आगामी वर्षात किती ग्रहणे? जाणून घ्या

नवीन वर्ष ग्रहणांच्या दृष्टीने खास असणार आहे. सन २०२१ मध्ये दोन चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण अशी एकूण चार ग्रहणे लागतील. मात्र, यातील कोणतेही ग्रहण भारतात दिसणार नाही. ही सर्व ग्रहणे प्रामुख्याने पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि अमेरिका या भागात दिसेल.

सन २०२१ मधील पहिले चंद्रग्रहण २६ मे रोजी लागेल. हे ग्रहण दुपारी सुमारे २ वाजून १७ मिनिटांपासून सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांपर्यंत लागेल. हे एक पूर्ण चंद्र ग्रहण असेल, जे पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर आणि अमेरिकेत पूर्ण चंद्र ग्रहणाप्रमाणे दिसेल. भारतात हे केवळ एक उपछाया ग्रहणाप्रमाणे दिसेल.यानंतर १० जून रोजी सूर्यग्रहण असेल.हे ग्रहण उत्तर अमेरिकेचा उत्तर भाग, यूरोप आणि आशियामध्ये आंशिक, तर उत्तर कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियामध्ये पूर्ण रूपात दिसेल.भारतात हे ग्रहण आंशिक रूपात दिसेल. १९ नोव्हेंबर रोजी चंद्रग्रहण असेल,ग्रहण दुपारी सुमारे साडे अकरा वाजल्यापासून सांयकाळी ५ वाजून ३३ मिनिटांपर्यंत राहील हे एक आंशिक चंद्र ग्रहण असेल, ज्याची दृश्यता भारत, अमेरिका, उत्तर यूरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रात असेल. तर ४ डिसेंबर रोजी सूर्यग्रहण लागेल. मात्र, या चार ग्रहणातील एकही ग्रहण भारतात दिसणार नसून, त्याचे वेधादि नियम पाळण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले जात आहे.या ग्रहणाचा परिणाम अंटार्कटिका, दक्षिण अफ्रीका, अटलांटिकचा दक्षिण भाग, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत होईल. मात्र, भारतात या सूर्य ग्रहणाची दृश्यता शून्य असेल, यासाठी भारतात याचा सूतक काळ प्रभावी असणार नाही.