‘होंडा इंडिया’चा ५.५ हॉर्सपॉवरचा शक्तिशाली पॉवर टिलर लाँच; शेतीमधील यांत्रिकीकरणाला पाठबळ देण्यासाठी आहे भक्कम व किफायतशीर

‘एचआयपीपी’ही होंडाच्या प्रमुख अशा ४-स्ट्रोक तंत्रज्ञानाच्या सदरीकरणामध्ये नेहमीच आघाडीवर राहिली आहे. त्याशिवाय कंपनीने आपले एफ ५०० हे प्रमुख मॉडेल यशस्वीपणे प्रस्थापित केले आहे. त्याशिवाय एफ ३०० हे आटोपशीर मॉडेल हे गॅसोलीन इंधनयुक्त पॉवर टिलर विभागात लोकप्रिय असून त्याद्वारे भारतीयांना भक्कम व टिकाऊ असा साथीदार प्राप्त झाला आहे.

  • होंडाचे ओएचव्ही (ओव्हरहेड वॉल्व्ह), ४-स्ट्रोक इंजिनने युक्त
  • अतुलनीय अशी इंधन कार्यक्षमता, सर्वोत्तम कामगिरी आणि ते वाहून नेण्यास व देखभालीस अधिक सोयीचे व पर्यावरणस्नेही
  • किफायतशीर मॉडेलच्या माध्यमातून शेतीतील यांत्रिकीकरण वाढते
  • विविध शेती कामांसाठी उपयोगात येणारे टिकाऊ व किफायतशीर मॉडेल पॉवर टिलरची मांडणी अधिक सक्षम करतात

जुलै : भारतातील पॉवर उत्पादनांमधील एक आघाडीची कंपनी होंडा इंडिया पॉवर प्रॉडक्ट्स लिमिटेड (एचआयपीपी)ने आज आपला अत्यंत आटोपशीर असा पॉवर टिलर एफक्यू ६५० दाखल केला असून तो ग्राहकांच्या बहुविध गरजा पूर्ण करण्यास सक्षम असा टिलर आहे. भाजीपाला, मसाले पदार्थ, फळबागा, नगदी पिके, बागा आणि झाडांच्या नर्सरी यांच्या शेतकामामध्ये कार्यरत असलेले शेतकरी हे नेहमीच एका आटोपशीर, पॉवरफुल व किफायतशीर अशा पॉवर टिलरची मागणी करत आले आहेत. हे टिलर जमिनीची मशागत, खुरपणी, नांगरणी ववाफा काढणी, तण काढणी यांसारख्या कामांसाठी कार्यक्षम ठरतील अशी त्यांची अपेक्षा असते.

‘एचआयपीपी’ही होंडाच्या प्रमुख अशा ४-स्ट्रोक तंत्रज्ञानाच्या सदरीकरणामध्ये नेहमीच आघाडीवर राहिली आहे. त्याशिवाय कंपनीने आपले एफ ५०० हे प्रमुख मॉडेल यशस्वीपणे प्रस्थापित केले आहे. त्याशिवाय एफ ३०० हे आटोपशीर मॉडेल हे गॅसोलीन इंधनयुक्त पॉवर टिलर विभागात लोकप्रिय असून त्याद्वारे भारतीयांना भक्कम व टिकाऊ असा साथीदार प्राप्त झाला आहे. अलीकडे दाखल झालेल्या ‘एफक्यू६५०’ या टिलरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आटोपशीर टिलरची दीर्घकालीन व प्राथमिक गरज पूर्ण होणार आहे. शेतकरी हे त्यांच्या दैनंदिन कृषी गरजांसाठी पॉवरफूल आणि तरीही किफायतशीर अशा पॉवर टिलरच्या प्रतीक्षेत होते.

