व्हॉट्सॲप स्टेटस कसे कराल डाऊनलोड?; २४ तासांनंतर आपोआप अदृश्‍य झाल्यावरही पाहता येईल

कोणत्याही युजरचे स्टेटस डाऊनलोड करण्याचे दोन मार्ग आहेत. प्रथम आपल्या फोनमध्ये स्क्रिन रेकॉर्डर वापरणे, दुसरा मार्ग म्हणजे प्रथम गुगल प्ले स्टोअरवरून आपल्या फोनमध्ये “स्टेटस डाऊनलोडर फॉर व्हॉट्सॲप’ किंवा “व्हॉट्सॲप स्टेटस सेव्हर’ॲप डाऊनलोड करणे.

    नवी दिल्ली : व्हॉट्सॲपचे “स्टेटस’ हे एक लोकप्रिय फीचर आहे. या फिचरद्वारे वापरकर्ते व्हॉट्सॲपवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात, जे २४ तासांनंतर आपोआप अदृश्‍य होतात. अनेकवेळा काही सुंदर संदेश देणारे व्हिडिओ डाऊनलोड करण्याची आपल्याला इच्छा होते, मात्र व्हॉट्सॲपने स्टेटस डाऊनलोड करण्यास परवानगी देणारी कोणतीही सुविधा अद्याप सुरू केलेली नाही. आज आपल्याला एक ट्रिक सांगत आहोत ज्याद्वारे आपण कोणत्याही युजरचे व्हॉट्सॲप स्टेटस सहज डाऊनलोड करू शकाल.

    कोणत्याही युजरचे स्टेटस डाऊनलोड करण्याचे दोन मार्ग आहेत. प्रथम आपल्या फोनमध्ये स्क्रिन रेकॉर्डर वापरणे, दुसरा मार्ग म्हणजे प्रथम गुगल प्ले स्टोअरवरून आपल्या फोनमध्ये “स्टेटस डाऊनलोडर फॉर व्हॉट्सॲप’ किंवा “व्हॉट्सॲप स्टेटस सेव्हर’ॲप डाऊनलोड करणे.

    एकदा डाऊनलोड केले की आपल्याला हे ॲप उघडावे लागेल. येथे आपल्याला चॅट करण्यासाठी क्‍लिक आणि स्टेटस डाऊनलोडर पर्याय दिसेल. या दोन पर्यायांपैकी आपणास स्टेटस डाऊनलोडरचा पर्याय निवडावा लागेल. येथे आपण सर्व युजर्सचे फोटो आणि व्हिडिओ पहाल, जे त्यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवर स्टेटस म्हणून शेअर केले. नंतर आपण डाऊनलोड करू इच्छित असलेल्या कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओवर क्‍लिक करा. यानंतर, आपल्याला डाऊनलोड बटणावर टॅप करावे लागेल. स्टेटसवरून डाऊनलोड केलेले सर्व फोटो आणि व्हिडिओ फाइल मॅनेजरच्या स्टेटस डाऊनलोडर फोल्डरमध्ये संग्रहित केले जातील.