एचपीने नव्या एन्व्ही पोर्टफोलिओसह सर्जनशीलतेला दिले मूर्त रूप

उत्पादने आणि पर्याय शक्य तितके वेगवान तसेच काम आणि मजेचा मेळ साधणाऱ्या माहितीची उपलब्धता हवी असते. नव्या एन्व्ही नोटबुक्सच्या माध्यमातून सुटसुटीत, हलक्या वजनाचा पीसी तसेच क्रिएटिव्ह व्यक्तींना कुठूनही नवे काही निर्माण करणे शक्य करणाऱ्या अप्रतिम व्हिडीओ आणि ऑडिओ क्षमता यातून मिश्र कार्यपद्धतीच्या गरजा पूर्ण होतात.

  • नव्या “एचपी क्रिएटर्स गॅरेज” सह उदयोन्युख क्रिएटर्समधील क्षमतांना वाव देण्यास सज्ज

नवी दिल्ली : एपीने त्यांच्या नव्या एन्व्ही पोर्टफोलिओच्या सादरीकरणाची नुकतीच घोषणा केली. आजघडीच्या कंटेंट क्रीएटर्सच्या सतत वाढणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी या पोर्टफोलिओची रचना करण्यात आली आहे. या नव्या पोर्टफोलिओमध्ये एन्वही १४ आणि एन्व्ही १५ नोटबुक्सचा समावेश आहे.

कुठेही निर्मितीक्षम असण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या डिव्हाईसेसची प्रोफेशनल्समधील मागणी पूर्ण करत त्यांच्या सर्जनशीलतेला अतुलनीय डिझाइनमुळे बळ मिळते आणि क्रिएटिव्ह आऊटपुटच्या विविध मोड्समध्ये काम करताना त्यांना सहजसुंदर अनुभव मिळतो.

एचपीच्या क्रिएटिव्ह कन्झ्युमर इनसाइट अहवालानुसार ७४ टक्के पीसी वापरकर्ते, विशेषत: मिलेनिअल्स आणि जेन झेड क्रिएटिंगच्या बाबतीत अधिक गंभीर असतात. तंत्रज्ञानाच्या बाबतीत मिलेनिअल्स आणि जेनझेड पिढीला उत्तम परिणाम आणि अनुभव हवा असतो. त्यांना उत्पादने आणि पर्याय शक्य तितके वेगवान तसेच काम आणि मजेचा मेळ साधणाऱ्या माहितीची उपलब्धता हवी असते. नव्या एन्व्ही नोटबुक्सच्या माध्यमातून सुटसुटीत, हलक्या वजनाचा पीसी तसेच क्रिएटिव्ह व्यक्तींना कुठूनही नवे काही निर्माण करणे शक्य करणाऱ्या अप्रतिम व्हिडीओ आणि ऑडिओ क्षमता यातून मिश्र कार्यपद्धतीच्या गरजा पूर्ण होतात.

भारतात, जेन झेड ही पिढी उत्साही आणि प्रचंड आत्मविश्वास असलेली आहे. त्यांना आपल्या भविष्याला योग्य दिशा द्यायची आहे आणि आपल्या निर्मितीतून समाजावर परिणाम साधायचा आहे. या उदयोन्मुख निर्मितीकारांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात साह्य करण्यासाठी एचपीने ‘एचपी क्रिएटर्स गॅरेज’ हे खास नेटवर्क सादर केले आहे. एचपीच्या गॅरेज वारशावर आधारित तत्त्वांवर चालणाऱ्या या समुदायात उदयोन्मुख क्रिएटर्सना भारतभरातील तज्ज्ञाकडून शिकण्यासाठी, एकमेकांच्या संपर्कात येऊन आपली कौशल्ये इतर क्रिएटर्ससोबत शेअर करण्यासाठी स्प्रिंगबोर्ड उपलब्ध करून दिला जातो.

