how to increase mobile internet speed change these settings on jio vodafone idea and airtel network

तुमच्या एरियात फुल्ल 4G मोबाइल नेटवर्क आल्यानंतरही तुम्हाला बेस्ट इंटरनेट स्पीड मिळत नसेल तर काही सेटिंग्स बदलून उत्तम स्पीड मिळवणं सहज शक्य आहे. अनेक युजर्सला याचा थांगपत्ताच नसतो की त्यांच्या डिव्हाइसमध्ये अनेक ॲप्स बॅकग्राऊंडला डेटा वापरत असतात आणि या कारणामुळेच मिळणारा इंटरनेट स्पीड स्लो होतो.

  • या ट्रिक्सचा करा अवलंब

नवी दिल्ली : भारतात 4G यूजर्सचं मोठं टेलिकॉम मार्केटचा शेअर आहे. बहुतांश युजर्स 4G स्मार्टफोन्सवर इंटरनेट ॲक्सेस करतात. जर तुमच्याकडेही 4G सीम आणि स्मार्टफोन असेल तर तुम्हाला बेस्ट 4G स्पीड मिळेलंच असं गरजेचं नाही. याची अनेक कारणं आहेत आणि डिव्हाइसच्या काही सेटिंग्स बदलून तुम्ही इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता. जर तुम्ही रिलायन्स जिओ, वोडाफोन-आयडिया किंवा भारती एअरटेल युजर असाल तर डिव्हाइसमध्ये सेटिंग्स बदलून सर्वोत्तम 4G स्पीड मिळवू शकता.

सर्वोत्तम नेटवर्कचा पर्याय निवडा Choose Best Network

कोणत्याही फोनमध्ये तुम्ही नेटवर्क टाइप निवडू शकता. यासाठी आपल्याला फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन ‘नेटवर्क सेटिंग्स’वर टॅप करा. येथे Preferred Network Type मध्ये तुम्हाला 4G किंवा LTE सिलेक्ट करावं लागेल. यानंतर आपले नेटवर्क 3G किंवा 2G वर शिफ्ट होणार नाही. अशाप्रकारे आपल्याला बेस्ट स्पीडचा मनमुराद आनंद अनुभवता येईल.

डेटा युजेस मॉनिटर करा Monitor Data Uses

अनेकदा बॅकग्राऊंडमध्ये डेटाचा वापर होत असल्याने आपल्याला स्पीड कमी मिळतो. तुम्ही अनेक ॲप्सच्या मदतीने आणि डेटा सेटिंग्समध्ये जाऊन चेक करू शकता फोनमध्ये असलेलं कोणतं ॲप सर्वाधिक डेटा वापरत आहे. आवश्यकता नसल्यास तुम्ही या ॲपसाठी बॅकग्राऊंड डेटा ॲक्सेस ऑफ करू शकता.

क्लियर करा Cache

अधिकाधिक काळ फोनचा वापर केल्याने त्यात Cache फाइल्स स्टोर होत असतात. अशा फाइल्स सुरू राहिल्याने आपलाच फोनच नाही, 4G इंटरनेटही स्लो होऊन जातं. त्यामुळे 7-10 दिवसांनी कमीतकमी एकदा फोनमध्ये असेलेले Cache क्लियर करणे गरजेचे आहे. यासाठी ऑटो-क्लिनर ॲप्सची मदतही घेता येईल.

बेस्ट APN सेट करा

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडियासाठी वेगवेगळे ॲक्सेस पॉईंट नेटवर्क (APN) सेटिंग्स असतात. डिव्हाइसच्या नेटवर्क सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता की, आपल्या टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी APN योग्य आहे की नाही. योग्य स्पीड मिळत नसेल तर APN सेटिंग्स मेन्यूमध्ये जाऊन Reset to default करता येऊ शकतं.