअप, व्हॉट्सअ‍ॅप किंवा क्लाऊड सर्वरमध्ये जतन करून ठेवण्यासाठी सक्षम आहे की नाही. नाहीतर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चॅट बॅकअप्सला डिसेबल करणे योग्य ठरेल.

  तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या सुरक्षिततेसाठी हे तीन पर्याय कसे वाटतात ?, याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..