या लर्निंग कम्युनिटीमध्ये कंटेंटचे २०० पीसेस असतील. यामुळे क्रिएटर्सना त्यांची कौशल्ये वृद्धिंगत करणे, आपले विचार आणि कल्पना इतर क्रिएटर्ससोबत शेअर करण्यासाठी फोरम होस्ट करणे तसेच क्रिएटर्सना एकत्र येता यावे यासाठी नियमित इव्हेंट आणि चॅलेंजेस आयोजित करणे यासाठी साह्य मिळेल. डिजिटल क्रीएटर बी यूनिक, लेखिका अलिशिया डिसुझा, युट्युबर सेजल कुमार, ग्राफिक डिझायनर अनिरुद्ध मेहता असे काही ख्यातनाम भारतीय क्रिएटर्स या कम्युनिटीचा भाग असतील.

एचपी इंडिया मार्केटचे व्यवस्थापकीय संचालक केतन पटेल म्हणाले, “आजची तरुण पिढी आपले भविष्य स्वत: घडवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगते. माहितीवर आधारित नाविन्यपूर्णता देण्याच्या आमच्या दमदार वारशाच्या आधारे एचपीमध्ये आम्ही योग्य तंत्रज्ञान आणि समुदायाच्या पाठबळासह क्रिएटर्सची स्वप्ने पूर्ण करण्यात त्यांना साह्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. एचपीच्या नव्या एन्व्ही पोर्टफोलिओमुळे या क्रिएटर्सना अभिव्यक्त होता येईल तसेच ‘एचपी क्रिएटर्स गॅरेज’ याखास नेटवर्कच्या सादरीकरणातून त्यांना आपली प्रतिभा जगासमोर आणण्यात, भारतातील आघाडीच्या क्रिएटर्ससोबत जोडले जात नवी कौशल्ये शिकण्याची संधीही मिळेल.”

एचपी एन्व्ही पोर्टफोलिओ या वर्षाच्या उत्तरार्धात विंडोज ११ मध्ये अपग्रेड होण्याची शक्यता आहे. एचपी एन्व्ही नोटबुक्स म्हणजे स्लीक पर्सनल क्रिएटिव्ह स्टुडिओच आहेत. फोटोग्राफर्स, डिझायनर्स, व्हिडीओग्राफर्स, संगीतकार किंवा इलस्ट्रेटर्स अशा क्रिएटीव्ह ग्राहकांसाठी ही बहुविध रेंज अगदी सुयोग्य अशीच आहे. यातील प्रो-ग्रेड परफॉर्मन्स वैशिष्ट्ये तसेच अधिक चांगले थर्मल डिझाइन आणि अधिक काळ चालणाऱ्या बॅटरीमुळे क्रिएटर्सना साह्य होणार आहे.

“आपण सातत्याने येता-जाता काम करत असतो, शिकत असतो, खेळत असतो- फक्त कार्यालय किंवा शाळेतच नाही तर या दरम्यानच्या जागांमध्येही. म्हणूनच आपण कुठे आहोत त्या जागेचे किंवा आपल्या गतीचे परिणाम आपल्या सर्जनशीलतेवर व्हायला नकोत,” असे एचपी इंडिया मार्केटचे वरिष्ठ संचालक (पर्सनल सिस्टम्स) विक्रम बेदी म्हणाले. “एचपी एन्व्ही 14 या स्मार्ट, उच्च कामगिरी असणाऱ्या उत्पादनासह आपल्या अप्रतिम नव्या अनुभवातून निर्मिती आणि अभिव्यक्तीला नवे स्वातंत्र्य देऊ करत आहे,” असे ते पुढे म्हणाले.

एचपी एन्व्ही 14: मोबाइल सेल्फ-स्टाटर्ससाठी पर्सनल क्रिएटिव्ह स्टुडिओ

डिस्प्ले

मोठ्या अर्थव्यवस्थेतील सर्जनशील सेल्फ-स्टार्टर्ससाठी एचपी एन्व्ही 14 ची रजना आकर्षक १४ इंची डिस्प्लेसह करण्यात आली आहे, यात अचूक रंगंसंगतीसह काम करण्यासाठी अधिक मोठा कॅन्व्हास उपलब्ध होतो. यात १६:१० अशा डिस्प्लेमुळे अप्रतिम दृश्यात्मक अनुभव मिळतो. ज्यामुळे पारंपरिक लॅपटॉपच्या १६:९ या प्रमाणाच्या तुलनेत ११ टक्के मोठा भाग दृश्य मिळतो.