‘एफक्यू६५०’ला टिकाऊ अशा होंडा जीपी २००एच इंजिनची जोड असून त्यातून ५.५ हॉर्सपॉवर शक्ती प्राप्त होते आणि तो या क्षेत्रातील सर्वोत्तम अशी कामगिरी देतो. तो १२.४ एन-एम @2,500 आरपीएम कमाल टॉर्क कामगिरी देतो. त्याला 300 एमएम टाईन डाया व ९०० एमएमची नांगरणी रुंदी आहे. त्यामुळे शेतीतील अनेक प्रकारासाठी तो सक्षम आहे. ‘एफक्यू६५०’मध्ये अतुलनीय अशी इंधन कार्यक्षमता असून त्याचे वजन केवळ ६५.२ किलो म्हणजे या क्षेत्रातील सर्वात कमी असे वजन आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हव्या असलेल्या आटोपशीर, टिकाऊ, पॉवरफूल आणि किफायतशीर सेवा या सर्व मागण्या पूर्ण होतात.

या शुभारंभाची घोषणा करताना होंडा इंडिया पॉवर प्रॉडकट्स लिमिटेडच्या सेल्स, मार्केटिंग व सर्व्हिस विभागाचे प्रमुख व उपाध्यक्ष गगन पाल म्हणाले, “शेती कामातील कार्यक्षमता आणि यांत्रिकीकरण जसजसे पुढे जाते तशी उभरत्या बाजारातील आटोपशीर टिलरची शेतकऱ्यांमधील मागणी वाढत जाते आहे. भारतही त्याला अपवाद नाही. होंडाचे टिलर हे भारतीय शेतकऱ्यामध्ये गेली कित्येक वर्षे लोकप्रिय आहेत. हे नवीन मॉडेल शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण वाढविण्यासाठी मदत करेल. त्या माध्यमातून त्यांना त्यांची शेतातील उत्पादकता वाढविण्यास मदत होईल. होंडा एफक्यू६५०हा एक सर्वात शक्तिशाली,सोयीस्कर, किफायतशीर आणि कोणत्याची वयाच्या स्त्री किंवा पुरुष शेतकऱ्याला वापरण्यास सोपा असा टिलर असून अगदी पहिल्यांदा वापरणाऱ्यांसाठीसुद्धा तो सोपा व सुरक्षित आहे.”

‘एफक्यू६५०’ची रचना सुरक्षितता धोरण व ग्राहकस्नेही वैशिष्ट्य ध्यानात घेवून केली गेली आहे. ‘एफक्यू६५०’मध्ये चालवणाऱ्याच्या हाती सर्व नियंत्रण असून त्याला बर्ड केज मफलर संरक्षण आहे. त्याशिवाय त्याला सुरक्षित वापरासाठी सब फेंडर असून गियर शिफ्टिंग गेटसुद्धा आहे. त्यातून वेग कमी-अधिक करण्यासाठी गियर अगदी आरामात बदलता येतात. त्याशिवाय वाहतूक चाक, पुढील स्टड आणि हँडल बार ऊंची कमी-अधिक करण्याची सोय आहे. त्यामुळे तो स्त्री किंवा पुरुष शेतकाऱ्यांना वापरता येतो. त्यातही अगदी नवखा माणूसही तो सहज वापरू शकतो.

‘एफक्यू६५०’मध्ये अतिरिक्त टिलर सुसंगत जोडणीची मुभा असून त्यात यलो रिजरचा समावेश आहे. त्याद्वारे जलवाहिन्या बनविण्यासाठी त्याचा वापर होतो आणि जमिनीखालील पिकांसाठी वाफे काढत सक्षमपणे खुरपणी करणेही शक्य होते. याशिवाय ब्ल्यू स्पायरलच्या माध्यमातून कार्यक्षमपणे ऊंच गावात कापता येते. त्याशिवाय त्याला नियमित तण खुरपणी कामासाठी एक आदर्शवत अशी फ्लॉवर टाईन जोडणी आहे.

नव्याने दाखल झालेले ‘एफक्यू६५०’टिलर हे आता होंडाच्या देशभरातील ५०० अधिकृत रिटेल डीलरशिप दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. अधिक माहितीwww.hondaindiapower.comवर उपलब्ध असून ती कंपनीच्या hondapowerproductsindia या फेसबुक पेजवरसुद्धा मिळू शकेल. त्याशिवाय, ग्राहक कोणत्याही प्रात्यक्षिक किंवा विक्री चौकशीसाठी होंडाच्या १८००-११-२३२३ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Honda India launches 5 5 horsepower powerful power tiller Strong and economical to support mechanization in agriculture