एचपी एन्व्ही 14 मध्ये कलर कॅलिब्रेशन आणि डेल्टा E <2 कलर ॲक्युरसी आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांनी केलेले काम अधिक अचुकतेने पाहता येते, १०० टक्के sRGB रंगांसह

एचपी एन्व्ही 14 मध्ये वापरकर्त्यांना क्रिएटिव्ह कामानुसार डिस्प्ले सेटिंग्जमध्ये वैयक्तिक बदल करता येतात

एचपी एन्व्ही 14 मध्ये अधिक चांगली प्रकाशयोजना असल्याने व्हिडीओ कॉल्स आणि व्हर्च्युअल इव्हेंट्समध्ये व्यक्तीचे दिसणे अधिक चांगले ठरते.

परफॉर्मन्स

एचपी एन्व्ही 14 मध्ये 11th जेन इंटेल® कोअर™ प्रोसेसर आणि NVIDIA® GeForce® GTX 1650 Ti Max-Q डिझाइन ग्राफिक्सचा मेळ साधण्यात आला आहे. त्यामुळे वेगवान रेंडरिंग, सहजसोपे प्लेबॅक आणि सहज मल्टिटास्किंग शक्य होते

एचपी एन्व्ही 14 मध्ये आयआर थर्मल सेन्सर, पातळ ब्लेडचे फॅन आणि हीट पाईप्स असल्याने दिवसभर पीसी थंड राहतो

एचपी एन्व्ही 14 मध्येमध्ये १६.५ तासांची कमाल बॅटरी आहे. शिवाय ॲडाप्टिव्ह बॅटरी ऑप्टिमायझरसह यात बॅटरीची काळजीही घेतली जाते

एचपी एन्व्ही 14 मधील एचपी डायनॅमिक पॉवरमुळे कमाल क्रिएटर वर्कफ्लोसाठी सीपीयू आणि जीपीयूमध्ये ऊर्जेचा योग्य वापर केला जातो

एचपी एन्व्ही 14 मध्ये एचपी ड्युअल स्पीकर्स आणि बँग ॲण्ड ओल्युफ्सेनचा ऑडिओ आहे, यामुळे वापरकर्त्यांना उच्च दर्जाचा कंटेंट निर्माण करणे शक्य होते

कनेक्टिव्हिटी :

पॉवर अप, ३ बाह्य डिस्प्लेला कनेक्ट करणे आणि मोठ्या फाइल ट्रान्सफर करण्यासाठी USBC™ सह थंडरबोल्ट™ सह स्नॅप यामुळे चारपट थ्रूपूट मिळतो – 40Gbps सिग्नलिंग रेट करा निर्मिती

एचपी एन्व्ही 14 क्रिएटर्स वापरत असलेल्या ॲडोब फोटोशॉप, ॲडोब प्रीमिअम प्रो, ॲडोब लाइटरूम आणि अशा अनेक क्रिएटिव्ह सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आणि टूल्सला समर्थित आहे

एचपी एन्व्ही 14 मध्ये पीसी आणि मोबाइल डिव्हाईसेसमध्ये फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट आणि असा सगळाच कंटेंट ट्रान्सफर करण्यासाठी एचपी क्विकड्रॉपमुळे कोलॅब्रेशन शक्य होते

एचपी एन्व्ही 14 आसपासचे आवाज दूर करत वापरकर्त्यांना व्हिडीओ रेकॉर्ड करणे, मिटिंग्स आणि कॉल्स करणे किंवा व्हर्च्युअल कार्यक्रम सहजसोप्या रितीने करता यावेत यासाठी एआय नॉईस रिमुव्हलने सज्ज आहे

एचपी एन्व्ही 14 मध्ये क्रिएटर्ससाठी सुरक्षा वैशिष्ट्येही आहेत :

पीसी वेबकॅम हॅक होणे आणि व्हर्च्युअल मिटींगमधील धोक्यांनी तंत्रज्ञान पुरवठादारांना खास विचारपूर्वक स्वरुपातील सुरक्षा आणि खासगीपणा जपण्याचा दृष्टिकोन बाळगण्यास प्रवृत्त केले आहे

कॅमेरा शटरवर फिजिकल, डिजिटली नियंत्रण असल्याने वापरकर्त्यांना त्यांचा कॅमेरा बंद करता येतो किंवा फक्त नजरेनेच कॅमेरा सुरू आहे का हे तपासता येतं त्यामुळे हॅकिंगचे धोके टाळता येतात

ऑडिओ सुरक्षा आणि खासगीपणा जपण्यासाठी या डिव्हाइसमध्ये खास बटण आहेत, ज्यामुळे अगदी सहजगत्या मायक्रोफोन्स चालू-बंद करता येतात, त्यामुळे आपलं बोलणं इतरांना ऐकू जात असल्याची चिंता वापरकर्त्यांना राहत नाही

कंटेंट खासगी ठेवण्यासाठी क्रिएटर्सना सुरक्षितपणे आणि सहजरित्या फिंगरप्रिंट रीडरच्या माध्यमातून अतिरिक्त सुरक्षेसह लॉग ऑन करता येते

एचपी एन्व्ही 15

एचपी एन्व्ही 15 मध्ये मिनिमलिस्ट डिझाइन, सुंदर ॲल्युमिनिअम चॅसिस आणि डायमंड कट डिझाइन आहे. यातील दमदार सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वैशिष्ट्यांमुळे कंटेंट क्रिएटर्सना बहुविधता आणि मोबिलिटीचा अतुलनीय अनुभव मिळतो. यात आकर्षक १५.६ इंची डिस्प्ले असल्याने प्रो ग्रेड परफॉर्मन्सची खातरजमा होते. एचपी एन्व्ही 15 मध्ये 11th जेन इंटेल® कोअर™ प्रोसेसर आणि NVIDIA® GeForce® RTX 3060 (MQ) आहे. अधिक कामगिरीसाठी यात गेमिंग क्लासचे थर्मल्स आहेत. एचपी एन्व्ही पोर्टफोलिओमध्ये कमाल १६.५ तासांची बॅटरी आहे आणि क्रिएटर्स वापरत असलेल्या ॲडोब फोटोशॉप, ॲडोब प्रीमिअम प्रो, ॲडोब लाइटरूम आणि अशा अनेक क्रिएटिव्ह सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आणि टूल्सने हा सज्ज आहे. या पोर्टफोलिओमध्ये पीसी आणि मोबाइल डिव्हाईसेसमध्ये फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट आणि असा सगळाच कंटेंट ट्रान्सफर करण्यासाठी एचपी क्विकड्रॉपमुळे कोलॅब्रेशन शक्य होते.

किंमत आणि उपलब्धता

एचपी एन्व्ही पोर्टफोलिओ एचपी वर्ल्ड स्टोअर आणि https://www.hp.com/in-en/shop/, रिलायन्स, क्रोमा अशी मोठी रिटेल आऊटलेट आणि ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा आघाडीच्या ईकॉमर्स साइट्स तसेच मोठ्या मल्टि ब्रँड आऊटलेटमध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, ॲडोबतर्फे एचपी एन्व्हीच्या खरेदीवर मोफत ४,२३० रु. पर्यंतची एक महिन्याची सवलत सर्व २० हून अधिक क्रिएटिव्ह आणि प्रोडक्टिव्हिटी सॉफ्टवेअरवर उपलब्ध आहे. ग्राहकांना इतर कोणताही एचपी लॅपटॉप एक्सचेंज केल्यास १५,००० रु. पर्यंत सवलत मिळेल.

एचपी एन्व्ही पोर्टफोलिओची रक्कम खालीलप्रमाणे :

एचपी एन्व्ही 14 नॅचरल सिल्व्हर रंगात १०४९९९ रु. या किमतीपासून सुरू होतो

एचपी एन्व्ही 15 नॅचरल सिल्व्हर रंगात १५४९९९ रु. या किमतीपासून सुरू होतो